नेल्सन हा आमचा क्लीनर( घर सफाईला येणारा मदतनीस) ! पंधरवड्यातून एकदा असा गेली ७-८ वर्ष तो आमच्याकडे येतोय - यावरूनच हा माणूस किती चिवट असावा याचा अंदाज येतो! दर वेळी तो यायच्या आधीची माझी भीती....एखादं मोठ्ठं वादळ नुकतंच धडकून गेल्यासारखा घराचा अवतार बघून हा त्याचं चंबू-गबाळं आवरून नक्कीच त्याच्या मूळदेशी - होंडुरसला पळून जाणार! नेल्सन काही परत आपल्याकडे येत नाहीये. पण तो येतो. परत परत येतो...पोटापाण्याकरीता माणसाला काय-काय करावं लागतं नाही...?
हाय मुलींनो.. मी आता एवढ्यातच एक पुस्तक वाचून पूर्ण केलं. कविता महाजनांचं ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’. याआधी त्यांची दोन पुस्तकं वाचली होती, ब्र आणि भिन्न. कविताच्या पुस्तकांतून दरवेळी काही तरी वेगळं मिळतं म्हणून मी आवर्जून पुस्तकं खरेदी करते.
तर तो दिवस आला. म्हणजे तसा तो नेहेमीच येतो. पूर्वी त्या दिवसाच्या, त्याला भेटायच्या कल्पनेने सुद्धा माझ्या छातीत धडकी वगैरे भरायची, पण अलिकडे मी त्यावर मात केली होती. म्हणजे मी नेटाने त्याला सामोरे जायचे. अर्थात त्यात माझ्या धाडसाचा वाटा कमी आणि त्याच्या चांगुलपणाचा जास्त होता. पण ते असो. तर अपरोल्लिखित "तो" म्हणजे माझा केसकापक. "वाहनचालक", "परवानाधारक" सारखे "केसकापक" का नसते?
आपण बोललो
भेटलो
स्वप्न पाहू लागलो;
वाटलं सापडलच मला माझं Wonderland;
तुझ्यात!
मग ती नव्याची सर ओसरली
Wonderland सारखं काही दिसेना तुझ्या डोळ्यात.
मग वाटायला लागल तू तो रस्ता असणार
मला माझ्या Wonderland कडे नेणारा
पुन्हा नवा उत्साह त्या अस्फुटा कडे धावण्याचा
चकवा लागल्या गत मी गोल फिरून तिथेच पुन्हा
Wonderland न सापडलेली Alice!
तू फक्त नव्याने दुःखाचं कारण होत राहीलास
मग अगदी अगदी वीटच आला या दुखावलं जाण्याचा
आणि
मी काढून घेतले हक्क मला दुखवण्याचे
तुझ्या कडून,
घरा कडून,
आपल्यां कडून,
परक्यां कडून
आणि
अगदी स्वतः कडून सुद्धा!
पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी .