August 2016

तिरंगा माझाही :-)

मैत्रिणवरच्या फसफसणार्‍या उत्साहाची लागण मलाही झाली Dancing

१) कविनची पावभाजी Heehee (म्हणजे कविन कडून घेतलेल्या मसाल्याची Wink )

20160816_132011.jpg

२)तिरंगी पास्ता
माझं कर्तूत्व, पाकिट फोडून पाण्यात टाकणे :ड

20160815_162605-001.jpg

३) फूल फ्रॉम अ फूल Wink

20160220_163846.jpg

Keywords: 

उपक्रम: 

माझं लेटेस्ट क्रोशे काम

या मी केलेल्या लेटेस्ट बॅग्ज आहेत.
यातल्या काही ऑर्डर नुसार कस्टमाइझ्ड केलेल्या आहेत.
याआधीच माझं क्रोशे काम क्रोशेच्या कॉमन धाग्यावर आहेच.... :)
ऍडमीन ताईंना विशेष धन्यवाद हे सगळं इकडे आणण्याची आठवण केल्याबद्दल. Lovestruck

PicsArt_08-17-04.02.57.jpg

PicsArt_08-17-04.07.09.jpg

कलाकृती: 

टाकाऊतून टिकाऊ -कमीझचे बेडशीट

माझे बरेच जुने सलवार कमीझ मी बाजुला ठेवुन दिले होते की यांचे काहीतरी करू म्हणुन. तसेच बर्‍याच ओढण्या पण ठेवल्या आहेत काहीतरी करु म्हणुन. तर त्याची एक बेडशीट बनवली. ५ टॉप + १ ओढणी असे मिळून हे बनवले आहे. थोडे दिवस का होईना बरे दिसेल असे वाटतेय :) घरच्यांना तरी आवडलेय रंग वगैरे. आयडिया माझ्या वहिनीच्या आईची. त्या असे बरेच काही काही करुन घेतात शिंप्याकडून. इथे शिंंपी आणि कष्टंबर आम्हीच! पेक दिवस पदर खोचून लावल्या कात्र्या टॉपना आणि हे बनवले!

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

राधे: कृष्णनिती

"आणि तो ही दिवस आठवतो माधवा...

आता हे स्पष्टच झालं होतं, की युद्ध होणार. अगदीच अटळ झालेलं ते आता. अगदी तुझी शिष्टाईही कामी आली नाही... की तू ती सफल होऊ नये; अशीच केलीस?
पण तो मुद्दा वेगळा, बोलेन कधी त्या विषयीही... आज वेगळं बोलायचय मला. हो वेगळच.
खरं तर तो कितीतरी तुझ्यासारखाच. तुझ्या जीवनातल्या कितीतरी गोष्टी त्याच्या आयुष्यातही डोकावल्या. पण किती वेगळ्या, दुखऱ्या. किती लसलसणारे दु:ख देणाऱ्या...

Keywords: 

लेख: 

स्पेन भ्रमंती- माहिती हवी आहे.

मुलींनो, मी सप्टेंबरात मित्रमैतरणींबरोबर स्पेनला चाललेय. फिरायला. कुठं विचारावं ते कळलं नाही म्हणून.इथं विचारतेय. काही सल्ले , सूचना , मस्ट सी मस्ट डू असल्यास कळवा. 5 गावं बघून होतील.

खरं तर हे काम खूप दिवस ( दोन वर्शं) पेंडिंग होतं. आता येऊन शूंपीचा निरोपवहीतला मेसेज पाहीला. खूप उशिरा. तरी आता इथं माहिती लिहायला लागते. जमेल तशी.

Keywords: 

शामसखी आणि अद्वैत

(दोन जुन्या्या कविता, आजसाठी Lol
_.jpg

उभी कधीची यमुनातीरी
मध्यान सरली, उन्हे उतरली
शाम वेळ अन शाम न सोबती
धीर न उरला मनी जराही
हूरहूर, काहूर मनी दाटली
अंधारुनि आली सृष्टी सारी
शाम सखी मी, शाम सखी

दाट धुक्याने वाट अंधुकली
शिरशिरी उठली यमुने वरती
सोबत तिच्या मी आसुसलेली
पाठराखणीस कदंब सावली
पुऱ्या मिसळलो आम्ही तिघी
एकच तू, नयनी - हृदयीही
शाम सखी मी, शाम सखी

अवनी सारी गंधीत झाली
त्यात मिसळली धुंद पावरी
घेऊन तुझिया चाहूल आली
अंतर्बाह्य पुलकित झाली
राहिले न मी, मी माझी
तूच तू, झाले मी सारी

Keywords: 

कविता: 

दैनंदिनी- प्रि श्रीलंका

मी श्रीलंकेला जाणार हे डिक्लेअर केल्यानंतर बर्‍याच जणांनी का? हा प्रश्ण केला. त्यात काहीजणांच्या मते एवढे देश बघायचे राहिलेयत त्यात श्रीलंकाच का आत्ता? वगैरे प्रकारची कुतुहले होती. पण मी ठरवलं होतं मला श्रीलंकेला जायचय. त्याची कारणे कधीतरी डिस्कवरी वर पाहिलेला तो सर्वत्र असलेला हिरवा पाचूचा रंग, रत्नांच्या खाणीची वर्णने आणि मागच्या पाच -सहा वर्षांपासून बॉस कडून सतत ऐकलेली श्रीलंकेची स्तुती ही होती. (बॉस कोलंबोमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलचे सीईओ होते).

सो फायनली पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टी येत आहे हे पाहून मी पटकन टिकीटे बुक करुन टाकली पुढचा काहीच विचार न करता...

राधे : हे माझ्यास्तव

आणि तो ही दिवस, छे तो ब्राह्ममूहूर्त आठवतो मला...

संध्याकाळ होत आलेली. आपण यमुनातीरी बसलेलो. अचानक तू म्हणाली होतीस, "तुझी बासरी दिवसभर माझ्या आसपास वाजत असते."
अन मग थबकून म्हणालीस, "पण सगळे कुठे दिवसाला सामोरे जाऊ शकतात रे ?"

अन उदास होऊन यमुनेच्या पाण्यात पाय हलवत बसून राहिलीस किती तरी वेळ.

अन मग दिवस कलला, रात्र यमुनेच्या पाण्यासारखी गडद होत गेली. तू तिथेच बसून राहिलीस. मग मी कसा हलणार होतो? सारीकडे शांत शांत होत गेले. आता मी ही पावा बाजूला ठेवला

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle