May 2017

गुळपापडी (वड्या/लाडु)

साहित्यः-
२ वाट्या कणीक (जाडसर असेल तर उत्तम),
१ वाटी तूप,
१ वाटी अगदी बारीक चिरलेला/ किसलेला गुळ
वेलची /जायफळ पूड
थोडसं दुध

(optional) वरील प्रमाणाला प्रत्येकी १ टे.स्पु.
तळलेला डिंक पूड करून,
सुकं खोबर भाजून पूड करून,
ड्रायफ्रुट पावडर
खसखस भाजुन पुड करुन

कृती:-
एकदम सोप्पी कृती आहे. सगळी तयारी करुन हाताशी ठेवा.
जाड कढईत तुपात अगदी मंद आचेवर कणीक भाजायला घ्या. सतत कालथ्याने हलवुन भाजत रहायला हवी, खमंग वास आला रंग बदलला की मग दुधाचा हबका (जसा लाडू करताना बेसन भाजल्यावर) मारा. याने कणीक रवाळ होईल.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

ImageUpload: 

माझ्या आठवणीतील रिमा

सिनेमा पाहून तो समजायला लागल्यावर रिमांना पहिल्यांदा पाहिले ते सलमान खानची आई म्हणून. नवऱ्याच्या विरोधात जाऊन स्वत:चे कंगन काढून लेकाच्या हातात देणारी आई हिंदी चित्रपटात तेव्हा फारच वेगळी पण खूप छान वाटली होती. आईने कसे कायम दु:खी आणि सोशिकच असले पाहिजे ह्या परंपरागत प्रतिमेला छेद दिला तो रिमांनी. त्यांच्यामुळेच तर स्वतंत्र विचारांच्या, आधुनिक आणि आनंदी आया प्रेक्षकांनी स्वीकारल्या. एक वर्षानुवर्षांची परंपरा मोडून काढणे हे कर्तृत्व मोठेच पण तेवढीच त्यांची ओळख नाही. त्या एक अतिशय ताकदीची अभिनेत्री होत्या हे मला खूप नंतर त्यांचे इतर सिनेमे / मालिका पाहिल्यावर कळले.

लेख: 

ImageUpload: 

७० mm : आठवणींचा फ्लॅशबॅक

घरी पेपरातल्या जाहिराती वाचून, मोठेमोठे प्लॅन्स करून, तयार होऊन, रिक्षात बसून नाहीतर स्कूटरवर ट्रिपल सीट जाऊन, रांगेत थांबून, तिकीट हातात आलं की आता पिक्चर! आता पिक्चर! म्हणून पोटात फुलपाखरं उडायला लागायची :fadfad: तीच आपली जुनी थिएटर्स आणि तो माहोल पुन्हा जागवूया फ्लॅशबॅकमध्ये जाऊन.. लिहूया आपल्या लहानपणापासूनच्या मोठ्या पडद्याच्या आठवणी :)

Keywords: 

शोध स्वतःचा

मी माझ्यातल्या 'मी' ला शोधतेय,
पण मला सापडतंच नाहीये 'मी'.

कधी 'मी' च मला वाटते,
अनोळखी आणि परकी,
तर कधी अतिपरिचित.

कधी शांत, स्वत:मध्ये मग्न,
बाहेरच्या जगापासून दूर,
तर कधी प्रचंड कोलाहालात हरवलेली,
असंख्य विचारांच्या चक्रात,
गिरक्या घेणारी.

ह्यातली नक्की 'मी' कोण?
मलाच माहित नाही.

कारण मी अजून स्वतःला शोधत आहे.

प्रेम

जाब तुला देणार नाही
विवरणे पुसणार नाही
प्रश्न आणि उत्तरांच्या
व्यूहात मी शिरणार नाही

वचने तुला देणार नाही
वायदे ऐकणार नाही
आश्वासनांची भूल मी
स्वत:स कधी देणार नाही

बंधनात अडकणार नाही
कैद तुला करणार नाही
स्वातंत्र्यात आहेस तू
परतंत्र मी होणार नाही

कबुली मागणार नाही
प्रमाण तुला देणार नाही
प्रेम आहे माझे तुझ्यावर
ते सिद्ध मी करणार नाही

कविता: 

कळी

कळी ..........

कळी कोवळी
फुले पाकळी पसारा
खुले चेहरा हसरा
डुले देठ आसरा
बोले सरा, मागे सरा .......

खट्याळ गोजिरी
अर्धोन्मीलित साजिरी
लपे पानाड लाजरी
कुजबुजली वल्लरी ....

झोंबे थंडगार वारा
लागे चाहूल भ्रमरा
नि वास फुलपाखरा
माय कुर्वाळी लेकरा ..........

खुडे कोणी ऐरागैरा ?
बरा काटेरी पिंजरा
फुले ती दहा बारा
देती भवती पहारा ............

मग कळीस कळले
कसे फुलून जगावे .................

कविता: 

आठवणी

रेंगाळता तिरी मनाच्या
आठवांच्या अंगणी
बागेत त्या फुलांचा
धुंद गंध पेरला

रम्य कल्पना मनी
शुष्क आता जाहल्या
गोडी नव्याची सरता
पारिजात कोमेजला

जाहले शब्द मुके
जखमा त्या विखारी
हळव्या क्षणी त्या
उठता पुन्हा उरी

ओल्या पुन्हा नव्याने
आता नको अंतरी
होऊ दे आतातरी
ते भास चांदण्याचे!

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle