July 2016

ढवळाढवळ

हुश्श, आज पार दमलो बुवा, त्या तिथे मेजवानीसाठी किती ते पदार्थ, भारीच दमछाक झाली काम करुन, :tired: अंमळ टेकावे इथेच जरा... आई, आई गं....ऑ.. काय म्हणता? हो, हो माहिती आहे बायांनो, ही जागा आमच्यासाठी नाही, हे संकेतस्थळ केवळ स्त्रियांसाठीच आहे. इथे बाप्या लोकांना मज्जाव आहे ते. पण मी इथे रितसर परवानगी घेऊन आलोय बरं का. खरं नाही वाटत तर विचारा तुमच्या अ‍ॅडमिनताईंना. मला इथे येऊ द्यावं का नाही यासंदर्भात आतमध्ये एक मीटींगही झाली म्हणे आणि माझ्यासाठी एका ताईंनी वशिलाही लावलाय बरं, पण मी त्या ताईंचं नाव नाही घेणार, अगदी या कानाचं त्या कानाला नाही कळू देणार.

Keywords: 

लेख: 

जित्याची खोड

आयुष्यातला पहिला पिझ्झा खाल्ला तेव्हा किती मीठ आणि मिरची त्यात घालू असं झालं होतं. तरीही त्याला चव नव्हतीच. तीच गोष्ट बर्गरची. इतका छान वडा पाव मिळत असताना त्यात संपर्क बर्गरसाठी ३५ रुपये का घालवायचे असा मला प्रश्न पडायचा. पुढे हळूहळू महाराष्ट्रीय जेवण सोडून बाकी पदार्थांची ओळख होऊ लागली. त्यातही गुजराती जेवण गोड असेल तर त्यात थोडं मीठ घालायची इच्छा व्हायचीच. इडली डोसे, सांबार चटणी मात्र जशी ची तशी आवडली आणि पंजाबी जेवणही. अर्थात हे सर्व त्या त्या प्रदेशात न खाता त्यांचं मराठी रूप पाहिलेलं त्यामुळे ते कितपत खरं-खोटं माहीत नाही.

लेख: 

ImageUpload: 

प्राणसखा

..

पाचूच्या रानात पुन्हा बासरी घुमली
सागरनिळाई ओल्या दिठीत सजली
हरपली राधा मनी मोरपंखी साज
मेघियात दाटू आले कान्हाचे आभास

सोनसळी हूरहूर अंतरी दाटली
हसुनिया पळभर सांज रेंगाळली
निमिषात पानोपानी कान्हा उमलला
आभासछबीत कान्हा राधेस भेटला

वा-यावर लहरली जणू रूणझूण
मेघातून दाटू आले निळे-श्याम क्षण
पाखरांच्या चाहूलीचा करुनी बहाणा
वेध घेई राधा..म्हणे आला यदुराणा..

प्राण आसावला तरी चाहूल देईना..
निजू पाहे सांज तरी श्रीरंग येईना
यमुनेचे नीर नयनात भरू आले
मोरपीसावरी दोन मोती विसावले

वा-यावर अनामिक घुमली लकेर
मनाचा हिंदोळा गेला दूर नभपार
शहारली राधा, मनी श्रावण अवघा

काही जुनी स्केचेस

मॅगीच्या वर्कशॉपमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अॅनिमेशन शिकताना सुरुवातीला 15 दिवस चित्रकला शिकवली गेली. मला टेक्निकली चित्रकलेचे शिक्षण नव्हते. सो ते 15 दिवस खूप शिकायला मिळाले. त्या वेळी काढलेली ही स्केचेस.
शिकाऊ पातळीवरचीच आहेत, फार काही छान नाहीत. पण शेअर करावी वाटली या निमित्ताने. गोड मानून घ्या Praying

सुकलेली पाने
IMG_20160710_105036.jpg

पर्स्पेक्टिव्ह शिकताना काढलेले घरातल्या सोफ्याचे स्केच

कलाकृती: 

हिरवा निसर्ग

प्रवासाची मजा खरी पावसात येते... मैत्रिणींनो पावसात तुम्ही आवर्जून कोकणात जा.. अगदी मुंबई पासून थोड्या अंतरावर निसर्ग आपली वाट पाहतोय... काही पासपोर्ट नको... किंवा विजा नको....थोडा वेळ काढा आणि निसर्गाचा आस्वाद घ्या.... मी अलीकडेच चिपळूणला जाऊन आली... आणि खरंच खूप छान वाटते.
खरंच एखाद्या कवीला कविता करायला प्रेरित करणारा, किंवा एखाद्या चित्रकाराला चित्र काढायला उस्फुर्त करणारा हिरवा अगदी हिरवा निसर्ग आहे हा !!!!

LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव

ऑगस्ट २०१५ च्या एका दुपारी जरा एका ऑफीसमध्ये काम होते म्हणून जेवण उरकून लेकाला घरीच ठेवून सायकलने निघाले होते. वाटेवर एका झाडाच्या ४-५ चेरी तोंडात टाकून जरा पुढे गेले आणि काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडले. नशिबाने सायकल रस्त्याच्या कडेला गवतावर घेतली होती. विजेचा पोलाच्या एक फुट पुढे जाऊन आणि मुख्य रस्त्याला लागण्यापुर्वीच पडले होते.

घरी जाऊन आधी दवाखान्यात फोन केला. अचानक चक्कर येऊन सायकलवरून पडल्याचे सांगितल्याने दुसर्‍या दिवशीची सकाळची भेटण्याची वेळ मिळाली. डॉक्टरला रक्त, लघवी तपासल्यानंतर दोन्हीकडे साखर असल्याचे आढळले.

Keywords: 

मिनॅक थिएटर, युके - एका स्त्रीच्या संकल्पनेचा अप्रतिम अविष्कार

पाच दिवसांच्या कॉर्नवॉलच्या कंडक्टेड टूरमध्ये आमच्या टूरगाईड स्टीवनं आम्हाला खूप सुरेख सुरेख ठिकाणं दाखवली. त्यातलंच हे एक झळाळतं रत्नं - मिनॅक थिएटर!

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle