May 2020

शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग १

गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.

Keywords: 

चर्चाविषय: 

आईसलँड

आईसलँड हे नाव मी सुमेधकडून ऐकल्याचं मला आठवतंय ते साधारण ३-४ वर्षांपूर्वी. तो म्हणाला होता की मला आईसलँडला जायचं आहे. त्याला इज्राईलपासून तर केनिया, अफगाणिस्तान किंवा अजून कुठे कुठे जायचं असं तो एरवीही म्हणतो, त्यामुळे या आईसलँडकडे मी त्यावेळी नुसतंच एका कानाने ऐकून दुसर्‍याने सोडुनही दिलं. मग कधीतरी फेसबुक वर फोटो पाहिले, तेव्हा अजून थोडी माहिती शोधली, छान दिसतंय सगळं, शेंगेन देशांमध्ये असाल तर वेगळा व्हिसा लागत नाही या नोंदी मात्र नकळतपणे घेतल्या गेल्या, पण विषय तिथेच संपला. एक तर माझा भूगोल कच्चा, त्यामुळे हे आईसलँड नेमकं कुठे, तिथे पर्यटनासाठी काय आहे हे काहीच मला माहीत नव्हतं.

Keywords: 

शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग २

पहिल्या भागाचा दुवा: भाग १

भाग २ आपल्याला कोठे जायचे आहे?

यामध्ये एकूण चार उद्दिष्ट मांडावीशी वाटतात.

Keywords: 

चर्चाविषय: 

साहबजादे

'I suppose in the end the whole of life becomes an act of letting go, but what always hurts the most is not taking a moment to say goodbye.'

त्याच्या शेवट्च्या क्षणाला हे किती खरं ठरलं..

तो जाणार हे काही काळ आधीच कळलं होतं खरं तर.. पण तरी त्याचं जाणं चटका लावून गेलंच. कमालीचं उदास करुन गेलं..

पण मागे वळुन पाहताना दिसतो तो सगळ्यांच्या प्रेमानं तृप्त झालेला इरफान... नॅशनल अवॉर्ड घेऊनही पाय जमिनीवर असलेला साधा सोपा इरफान.. अनेक हॉलीवुड पटात काम करुनही कधीही हिरो न होता ‘शेवटपर्यंत कलाकारच राहिलेला’ इरफान..

Keywords: 

लेख: 

आरोग्यसेतू ऍप

भारतात राहणाऱ्या मुलींनो..

तुमच्यापैकी कोणी आरोग्यसेतु ऍप डाउनलोड केले आहे का?

मी नवऱ्याच्या मोबाईलवर बघून गुगल प्ले स्टोर वरून आजच डाउनलोड केले.

ऍप कार्यरत करण्यासाठी:

१. डाउनलोड करण्यासाठी फार जागा आणि इंटरनेट स्पीडची गरज पडली नाही. ऍपची साईझ फार नाही.

२. डाउनलोड केल्यावर नाव व नंबर मागितला गेला व ओटीपी द्वारे कन्फर्म केला गेला.

३. नंतर काही आरोग्य विषयक प्रश्न विचारले गेले ज्याची खरी व प्रामाणिक उत्तरे देणे अपेक्षित होते.

४. त्यांनतर ऍप सुरू झाले. त्यात महाराष्ट्र आणि देशातली रिअल टाईम आकडेवारी अपडेट होत होती.

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग १९

सिनियर केअर होममधल्या जॉबची माझी एक आठवड्याची रजा अजून एक आठवडा वाढली आणि त्यामुळे घरी असल्याने डायरी लिहिली गेली नाही.

आज दोन आठवड्यांनी पुन्हा कामावर जाणे सहाजिकच जीवावर आलेले होते. मात्र आज्जी आजोबांना भेटण्याचीही उत्सुकता होतीच. आजपासून लॉकडाउनची बंधनं रिलॅक्स केलेली असल्याने रस्त्यावर आणि ट्रॅममध्येही थोडे जास्त लोक दिसले.

कामावर गेल्या गेल्या ऍडमीन कलीगने सांगितले, "बॉसना तुझ्याशी बोलायचे आहे, तर राऊंडला जाण्याआधी त्यांना जाऊन भेट."

चांदणचुरा - १

"मनीssषा, विथ टू 'ई'ज अँड टू 'ए'ज" तिच्यासमोरची हिऱ्यांनी मढलेली मध्यमवयीन बाई तिला मोठ्या आवाजात सांगत होती.

"ओकेss गॉट इट" म्हणून सवयीचे खोटे हसू चेहऱ्यावर आणत उर्वीने हातातल्या नोटपॅडवर बरोबर नाव लिहून अंडरलाईन केले. टू 'ई'ज अँड टू 'ए'ज वाल्या मनीषा मेहताने आत्ताच एका चिवित्र पेंटिंगवर दोन लाख रुपये वाया घालवले होते. ठिके, चांगल्या कारणासाठी दिले पैसे, पण तिला तिचं नावपण बरोब्बर स्पेलिंगसकट उर्वीच्या लेखात छापून आणायचं होतं.

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा - २

भाग - १

केबिनबाहेर पडल्यावर तिने पुस्तक उलटसुलट करून, उघडून बघितले. त्यात लेखकाचा फोटो किंवा इमेल, पत्ता वगैरे काहीही छापलेच नव्हते. नशीब नाव तरी लिहू दिलं या माणसाने! मनात म्हणत ती अनाच्या क्यूबिकलसमोर थांबली. अनाचं दिसणं सोडता ती तिवारी नाही अगदी गटणेच वाटेल. तसा चौकोनी काळ्या फ्रेमचा अर्थात स्टायलिश चष्मा तीही लावतेच. बारीकसं हसत ती अनाशेजारी जाऊन तिच्या डेस्कला टेकली.

"अना, एक बात पूछनी थी.. आदित्य संत करके एक बंदा है, नाम सुना है कभी?"

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा - ( लेखमालिका १ )

हे असं चालणार नाही' आदित्य मनोमन ठरवत होता. उर्वी इथे अचानक येऊन थडकली हे त्याला अजिबात पटले नव्हते. ती दिसल्यावर तिला घरातच घ्यायचे नव्हते पण ती इतकी थकलेली, गारठलेली होती की शेवटी तिला उचलूनच न्यावे लागले. त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनच नव्हता. ठीक आहे, घरात आली तर आली पण तो तिला कणभरही माहिती मिळू देणार नव्हता. ना तिच्याशी कामाशिवाय काही बोलणार होता. फक्त हो, नाही मध्ये उत्तरे द्यायची आणि वादळ जरा थांबले की लगेच तिला पिटाळून लावायचे हाच त्याचा प्लॅन होता.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle