ऑफिसच्या गडबडीत काही रंगवणं शक्य नव्हतं, म्हणून एक फटाफट डूडल करायचा प्रयत्न केला.
हे माझं पहिलं डूडल :)
सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! अश्याच चमकत रहा
न्या 'कर्ती' झाल्या पासून मला दिवाळीत अत्यंत महत्वाच डिपार्टमेंट मिळालं आहे .... रांगोळी काढून झाली , कंदील करून झाला की पसारा आवरणे, मधेमधे लुडबूड करून फोटो काढणे ...रंगोळीवर सक्त पहारा ठेवणे, यात मुख्य काम रांगोळीला न्या कडून वाचवणे ...बाकी चिल्ली पिल्ली इतकी खतरनाक न्हायती :ड ...रांगोळी च्या रंगात रंगलेल्या न्या ला 'धुवून' ( i wish तुमच्या मनात जो अर्थ आलाय तो असता :winking: )ओळखण्या लायक बनवणे
माझ्या कामाचा पाढा वाचावा तेवढा कमीच :uhoh: सो आपण मुख्य विषयाकडे वळूया...
ह्या आम्ही रंगवलेल्या पणत्या
ऑफिसात दिवाळी निमित्त रांगोळी, पोस्टर आणि पॉट पेंटिंग स्पर्धा झाल्या.थिम होती फेस्टेव्हल ऑफ लाईट्स....
रांगोळी आणि पोस्टरात पहिला नंबर आला. पॉट मधे का नाही मिळालं ही एक मिस्टरीच आहे. सगळे पॉट्स माझ्या पॉट पुढे बेक्कर दिसत होते खरं तर :sigh:
पोस्टरचा फोटो मिळत नाहीये... सापडला की एडिटते..
असो....! हे बघा... शेवटून तिसऋया फोटोतली रांगोळी प्रितीने घरी काढलिये... त्यानंतर माझी अमेरिकेतली लक्ष्मी पुजा आणि घरा बाहेर लावलेले दिवे (हे दोन फोटो टाकायला हवेत असं काही नाही पण माझंच मला बळंच कौतुक म्हणुन टाकतेय् )