October 2016

साकार तू

चित्र जरा काढावे म्हणोनि,
       कुंचला माझिया हाती
       अन, रंग-सारे नयनी तुझ्या

घडवावी एक सुरई म्हणोनि,
            चक्र माझिया हाती
            अन, शाडुसम-मऊ स्पर्श तुझा

भरावा जरा कशिदा म्हणोनी,
               सुई माझिया हाती
              अन, रेशमी-गळाभर हात तुझे

कविता: 

ड्यूक नोज आठवणीतील ट्रेकिंग अनुभव !

ड्यूक नोज आठवणीतील ट्रेकिंग अनुभव !

आम्ही मैत्रिणींनी ठरवले चला ट्रेकिंगला जाऊ, फिरण्याची आवड असल्यामुळे मी सुद्धा उत्साहाने तयार झाली. जसा ट्रेकिंगचा दिवस जवळ येत होता मज्जा वाटत होती, नेहमीच्या सवयीप्रमाणे खरेदी जोमात चालू होती, माझ्यासोबत माझी आत्येबहीण मधु पण येणार होती, मग काय स्पोर्ट्स शूज, टी-शर्ट, ट्रॅकपँट, बॅग सर्वकाही सज्ज..

सांग सख्या रे!

सांग सख्या रे

सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?
तू दूर तरिही; 
तुझे भास व्हावे! 

जरी दर्पणी ह्या;
मला मी बघावे  
तुझे रुप त्याने;
हाय दाखवावे!
श्वासही माझे;
तुला फितूर व्हावे?
कसे भान नुरले,
मला ना कळावे 
सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?

कळीने जसे त्या,
उमलुन यावे
तसे मी फुलावे,
बहरुन जावे
अशी काय जादु?
असे काय व्हावे?
तीर नाही तरी मी,
घायाळ व्हावे 
सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?

सरींनी स्वरांच्या 
मन चिंब व्हावे
तू सूर अन मी
तुझी वेणु व्हावे
तुझे श्वास, निश्वास
मी ओळखावे
सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?

मागू तुज प्रित कशी

मागू तुज प्रित कशी
अचपळ मन माझे
हृद्यातील वीज वेडी
उत्सुक पडण्या परि

पाहू कसे रुप तुझे
दिपले नयन माझे
कोसळे वर्षा अवेळी
अवाक स्तब्ध त्यात मी

चंचल नजर तुझी
स्थिर राही क्षणभरी
नाहतो नखशिखांत
मंत्रमुग्ध भ्रांतचित्त

हासती गुलाब गाली
आवाहने देती किती
हलकेच जाता पुढति
जाग नयनात येई

पाहतो जागेपणी मी
स्वप्ने तुझी भारलेली
प्रित वेडी हृद्यातली
परि येई ना ओठी

( कविन, घे बाई :winking: )

कविता: 

कवितांच्या झब्बूंची मैफल

चला, इथे कवितांवरील झब्बूंची मैफल जमवुयात :)
कधी स्वतंत्र कविता टाकावी वाटली तर स्वतंत्र धागा काढूनही टाका आणि इथे लिंक द्या. किंवा फक्त इथेच टाकावी वाटली तरी तसही चालेल.

Keywords: 

कविता: 

दिवाळी फराळ ( लाडू, शंकरपाळे, शेव आणि .. )

या फराळाला.

हे बेसनपिठाचे पुर्‍या लाटून, तळून, चुरून केलेले लाडू.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

(सांग सख्या रे ) -- विडंबन !

पेर्ना

सांग सख्या रे हे
असे काय व्हावे
डायट करुनीही
वेट गेन व्हावे!

जरी यंत्र बदलुन
उभी मी रहावे
विशाल आकडे
हाय दाखवावे!

वस्त्रे ही माझी
कशी घट्ट व्हावी
किती सैल करावे
मला ना कळावे 
सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?

फुग्याने जसे या
फुगीर व्हावे
तसे मी फुलावे
पसरून जावे

अशी काय जादु?
असे काय व्हावे?
जंक टाळी तरी हे
आकार वाढावे
सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?

क्लिनिकात दिवेकरांच्या
पाकीट हलके व्हावे
तू लॉरेल अन मी
तुझी हार्डी व्हावे

तुझे कुजक कटाक्ष

Keywords: 

कविता: 

Prior and Urgent!

प्रेम असतच रे तुझ्या माझ्या मनात
खुंटीवर टांगलेल्या कपड्यां सारखं!
किंवा कोपऱ्यात पडलेल्या रद्दी सारखं...
फार फार तर
To-Do list मधल्या शेवटल्या task सारखं
जरा मळलं म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा धूळ बसली म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा मागे पडल म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
उधळून टाकावं मनातलं प्रेम...
वाढत म्हणे!
साचून राहीलं तर नितळ
पाणीही गढूळतच ना!
झटकूया का थोडी धुळ?
करुया का कोपरे लख्ख?
देउया का प्रेमाला Prior and Urgent चा कप्पा?

Keywords: 

ते एक वर्ष - १०

ते एक वर्ष १०- कांदेपोहे

वेणूला मी कांदेपोह्यांबद्दल सांगितलं होतं ते काही खोटं नव्हतं. एव्हाना मी नोकरीत सेटल झाले होते, कमावती होते. आई-वडिलांनी मला विचारलं की आता स्थळं बघायची का, का कोणी शोधला आहेस? कोणी शोधलेला नव्हता, आणि लग्न करायचं होतं (म्हणण्यापेक्षा, लग्न न करायचं काही कारण नव्हतं) म्हणून त्यांना होकार दिला. तेही दोन-चार वधू-वर सूचक केंद्रांमध्ये ताबडतोब नाव नोंदवून आले. त्यानंतर मग जे काही सुरू झालं त्यासाठी मात्र मी मानसिकरित्या मुळीच तयार नव्हते. पार्ल्यातलं एकटेपण त्यापेक्षा निश्चितच सुसह्य होतं. असो.

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle