May 2017

अनुभवसमृद्ध बनवणारा प्रवास – बाली

प्रवास आपल्याला अनुभवसमृद्ध बनवतो. वेगवेगळे प्रदेश, तेथील संस्कृती, चालीरीती, किंवा भेटलेली माणसे खूप काही शिकवून जातात. सगळ्याच गोष्टी कोणी सांगून शिकायच्या नसतात, काही गोष्टी या निरीक्षणातून शिकायच्या असतात. जर तुमची निरीक्षण क्षमता चांगली असेल ना; तर एक साधा प्रवाससुद्धा बरंच काही शिकवून जातो. दोन वर्षापूर्वीचा बालीचा प्रवास माझ्यासाठी खूप काही शिकवणारा ठरला. बाली हे इंडोनेशिया द्वीपसमूहातील एक बेट आहे. या बेटाची राजधानी आहे देन्पासार. दुबई वरून प्रथम सिंगापूरला आणि तिथून बालीला गेलो.

Keywords: 

फिर भी...

कुछ अरमाँ बिखरे से,
कुछ दील टूटे से,
फिर भी चाहत बसती रही....
............. हर इंसान में ।

कुछ आँसू सूखे से,
कुछ दर्द ठहरे से ,
फिर भी मुस्कान खिलती रही....
........ हर चेहरे पे ।

कुछ ख़्वाब अनदेखे से,
कुछ ख्वाहिशें अधुरी सी,
फिर भी ज़िंदगी चलती रही...
.................. अपनी रफ़्तार से ।

कविता: 

टर्कीश कबाब आणि पिडे - खाऊगिरीचे अनुभव ४

मागच्या कोणत्यातरी लेखात मी म्हटले होते की टर्कीश कबाब ही ऑस्ट्रेलियाची खासियत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या गेल्या पहिल्या एक-दोन दिवसांमध्येच कबाब आणि पिडे ह्या दोन्ही पदार्थांशी माझी ओळख झाली. ऑस्ट्रेलियात गल्लोगल्ली टर्कीश कबाब शॉप्स आहेत (म्हणजे तेव्हा होते) अगदी स्वस्तात मस्त पोटभरीचे जेवण म्हणजे कबाब किंवा पिडे. टर्कीश कबाब खाण्याआधी मला कबाबचे विविध प्रकार असतात हे माहित नव्हते. कबाबचा अर्थ भाजलेले मांस हेही माहीत नव्हते!!! मांस भाजायच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक देशामध्ये कबाबचे विविध प्रकार आहेत. सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे शिश कबाब आणि डोनर कबाब. हे दोन्ही प्रकार टर्कीश आहेत.

ImageUpload: 

शांतता

आजुबाजूला कसलाही आवाज नसतानासुद्धा बोलते ही शांतता.
ऋतुनुसार भाषा बदलते ही शांतता.
हो! शांतता बोलते ! कधी तुम्ही ऐकले आहे का हे शांततेचे बोलणे?
मी ऐकले आहे. निदान पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुमध्ये तरी.
काही दिवसांपूर्वी मी ऑफिस मध्ये बसले होते. बाहेर किमान ४४ ते ४५ डिग्री तापमान असावे. रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती. अधूनमधून काही गाड्यांची ये जा चालू होती पण ती ही गाडीतील एअर कंडिशनर चालू ठेवूनच. मी काही कामासाठी ऑफिसच्या बाहेर पडले आणि माझ्या गाडीकडे चालत निघाले होते. त्यावेळी मला जाणवले की उन्हाळ्यातील शांतता ही पावसाळ्यातील शांततेपेक्षा खूप वेगळी असते.

Keywords: 

लेख: 

डोळे हे जुलमी गडे...

हा नवीन छंद लागलाय आम्हाला :ड
माध्यम : पेन्सील कलर

IMG-20170511-WA0006.jpg

ओळखा पाहू आम्ही कोण?

IMG-20170511-WA0005.jpg

Keywords: 

कलाकृती: 

अदभूत दिवस

अदभूत दिवस

दामिनी तळपती कडाडून
दाट गडद काळ्या जलकुंभातून
दावी नृत्यकला दशदिशातून
दान गान अमृत धारांचे ||
मदमस्त पवनारूढ मेघ पलटण
मजल दरमजल कूच करणं
मनसुबा, टपाटप करू आक्रमण
महीवर पाट वाहिले ||
लेकुरवाळेनदी-नाले वाहती
लेणी हिरवी ल्याली क्षिती
लेखाजोखा आनंदाचा वर्णू किती
लेशमात्र मळभ नाही उरले ||
रेशीम स्पर्श होता नव सूर्याचा
रेणूरेणूत पूर नव चैतन्याचा
रेखीव कलात्मक ढंग निसर्गाचा
रेतीत चमकले शंख-शिंपले ||
खारा वारा साद देई नारळी पोफळीस
खाजगीत सांगे संदेश मयंकास
खाणा खुणा करी सागरास
खाशी गंमत, अदभूत घडले ||

कविता: 

ती राधा होती, हरीच्या अधरी...

मोरपिसातुनि हळूच आली
मऊ, गार झुळूक जराशी
उधळीत स्वप्ने सप्त रंगी
राधेची अलवार ओढणी

कुरळ्या कुंतला मधुनि सुटुनि
घुंगुर माळा होऊनि बसली
चाल जराशी घुंगुरवाळी
राधेच्या सुकुमार पाउली

पितांबरीचा रंग सोनसळी
उन कवडसे लख्ख चमकति
झरझर झर झर येती खालति
बरस बरसले राधेच्या कांती

मधाळ भाव श्रीहरीच्या वदनी
निल गडद मेघांच्या मधुनि
भोर काळ्या मिटलेल्या डोही
काजळ काळे राधेच्या नयनी

अन मुरली मधून पाझरली ती
नव्हती दुसरी तिसरी कोणी
तीच हळूवार उतरली होती
ती राधा होती, हरीच्या अधरी...

कविता: 

पाऊस

रात्रभर मस्त पाऊस पडून गेला होता आणि अजून हि थोडी रिमझिम चालूच होती. हवेत मस्त गारवा आला होता. विचार केला आज थोडा निवांत चहाचा आस्वाद घ्यावा, थोडा पेपर वाचवा आणि मग ऑफिसला जायला निघावे, तसेही काही अतिमहत्वाचे काम वाट बघत नव्ह्ते. थोड्या वेळात ऑफिसला जायला बाहेर पडले, आणि लक्षात आले की आज पाऊस जरा जास्तच आहे. रस्त्यावर जागो जागी पाणी साचले होते. काही गाडीवाले जोरात गेल्याने अंगावर उडणाऱ्या पाण्यापासून पादचारी आपला बचाव करत होते. शाळेत जाणारी काही मुले बसची वाट बघताना पावसात भिजत होती आणि त्यांच्या आया (आई या शब्दाचे अनेक वाचन) त्यांना ओरडत होत्या.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle