August 2016

सृजनाच्या वाटा - क्रीडा जगत - आठवणी, आठवणी आणि आठवणी

सर्वप्रथम मैत्रीण टीमचे आभार 'सृजनाच्या वाटा' अंतर्गत 'क्रीडा जगत' या उपक्रमात जे विषय सुचवले आहेत त्यातील ५ नं. बद्दल - लहानपणीचे खेळ आणि आठवणी. ही ओळ वाचूनच मी लहनपणात मस्त बागडून आले आणि हे सारे इथे लिहावेसे वाटले.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

तरंगायचे दिवस!

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

लेख: 

हॅप्पी खुर्च्या

आमच्याकडे ४ फोल्डींग खुर्च्या आहेत, हाऊसपार्टीज ना बर्या पडतात.
पण वापरून वापरून त्यांची अगदी रया गेलेली. फारच उदास दिसायच्या.

before1.jpg

यातलीच एक मी डेस्क साठी वापरते. काल परवा, बस्के आणि नंदिनीच्या डेस्क चे फोटो पाहिले :) दुसर्या धाग्यावर आणि म्हटलं, आपल्या होम ऑफिस चा सुद्धा जरा कायापालट करावा.
खुर्चीने सुरुवात smile
आधी मेटल पण परत स्प्रे पेंट करणार होते, पण मला ग्रे आणो कोरल हे काँबो खूप आवडतं, आणि भिंती पण फिकट ग्रे आहेत. तर ते तसच ठेवलं.

Keywords: 

कलाकृती: 

चहाबाज रे!! अमृततुल्य पेय

जसे अट्टल बेवडे असतात तशी मी अट्टल चहाबाज आहे, मला चहा कसाही कुठेही कधीही कितीही प्यायला आवडतो.
चहाची स्वता:ची काही खास रेसीपी असेल अथवा कुठे बाहेरगावी परदेशी प्यायलेला आठवणीतला चहा असेल तर रेसीपी आवर्जुन लिहा! चहाशी रिलेटेड एखादी चांगली वाईट आठवण असेल तर ती ही लिहा! चहा प्या, खुश रहा!
तो एक कप चाय हो जाये!! Thumbsup

Keywords: 

माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - ३

माझ्ं सध्याचं सगळ्यात आवडतं रीसायकलिंग मटेरिअल आहे 'प्लॅस्टीक'.खरतरं 'प्लॅस्टीकची बिसिलरी किंवा तस्सम ब्रॅंडची बाटली. एका रोड ट्रीपमधे पाण्याच्या बॉटल्सचा क्रेट घेतला होता. ट्रीप संपता-संपता सगळ्या रिकाम्या बॉट्ल्स रिसायकलिंग बीन मधे टाकता येतील म्हणून गोळा करुन एका पिशवीमधे ठेवलेल्या. घरी परत आल्यावर इतर बॅग्स बरोबर बॉट्ल्सची पिशवी पण घरात आणली. मात्र पुन्हा बाहेर जायचा कंटाळा केला आणि थोड्या वेळाने टाकता येईल म्हणून एका कोपर्‍यात ठेऊन दिली. ते पाहून लेकीने विचारलं 'आई , तू बॉट्ल्सचं प्रोजेक्ट करणार आहेस का?

Keywords: 

कलाकृती: 

सातकापे घावन

काही चवी, वास , पदार्थ , बाहेरच वातावरण , सणवार ह्याच एक घट्ट नातं असत. अन प्रत्येक घराच आपापल असत! आईकडे श्रावण म्हणजे नारळी भात गोकुळाष्टमीचा भरगच्च प्रसाद, फराळ आठवत मला. पण सासरी श्रावणी सोमवार ,नारळीपोर्णिमा ,पंचमी ची सवाष्ण , अन वार्षीक सत्यनारायण असे ठळक कार्यक्रम असतात. अन काही पदार्थ केवळ ह्याच दिवशी बनतात. आल्याच रायत, मिरचीच पंचामृत, वाल घालून पडवळाची भाजी , आंबट बटाटा, पातोळ्या , खांडवीच्या वड्या, काकडीच धोंडस केळ्याची कोशिंबीर वगैरे.

Taxonomy upgrade extras: 

स्टॉकिंग फ्लवर्स

स्टॉकिंगची जाळीदार फुले मी शाळेत असतानाच मैत्रीणीकडून शिकले होते. पुन्हा एकदा करुया व मुलीला शिकवूया ह्या उद्देशाने मी ही फुले मुलीच्या मदतीने तिला शिकवत शिकवत केली. वॉट्स अ‍ॅप वर फोटो पाहून माझ्या काही माबोकर मैत्रीणींनी ह्याची कृती विचारली होती. ती खालील प्रमाणे. अजून खुपसे प्रकार नेटवर सापडतील ह्या फुलांचे वेगवेगळे आकार आणि गुच्छही.

मी हे सामान दादर वरून सौभाग्य वस्तू भांडार मधुन घेतले. त्यांना स्टॉकिंगच्या फुलांचे सामान द्या सांगितले की ते खालील सगळ्या वस्तू दाखवतात. रंग आपल्या आवडीनुसार घ्यायचे.

Keywords: 

कलाकृती: 

विजयी विश्व तिरंगा प्यारा

india-flag-colours

केशरी, पांढरा ,हिरवा! ... आपल्या एकोणसत्तर वर्षे तरुण राष्ट्रध्वजाचे तीन रंग!
१५ ऑगस्ट, म्हणजेच आपल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी हा तिरंगा जागोजागी अभिमानाने फडकत असेल. मग मैत्रीणवरही झेंडावंदन व्हायला हवंच ना! आणि होणारच आहे, अगदी मैत्रीण स्टाईलने!

Keywords: 

संपूर्ण खादुर्मास

इन्नाने सातकापे घावनांवर श्रावण महिन्यातल्या खाऊची आठवण काढली, मग मला हा लेख इथे आणण्याची घाई झाली.

लहानपणापासूनच श्रावण महिना माझ्या भारी आवडीचा आहे. मस्त पाऊस, हिरवा आसमंत, मंगळागौरीचे खेळ, सत्यनारायणाची पूजा, सणांच्या निमित्ताने तर्‍हेतर्‍हेची पक्वान्नं इत्यादींमुळे वातावरणात कसा मस्त उत्साह भरलेला असतो. श्रावण महिन्याच्या या उत्साहाचा आणि आनंदाचा संचार जसा माझ्यात झाला तसा तुमच्यातही होवो अश्या शुभेच्छा!

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle