चांदणचुरा - ५

"तुमने उसे ढुंढ लिया!! सचमे??" फोनवर पलीकडून अना अत्यानंदाने किंचाळत होती. तिचा अजिबात विश्वासच बसत नव्हता.

उर्वी शिमला एअरपोर्टवरच्या तुरळक गर्दीतून एका हाताने आपली ट्रॉली बॅग खेचत, दुसऱ्या हातात सेलफोन धरून अनाला उत्तरे देत होती. बॅगेज क्लेम करून गुळगुळीत फरशीवर तिच्या मिडीयम हिल्स टॉक टॉक वाजवत ती पटापट दाराच्या दिशेने निघाली होती.

"अभी तक ढुंढ नही लिया, बट आय एम क्लोज!" मान वाकडी करून फोन धरत एकीकडे पर्समध्ये काहीतरी शोधता शोधता ती म्हणाली.

"हॅ? और आप हो कहां मॅडम?" तिने लगेच विचारले.

"शिमला एअरपोर्ट! चिटकूल के लिए निकल रही हूँ. आज फ्रायडे है अगर मै मंडेको ऑफिस नही आ पायी तो प्लीज कोई बहाना बना लेना. यहां नेटवर्कमे थोडा प्रॉब्लेम है, मै कॉल या मेसेज करके अपडेट देती रहूंगी."

"क्या क्या क्या?? तुम पहूंच भी गयी, डिमेलो पगला जाएगा जब उसे पता चलेगा." अनाला आश्चर्याचे धक्क्यांवर धक्के बसत होते.

"नो, नो.. अभी उसे मत बताना. अगर सब ठिकसे हुआ और मैने इंटरव्ह्यू लिखा तब फायनली उसे बताउंगी." उर्वीने तिला बजावले.

"ओके! तुम्हारे लिए मेरे फिंगर्स क्रॉस्ड है याद रख और ऑल द बेस्ट!!" अना आज फोनवर किंचाळणे काही थांबवत नव्हती.

"थँक्स! चलो अब रखती हूं, रोमिंग मे हूं." उर्वीने मोबाईल व्यवस्थित प्लास्टिक पिशवीत घालून पर्समध्ये ठेवला. बाहेर प्रचंड थंडी आणि रिमझिम पाऊसही होता. तिने ब्लॅक जीन्स आणि थंडीचा विचार करून पूर्ण बाह्या असलेला पातळ  राखाडी टीशर्ट घातला होता, वर पिवळे ऑल सिझन जॅकेट होते. पण मुंबईत गरम वाटणारे हे कपडे इथे काहीच कामाचे नाहीत हे बाहेर पडताच तिच्या लक्षात आले. जॅकेट ऑल सिझन असले तरी त्यात आता सगळीकडून पाणी आत झिरपू लागले होते. जॅकेटचे हूड डोक्यावर ओढून ती पावसातून जवळ जवळ पळतच टॅक्सी स्टँडकडे निघाली.

आदित्यच्या आईने सांगितल्याप्रमाणे तिने दोन तीन टॅक्सीवाल्यांकडे मां शेरोवाली ट्रॅव्हल एजन्सीची चौकशी केली. पुढच्या चौकातच ते ऑफिस सापडले. ट्रॅव्हल एजन्सी कसली एक लहानशी खोली आणि त्यात टेबल, खुर्ची आणि एक कम्प्युटर होता. सकाळची वेळ असूनही तिथे एकही माणूस नव्हता. तिने आत जाऊन बॅग पायापाशी ठेवली आणि वाट बघायला लागली.

तेवढ्यात तिला बाहेर एक माणूस एका जुन्या मारुती जिप्सीच्या खाली झोपून काहीतरी दुरुस्त करताना दिसला. चला, कोणीतरी माणूस आहे इथे म्हणून ती त्याला विचारायला गेली.

"क्या आप बता सकते है मुझे फतेबीर सिंग कहां मिलेंगे?"

"क्यूँ?" त्याने तिथूनच रांगड्या भारदस्त आवाजात विचारले.

"उनसे बात करनी है, कुछ जरूरी काम है. एक ऍड्रेस चाहीए" ती रागाने ताठ उभी राहत म्हणाली.

तो लगेच बाहेर येऊन तिच्यासमोर फडक्याने हाताचे ग्रीस पुसत उभा राहिला. त्याच्या आवाजाच्या अगदी उलट त्याची पर्सनॅलिटी होती. तिच्यासमोर उंच, किडकिडीत, जीन्स आणि टीशर्ट घातलेला साधारण पंचवीशीचा सरदार उभा होता.

"ऍड्रेस चाहीये? कौन हो तुम?" त्याने डोळे बारीक करत विचारले.

"फतेबीर कहां है वो बताओ." ती त्याचे प्रश्न टाळत म्हणाली.

"कहासे आयी हो? रिपोर्टर हो, है ना?" त्याने फडके बाजूला ठेऊन जॅकेट घालता घालता विचारले.

"तुम क्यू पुछ रहे हो ये सब, पता है तो बोलो. मुझे बहुत अर्जंट काम है उससे. उसके एक दोस्त को कुछ चीज पहूंचानी है." ती कशीबशी शांत रहात म्हणाली.

"दोस्तका नाम?"

"आदित्य संत" तिने आता बेफिकीरीने उत्तर दिले.

"पता था!" खांदे उडवत तो म्हणाला आणि तिथून जायला निघाला.

"हेयss हेलोss रुको, मिस्टर फतेबीर कहा मिलेंगे वो तो बताव!" ती आता ओरडलीच.

"अच्छा! अब मिस्टर फतेबीर!" तो वळून तिच्याकडे बघत कुत्सित हसला.

"देखो मुझे सचमे आदित्य को कुछ देना है."  ती अजिजीने म्हणाली.

"क्या देना है? सरदर्द?" तो पुन्हा भुवया वर करून म्हणाला.

हूं, व्हेरी फनी. तिचा आता पेशन्स संपला होता आणि त्या फतेबीर माणसाचाही अजून काही पत्ता नव्हता. "उसकी माँ ने कुछ भिजवाया है."

"अच्छा? माँजी का नाम बताओ तो". एव्हाना तो रोड क्रॉस करून चहाच्या दुकानासमोर होता आणि ती त्याच्यामागे पळत तिथे पोहोचली होती.

"माया"

आता त्याने तिच्या डोळ्यात रोखून पाहिले, जरावेळ विचार करून शेवटी त्याने बोलायला सुरुवात केली. "फतेबीर सिंग मै ही हूं!"

"तुम हो?" तिने अविश्वासाने विचारले.

"हां तुम्हारे सामने बंदा खडा है" तो रिलॅक्स होऊन जरासं हसत म्हणाला. "हसनभाय, दो चाय और दो समोसे." त्याने हात वरून करून सांगितले.

"अरे मुझे नही चाहीये.. " ती म्हणेपर्यंत त्याने समोश्याची प्लेट तिच्या हातात दिली.

"जब सरदार खिलाते है, तब ना नही बोलना चाहीये." तो हसून म्हणाला.

तिच्या पोटात तसेही एव्हाना कावळे ओरडत होतेच, तिने न बोलता खायला सुरुवात केली.

समोसा, चहा संपवून ते दोघे ऑफिसमध्ये गेले.

"मै उर्वी, उर्वी काळे. मुंबईसे आयी हूँ." ती समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली.

"तुम्हारे जैसे और बहोत सारे रिपोर्टर्स यहां आ के गए लेकीन मैने किसीको घास नही डाली. आदित्यने उसका पता बतानेसे मना किया हुआ है. वो किसीसे भी नही मिलता. लेकीन तुम आंटी का मेसेज ले कर आयी हो इसलीये सुन रहा हूं."

"हां, मुझे आदित्यसे मिलके पर्सनली बात करनी है. तुम मेसेज नही दे सकते. देखो ये उसकी माँ ने उसे देने के लिए दी है." म्हणून तिने पर्समधून अंगठी काढून टेबलवर ठेवली.

त्याने अंगठी हातात घेऊन नीट बघितली, सोन्याची अंगठी आणि आत लिहिलेली VS ही अक्षरे बघून त्याने अंगठी परत दिली.

"अगर मैने तुम्हे पता बताया, तो तुम्हारा या मेरा मर्डर पक्का है. आहो!" तो दाढी खाजवत म्हणाला.

"एक काम कर सकते है मै तुम्हारी कोई टॅक्सी हायर करती हूं. तुम उसे बोल देना ड्रायव्हर लेके गया करके." तिने त्याला ऑप्शन सुचवायचा प्रयत्न केला.

"अभी तो एक भी गड्डी खाली नही है, सिर्फ वो जिप्सी छोडकर. लेकीन वो भी इतना नही चलेगी. उपरसे उधर जोरोंकी बारीश और बर्फबारी हुई है. रोडपर बर्फ गिरी है इसिलिए सारे रोड्स भी बंद है." तो कम्प्युटर ऑन करत म्हणाला.

शिट! मलाही यायला हीच वेळ मिळाली होती. तिने स्वतःलाच चार शिव्या घातल्या.

"फतेबीर, प्लीज कुछ करो. मेरा आजही उससे मिलना बहुत जरुरी है."

"हम्म, एकही ऑप्शन है. हम यहांसे ये जिप्सी लेके निकलते है. सांगला मे मेरा घर है वहा जिप्सी रखेंगे और चिटकूल तक मेरी बुलेट लेके जा सकते है."

"लेकीन.. इतनी दूर बाईकपर... मैने कभी ऐसा ट्रॅव्हल नही किया." एव्हाना तिचा शूरपणाचा आव गळून पडायला लागला होता.

"देखो अगर तुम आदित्य तक पहूंचना चाहती हो तो सिर्फ यही एक रास्ता है. मुझसे डरो मत. ये मेरा लायसन्स चेक करलो. अब डर तो मुझे लग रहा है, आदित्य मुझे मार डालेगा!" त्याने वॉलेटमधून लायसन्स काढून तिच्याकडे दिले.

तिने वाचून ते परत केले. "जाना तो पडेगा... ठीक है." ती खोल श्वास घेत म्हणाली. "चलो चलते है!"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle