August 2016

राधे : कच्चे रंग

आणि तो ही दिवस आठवतो...

थंडीचे दिवस होते; मध्यान झालेली. सगळे बाल गोपाल जेवून यमुनेतीरी उन खात पहुडलेले. सारीकडे छान हिरवेगार गालिचे पसरलेले. वृक्ष डेरेदार होऊन हिरवी छत्र चामरं ढाळत उभे होते. उन्हे डोक्यावर आली तरी हवेत एक दाट गारवा भरला होता. यमुनाही थोडी जडशीळ झालेली, सुस्तावलेली;अन सभोवती आम्ही सारे!

तेव्हढ्यात तू झळकलीस, हो हो झळकलीसच. उन्हात तुझा कोरा, नवीन राजवर्खी रंगाचा, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या नक्षीचा, घागरा खरच झळकन लकाकला. घाग-यावरच्या छोट्या छोट्या बिंदल्या;तुझ्या पावलांच्या ताला;; उन्हात चकचकत होत्या .

Keywords: 

लेख: 

राधे: संचित करुणेचे

आणि तो ही दिवस आठवतो

मध्यान्हीचे उन अलवार होत होते; सारीकडे अलगद गारवा पसरू लागला होता. आम्ही सारे गोप कालिंदी तटी खेळायला निघालो. पेंद्या नेहमीप्रमाणे मागून हळू हळू एका पायावर लंगडत येत होता. आम्ही पऴत पळत किना-यावर आलो. वाळू आता छान नरम-गरम अन ओलसर होती. कोणी त्यात घरं बांधू लागले, कोणी विहीर खणू लागला. कोणी पारंब्यांवर लटकला तर कोणी नदीत डुंबू लागला.

Keywords: 

लेख: 

राधे : मीरा

आणि तोही दिवस आठवतो...
कितीतरी युगं पुढे नेऊन ठेवलस त्या दिवशी तू मला...

यमुनेकाठची अशीच एक सुंदर सकाळ होती ती. पाणी भरता भरता, एका क्षणी तू थबकलीस, पुन्हा घट यमुनेत रिकामा केलास; अन पुन्हा भरू लागलीस. जरी मी पावा वाजवत असलो तरी लक्ष तुझ्याकडेच होतं माझं. तू पुन्हा घट रिकामा केलास अन पुन्हा भरू लागलीस...???

Keywords: 

लेख: 

राधे: गिरिधारी

( एक साधी, सरळ आठवण. ना काही सांगायचय, ना काही सुचवायचय. फक्त त्या दिवसाची आठवण. बस )

"आणि तो ही दिवस आठवतो का गिरिधारी ?"
तू म्हणालीस....
अन मला लख्खकन आठवला तो दिवस

धुम पाऊस पडत होता. कितीतरी दिवस आकाश कोसळतच राहिलेले. सारी सुष्टी नुसती चिंब भिजत, काकडलेली. गाई गुरं गोठ्यातच थरथरत होती. मुलं भिजून भिजून कंटाळली होती. गवळणी दुधाच्या कळशा घेउन कशाबशी मथुरेला जात होत्या. गोपी सारे घरात बसून बसून कंटाळून गेले होते.
आता तर माझी बासरीही मऊ पडली, सूर हवे तसे येईचनात. अन तूही भेटली नव्हतीस कितीतरी दिवस, कशी बरं सुरेल वाजावी ती तरी...

Keywords: 

लेख: 

दैनंदिनी- कोलंबो (भाग १) - श्रीलंका दिवस १

श्रीलंकेच्या विमानतळावर विमान पहाटे ४ वाजता उतरले आणि इमिग्रेशन वगैरे सोपस्कर पार पडून मी विमानतळाबाहेर आले. त्याआधी डेटा असलेले एक सिमकार्ड घेतले आणि I was immediately connected to the world again. ही कनेक्टिविटी हवी की नको यावर मी विचार केला होता. पण आईबाबांना उगाच चिंता नको म्हणून घेऊन टाकले. हॉटेल्स मध्ये शक्य तेवढे रहायचे नाही, हॉस्टेल्स शोधायची असा विचार केला होता. त्यामुळे वायफाय प्रत्येक ठीकाणी उपलब्ध असेलच की नाही याची खात्री नव्हती. माझी पुढाची सगळी बुकींग्ज व्हायची होती. त्यामुळे एकदाचा तो डेटा प्लान घेतला आणि कित्ती खर्च झाला असे एकदम वाटले.

लाराने केलेले DIY - inspiration board

रायगडनं तिच्या भाच्यांना विचारलं की अमेरिकेहून काय पाठवू? झालं! लारादेवींनी एक मोठ्ठी लिस्ट करून तिला पाठवली. लिस्ट म्हणजे केवळ क्राफ्टच्या सामानाची. भेट मिळाल्यावर जाम खुष झाली ती कारण ती केव्हाचा शोधत असलेला रोज गोल्ड स्प्रे होता.

तोच स्प्रे वापरून तिनं हा नेहमीचा रायटिंग बोर्ड एका इन्स्पिरेशन बोर्डमधे रुपांतरीत करून तिच्या अभ्यासाच्या खोलीत लटकवला आहे. एका साध्या पॅडला रोझ गोल्ड रंगाच्या स्प्रेनं स्प्रे पेंटिंग करून घेतलं.

Keywords: 

कलाकृती: 

गोल्डन श्रग

डोहाळेजवणात मिळालेला सुंदर ब्रोकेड चा ब्लाऊज पीस होता.ब्लाऊज शिवायचे नव्हते.
गोल्डन श्रग शिवायला टाकायला गेले तर टेलर ने ९०० शिलाई सांगितली. त्याला मनात 'गेलास ढगात' म्हटले आणि २५ रु. चे अस्तर आणून घरी शिवायला घेतला.माझे आणि शिवणाचे विशेष सख्य नाही उसवलेले शिवण्याशिवाय.आणि फॅशन मेकर मशिन साबांचे असल्याने जपून वापरावे लागते तटकन सुई किंवा बॉबिन चा दोरा तुटला तर मला दोन्ही बदलता येत नाही. :)
या सगळ्यातून मनाच्या डोळ्याने बघत आणि कोणतीही मापे न घेता शरीराला गुंडाळून अंदाज घेत शिवलेला श्रग.

कलाकृती: 

गणपती बाप्पा मोरया!

हा आधी माबो अन मिपा वर लिहिलाय. अगदी मनापासून वाईट वाटल होतं तेव्हा जाता न आल्याच! पण यंदा जाणारे! Dancing सध्या हा वाचा मी परत आल्यावर यंदाच्या गणपतीची दैनंदिनी लिहिते! :)

काल गप्पांच्या पानावर सहज कोकणातल्या गणेशोत्सवाचा विषय निघाला , आणि मी एक सैर करून आले मनातल्या मनातच. ह्या वेळी घरच्या गणपतीला कोकणात हजेरी लावता येणार नाहीये ह्याचा सल होताच मनात , तो ह्या सफरीनी जरा हलका झाला.

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ५ : आमचे घर रिमॉडेलिंगचे प्रयोग!

आळशीपणात आमचा नंबर फार वरती लागतो. तहान लागल्याखेरीज विहीर खोदायची नाही हे तत्व! पूर्वी तर आमच्या राजा-राणीच्या संसारवेलीवर फुलं का काहीसं फुलायच्या आधी, शनिवार-रविवार सकाळी उठलो की आम्ही टि.व्ही. समोर सोफ्यावर तंगडया पसरून जे बसून रहायचो की बस्स! भूक लागली, काहीतरी नाश्ता बनवूया असा उच्चार दोघांपैकी जो पहिले करेल त्याने उठून मुकाट नाश्ता बनवायचा हा एक अलिखित नियम होता. त्यामुळे व्हायचं एवढंच की ११-११.३० वाजेपर्यंत दोघंही कुळकुळत पोटातले कावळे घेऊन बसून रहायचो पण उठून करावं लागेल या भीतीने ते ओठावर आणण होईल तेवढ टाळायचं!

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle