October 2016

पुरेसं

पायवाट नेहमीचीच
फक्त पाऊस
तो, वेगळा होता...

तू थोडा पुढे, मी मागे
अन मधेच एक
छोटासा ओहोळ...

मागे वळून,समजून
तू नुसता हात
पुढे केलास...

बस, तुझं नुसतं
तिथे असणंही
पुरेसं होतं

सगळं...
अगदी सगळं
पार करायला!

कविता: 

मौन

नि:शब्द सांजशा वेळी
तनू छेडीता धून
मौनाशी बोलते माझ्या
तुझे बोलके मौन

अस्पर्श मनीचा डोह
उठता झंकारून
तरंगातूनी त्यांच्या
हि तान घेतसे मौन

सुरावटींचा साज
लेवून गातसे मौन
निश्वासाचे अर्थ बघ
कसे सांगते मौन

अक्षय गाणे अपुले
हि अद्वैताची खुण
बोलक्या तुझ्या मौनाचे
कसे फेडू मी ऋण?

अवल आणि प्राची तुम्हा दोघींना हा माझा झब्बू. जुनीच आहे पण तुमचे सांग ना, बोल ना आणि अबोलीच वन वरुन आठवली

शिकवे...

न जाने कितने शिकवे दबें दील में
जो होंठों तक आ न सके ....
अफ़सोस इस बात का नहीं उन्होंने दर्द दियॆ
उफ्फ! ....
हाले दील उन्हें पताभी न चले...

ओढ!

मूक्त गाउन
जगा भांडून
जेंव्हा येईन मी घरी
थोडी त्रासून
दे मीठिचा उबारा
दोन्ही हात पसरुन...
लाज सोडून
भिती तोडून
जेव्हा लागेल ही ओढ
वाट पाहूनं
घे ओढून तू मला
ओठी ओठ मिसळून...
तुझे तापलेले श्वास
मला पूर्णत्वाचा ध्यास
गेले देह सुगंधून
जाऊ काळाच्या पल्ल्याड
सारी माया ओलांडून!

........
कविन ची मौन
आणि अवल ची अबोलीचे वन ला
माझा झब्बू!!!

भेट

लग्नात खूप भेटवस्तू मिळतात... काही संसाराला उपयोगी... काही सजावटी साठी आणि बऱ्याचश्या नटण्या मुरडण्या साठी ....
पण काही भेटी इतक्या अमूल्य असतात की त्या तुम्हाला आयुष्यभर सोबत करतात.... इतक्या अमूल्य असतात की तुमची हरवलेली ओळख समोर आणून ठेवतात....
माझ्या लग्नात बाबांनी ठरवल होत काही देणी घेणी नाही करायची. आहेर घ्यायचा नाही . फक्त एकच अपवाद ठेवला.... स्वत:हून...
"मिलींद दादा कडून त्याच सगळं शास्त्रीय / उपशास्त्रीय संगीताच collection घ्यायच ! "

Keywords: 

श्रीमंत

वाईचा कृष्णाघाट
त्रिपुरी पौर्णिमेची रात
तू आणि मी आणि
कृष्णेच्या गाभ्यातल्या
किती साऱ्या आभा ...

मिणमिणणाऱ्या पणत्या,
आकाशातल्या तारका,
अन कृष्णे मधे उतरलेले
त्यांचे मंद मंद
प्रतिबिंब...

तुुझ्या-माझ्या डोळ्यामधी
तेवणाऱ्या ज्योती
मनातला जादुभरा
कसा आसमंत
लख लख श्रीमंत!

कविता: 

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.....

माझे आई-पप्पा गणपती, महालक्ष्मी व्यवस्थित पार पाडून, सगळ्यांच्या भेटी घेऊन, मुंबईला ताईकडे २ दिवसाचा मुक्काम करून शुक्रवारी रात्री १६ सप्टेंबरला सुखरूप लंडनला पोहोचले. बरोबर माझा काका पण आला होता कारण त्याला पुढे अमेरीकेला जायचे होते त्याच्या मुलांकडे.. म्हणुन आम्ही त्याला लंडनला ब्रेक जर्नी करून पुढे जा, असा हट्ट केला होता.. त्या निमिताने त्याला माझ्याकडे राहता येईल, लंडन पाहता येईल, असा प्लानच होता.
हा प्लान तर व्यवस्थित आणि सुखासु़खी झाला.. पण पुढे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जिथे आमचं काहीच चाललं नाही..

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle