October 2016

दागिने - स्वनिर्मित - मिनू

नवरात्र चालू आहे आणि लवकरच दिवाळी सुद्धा येईल. खरेदी चालू झाली असेल ना? साड्यांवर मॅचिंग दागिने नकोत का मग? बघा बरं आवडताहेत का? कोणाला हवे असतील तर सांगा. वेगळे कलर सुद्धा मिळतील. आत्ता जे तयार आहेत ते इथे अपलोड केलेत. जसजसे बनवेन तसे इथे अपडेट करेन.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

आसाममधील वीरांगना - मूला गाभरु

मूला गाभरु

शाळेत भारताचा इतिहास शिकलो पण उत्तर पूर्व राज्यांचा इतिहास, तिथले राजे ह्याबद्दल शिकल्याचं काही आठवत नाही. आसामच्या इतिहासाबद्दलची माहिती साधारण इ.स. चवथ्या शतकानंतरची उपलब्ध आहे. आसाममध्येही भारतातील इतर राज्याप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्यकर्त्या व योध्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती आढळत नाही. अश्याच एका अपघाताने, बदलेच्या भावनेने बनलेल्या लढवैय्या स्त्रीची कहाणी.

Keywords: 

लेख: 

माझे भरतकाम, विणकाम इत्यादी.

कुडत्यावर केलेले भरतकाम

क्रोशे डॉयलीज् आणि त्यांची बास्केट

Keywords: 

कलाकृती: 

मोगऱ्याचा गजरा

***मोगऱ्याचा गजरा***
तिला मोगऱ्याचा गजरा खूप आवडायचा ...
केसात माळला नाही तरी गाडीत, पर्समध्ये कुठे ना कुठे गजरा दरवळतच असायचा कायम ...तिच्या अवती भोवती...
आज तर काय डोहाळ जेवण होत तिचं ...
वेणी लगडली होतीच मोगऱ्याने... पण तिला आवडतो मोगरा म्हणून पूर्ण वाडीच मोगऱ्याची मागवली होती... खास तिच्यासाठी!
आज्जी कौतुकाने म्हणाली...
"घे हो माळून मोगरा... पुन्हा लेकरु अंगावर पित राहील तोवर वासही घेता नाही येणार फुलांचा."
आज्जीचं आपलं काही तरीच... ती मनात पुटपूटली...
"असं काही नसतं ग आज्जी" , म्हणायचं होतं तिला, पण हातात मोगरा गोवता-गोवता विसरलीच ती... ...

Keywords: 

लेख: 

भेट

अस काय होत तुझ्या माझ्यात?
कधी कोणता आव नाही
कधी ओढा ताण नाही
कसं अलगद जपलेलं
कातर हळवं नितळ स्वच्छ नातं.
इतक नकळत जपलेलं की
काय जपतोय हे ही न कळावं?
इतक घट्ट सामावलेलं
की तुझं दूर असणंही न जाणवावं!
आणि मग झालीच आपली भेट
तू होतासच माझ्यात
अन् मी ही तुझ्यात
न भेटता न बोलता सामावलेलं
अस्तीत्व आपलं एकमेकांत
ती आपली भेट
देऊन गेली भेट
तुझी मला नि माझी तुला!

कविता: 

सांग ना...

( प्राची रेगेची ही कविता वाचून झब्बू द्यावासा वाटला. म्हणून ही कविता, १९८८मधे झालेली, त्या वयानुरुप बाळबोधच आहे Heehee पण घ्या चालवून)

तुझ्या डोळ्यातली स्वप्नं
मलाही दिसावीत...
चांदण्यांनी तुझाही हात
पोळला जावा
असं का व्हावं
आपल्या भेटीत?

तुझ्या गाडीचा ते
धुंद वेग
माझ्या केसातला तो
गंधीत मरवा
नागमोडी रस्त्याची
मायावी वळणे
घनदाड झाडांची
वेडी माया... सांग ना...

तनमनातून आलेले
तुझे शब्द
भावनांनी ओथंबलेले
माझे सूर
अस्वस्थ करणारी
तुझी नजर
"आवर ना" म्हणणारी
माझी वीज...सांग ना...

वाळूवर उमटणारी
भरीव गाज

कविता: 

बोल ना!

बोल ना रे बोल ना काही

उन्हाची तिरीप किंवा धुक्याची दुलई
सडा सांडली बकुळी किंवा शुभ्र जाई जुई
बोल ना रे बोल ना काही

सुचलेले काही किंवा अव्यक्तसे काही
रोजच्याच गोष्टी किंवा नवी नवलाई!
बोल ना रे बोल ना काही!

मनीचे चांदणे किंवा नभाची निळाई
तुझे माझे क्षण किंवा जुनीशी अंगाई
बोल ना रे बोल ना काही

Keywords: 

कविता: 

अबोलीचं वन

कैद करतोस माझे शब्द
तुझ्या स्पर्शाच्या वळणांनी
नि फुलवतोस अबोलीचं वन!

माझ्या जवळचे सारे
स्पर्शमणि काबिज करून,
हवे तसे झुलवून;
माझ्या बंद पाकळ्या
पुरेपूर सुगंधित करून,
कठिण करून टाकतोस
सारं काही...

काठावर उभं राहणं,
... झोकून देणं,
वा वाहून जाणं ही...!

कविता: 

चांदण्यात फिरताना

Location:
स्नेह पार्क च्या 1bhk flat.ची bedroom
Property:
जूनं godrejच लोखंडी कपाट... त्यावर उंच ठेवलेला National Panasonic चा टेप रेकॉर्डर... त्यात असलेली आशा भोसलची "नक्षत्रांचे देणे" casset ...
पात्र:
मी (साधारण 5व्या इयत्तेत) पियूष (3 वर्षाने लहान भाऊ) आणि बाबा
आई स्वयपाक घरात (पोळ्या लाटण्यात busy)
::::
रात्रीचे 8 वाजले असतात...
पियूष कपाटा समोर stool ठेवून उभा...
बाबा harmonium घेऊन सज्ज...
रेकॉर्ड वर गाणं सुरु करायला सांगतात....
Stool वर उभा राहुनही पियूषचा जेमतेम play button पर्यन्त हात पोचतो...
आणि गाणं सुरु होतं....
चांदण्यात फिरताना.............

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle