August 2016

फूलों के रंगसे दिलकी कलम से : बल्ब फार्म

सिलसिला मध्ये ये कहां आ गये हम गाणे ऐकल्या व बघितल्यापासूनच ट्यूलिप गार्डन्स बघायचं फार मनात होतं. अ‍ॅम्सरडॅमला जाताना मुद्दाम क्युकेन हॉफ गार्डन जे १६ मे परेन्त उघडे असते व नंतर बंद होते ते बघता अनुभवता यावे अशी तजवीज करून आगाउ तिकीट बुक करून गेलो. नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेले रंगीबेरंगी फुलांचे गालिचे किती सुखद असणार आहेत त्याची चुणूक विमान उतरतानाच आली. हिरव्या लॉन वर मैलोन मैल पसरलेले हर एक रंगाचे ट्यूलिपचे चौकोन आयताकार गालिचे बघून फार मस्त वाट्ते. भारतातील घामट, रखरखीत, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या मे महिन्यात गेलो होतो त्यामुळे तर फरक जास्तच जाणवला.

Keywords: 

माझे क्रीडा-जगत!

मी खेळ/ क्रीडा या विषयावर लिहीणं यापेक्षा मोठा जोक नाही. आयुष्यात मी कधी कुठलाही खेळ फार हौशीने खेळले नाहीये. समस्त क्रीडाप्रकारांचा मला जन्मजात कंटाळा. माझ्या मते या जगात एकच क्रीडाप्रकार - तोंड चालवणे. गप्पा मारणे हा माझ्या मते एक क्रीडाप्रकार आहे - आणि सर्वांत उत्तम क्रीडाप्रकार आहे.

मला आठवतय - फारा-फारा वर्षापूर्वी आपल्या मामीनी कुठेतरी निबंध लिहीला होता - माझा आवडता छंद - गप्पा मारणे Lol . (कधी नव्हे ते) फार आवडलेला आणि पटलेला तो निबंध मला. (हे बहुदा मामीशी झालेलं पहिलं आणि शेवटचं एकमत!)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

खेळण्याचे दिवस (भाग १)

खेळण्याचे दिवस (भाग १)

https://www.maitrin.com/node/1066 (भाग २)

दोन भावांबरोबर वाढल्यामुळे की काय माझ्यात टिपिकल "बायकी" समजले जाणारे गुणधर्म निदान त्या काळात तरी खूपच कमी असावेत. कारण "जरा तरी मुलीसारखं वागत जावं गं!" अश्या कळकळीच्या विनंत्या घरातल्या मोठ्या बायका.........म्हणजे आई, मावश्या, काक्या, माम्या, आत्या यांच्याकडून मिळायच्या.
लहानपणापासून हुंदडण्यात खूपच रस!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

सीझर किक ते फॉसबरी फ्लॉप...व्हाया स्ट्रॅडल/ वेस्टर्न रोल...उंच उडी (खेळण्याचे दिवस भाग२)

सीझर किक ते फॉसबरी फ्लॉप...व्हाया स्ट्रॅडल/ वेस्टर्न रोल...उंच उडी (खेळण्याचे दिवस ...भाग २)
कधी तरी टीव्हीवर जागतिक अ‍ॅथलॅटिक्स बघत होते. आणि वाटलं लिहावंच काहीतरी. विशेषत: उंच उडीबद्दल. माझा इव्हेन्ट!
आता वयाच्या या टप्प्यावर येऊन पोचल्यावर बर्‍याच गोष्टींसाठी सिंहावलोकन केलं जातं. किंबहुना गत काळाच्या खूप आठवणी कधीही कश्याही मनात उचंबळून गर्दी करतात. आणि कधी कधी गत काळातल्या काही काही आठवणांचं काही तरी वेगळंच इन्टरप्रिटेशन मनात होतं. तर असंच हे टीव्हीवर जागतिक अ‍ॅथलॅटिक्स बघताना वाटलं की आता या आपल्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर काही तरी लिहावंच!

Keywords: 

तरंगायचे दिवस! भाग-१

तरंगायचे दिवस! भाग-१

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

प्रस्तावना

Keywords: 

तरंगायचे दिवस! भाग-२

जल-आनंद!!

Keywords: 

लेख: 

तरंगायचे दिवस! (भाग-३)

व्यक्ती आणि वल्ली

Keywords: 

लेख: 

तरंगायचे दिवस! (भाग-४: अंतीम)

कल्याण ते मुंब्रा : एक धाडसी प्रयोग

Keywords: 

लेख: 

खेळ आणि मी

लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle