October 2016

सिंगापूर-बँकाँक भटकंती

मुलींनो, पुढच्या महिन्यात काही निमित्ताने सिंगापूरला जाणार आहोत. तिथून पुढे बँकाँकला जायचा प्लॅन आहे. तर तिथे रहात असणार्‍या, राहून आलेल्या, फिरुन आलेल्या मैतरणींनो, मला सांगा चुकवू नये असे आणि चुकवावे असेही :P जे काय असेल ते. खाणे-पिणे, फिरणे, शॉपिंग सगळ्याबद्द्ल...

Keywords: 

सृजनाच्या वाटा: तमसो मा ज्योतिर्गमय

नमस्कार,

Party मैत्रीणच्या सर्व सदस्यांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!! Party

छोट्याश्या ब्रेकनंतर सृजनाच्या वाटा उपक्रम पुन्हा येत आहे - दिवाळीची रोषणाई घेऊन!
ह्या महिन्याचा आपला विषय आहे 'तमसो मा ज्योतिर्गमय'... अंधकाराला दूर सारणा-या प्रकाशस्रोताबद्दल ह्या महिन्यातल्या सृवामध्ये लिहूया.

अचपळ मन माझे...

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परमदीनदयाळा निरसी मोहमाया |
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजवीन शीण होतो धाव रे धाव आता ||

Keywords: 

वळण

||वळण||
हां इथेच असायला हवं
जरा पुढे जावून बघुया
अरे हेच की ते वळण
ओलांडल की सापडेलच!
दिसेल तुला
तुझं नी माझं
अरे काय म्हणून काय विचारतोएस?
काहिही सापडेल
काहिही दिसेल
काहिही असेल
पण जे असेल ते फक्त
तुझं नी माझं असेल
चित्र दिसेल कदाचित्
तुझ्या माझ्या मिठिच्या
गहिऱ्या रंगात रंगलेलं!
किंवा गाणं ऐकू येईल
तुझ्या माझ्या विरहाच्या
आर्त सुरात भिजलेलं!
आपल घरही असेल तिथेच
आठवणिंची एक एक वीट
ठेवून रचलेलं.
पाऊस भेटेल तिथेच
धो धो कोसळणारा
तुला मला अज्जीब्बात न भिजवणारा
पण आडोशाला एकमेकांजवळ ढकलणारा
तू ये तर खरं
शोध ना जरा
मी फिरतीये तिथेच गोल गोल
आपली भांडणं

कविता: 

शेरलॉक होम्स साकारणारा शापित यक्ष

(हा लेख मायबोलीवर जेरेमीच्या मृत्यूदिनी प्रकाशित केला होता.यात आता काही डिटेल्स अजून टाकले आहेत.या माणसाबद्दल जितकी माहिती मिळवतेय तितका तो मला जास्त आवडतोय.)

१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला २१ वर्षं होतील.अजूनही जुने बी.आर.चोप्रा महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
JB_1.jpg

Keywords: 

लेख: 

सृजनाच्या वाटा - तमसोs मा ज्योतिर्गमय.

मस्त कलाकृती!

ही एक माझी पणती. बर्‍याच दिवसांनी परवा पेन्सिल्स हातात घेतल्या. स्ट्रेसबस्टर प्रिझ्माकलर पणती, हिने एकदम मनातली मरगळ दूर केली. :)

_20161026_085940.JPG
तमसोs मा ज्योतिर्गमय! मैत्रिणींना दीपावलीच्या शुभेच्छा!

सृजनाच्या वाटा - तमसो ंमा ज्योतिर्गमय

नुकताच दिवाळीसाठी केलेला tealight holder

झाले असे कि मला आईने ह्या दोन बरण्या घेऊन दिल्या होत्या..आहेत साध्याशाच पण आईने दिलेली गोष्ट पटकन टाकायचे जीवावर येते...वापरून त्याची प्रेसची झाकण खराब झालेली..
तेव्हा आसे काहीतरी करून बघावे असे डोक्यात आले

लागणारे साहित्यंः ग्लिटर ग्लू , ग्लिटर टेप

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle