कथा

नभ उतरू आलं - ४

शॉवर सुरू करून मी नेहमीचा ब्लॅक रिझर्व्ह बॉडी वॉश उचलला. त्यातला वेलचीचा सटल सुगंध मला नेहमी आईच्या किचनमध्ये उकळणाऱ्या चहापासून खपली गव्हाच्या गोड हुग्गीपर्यंत घेऊन जायचा. पण आज अंगावर त्याचा फेस होऊन पाण्यात विरून जाताना, तो वास जाणवलाही नाही. पलोमाची जखम खोलवर झाली होती आणि इतक्या वर्षांनी तिला जवळ बघून त्या भरलेल्या जखमेची खूण पुन्हा हळवी होत होती. मी थंडगार पाणी जोरात डोक्यावर आदळू दिलं आणि त्या टोचणाऱ्या थेंबांच्या माऱ्यात खालमानेने उभा राहिलो. डोळ्यासमोरून पलोमा बरोबर घालवलेले सगळे क्षण फेर धरून जात होते. ऑफकोर्स, मी वीक झालोय. सगळं काय चाललंय कळत नाही.

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - ३

समर

पलोमाला घेऊन मी पहाटे शार्प साडेपाच वाजता सरनोबतवाडी ग्राऊंडवर पोचलो. रोज सकाळी नऊ वाजेपर्यंत हे ग्राउंड मला प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी दिले आहे. इथल्या सिक्युरिटीमुळे कोणालाही माझ्याबद्दल पत्ता लागू दिला नाहीय, नाहीतर पोरं जाम गर्दी करतील. कुठेही मोकळेपणाने हिंडता, खेळता येत नाही हा सेलिब्रिटी होण्याचा तोटाय राव! तिला दिलेलं घर माझ्या मागच्याच गल्लीत आहे त्यामुळे पटकन पिक करून निघता आलं.

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - २

"ओके! सो.. मला तुम्हा दोघांना आधी भेटवायचं होतं म्हणजे तुम्ही एकत्र बसून आपापलं शेड्यूल मॅच कराल. तुमचं झालं की वेंडी हॉटेलवर परत जाईल, आमचा सकाळचा वर्कआऊट झालाय. आता दिवसभर त्याला काही काम नाही." समरने माझ्यावरची नजर न हटवता सांगितले.

"हम्म, तशीही मी कायम तुझ्या डोक्याजवळच आहे. 24 बाय 7 ऑन कॉल. कोचचा आदेश! सो, मी तुमच्या चालू शेड्यूलशी जुळवून घेईन." मी खांदे उडवले. आय मीन, मला एवढी मोठी रक्कम फक्त तीन महिन्यांसाठी मिळते आहे तर माझा फोकस पूर्णपणे तूच असणार आहेस. तुला जेव्हाही गरज पडेल, मी अ‍ॅव्हेलेबल आहेच.

शक्स, नॉट लाईक दॅट!! मी स्वत:ला मनातच एक टपली मारली.

Keywords: 

लेख: 

नभ उतरू आलं - १

पलोमा

रविवारी सकाळी दादर स्टेशनला कोयनेत बसल्यापासनं छातीत धडधडायलंय. हा जॉब स्वीकारून मी बरोबर करतेय ना? कसे असतील पुढचे तीन महिने? इथपासून ते का जातेय मी परत? कसं काम होईल माझ्या हातून? आणि तो? तो काय विचार करत असेल? असे सतराशे साठ प्रश्न मनात ठाण मांडून डोकं बाद होण्यापूर्वी मी कानात इअरफोन्स खुपसले. विचार बंद!! Deep breath.. deep breath...

स्पॉटीफायवर 'जेमेल हिल इज अनबॉदर्ड' पॉडकास्ट सुरू केलं. आता दिवसभराची निश्चिंती!

Keywords: 

लेख: 

जानेमन

जाने मन - कथा - वृंदा टिळक -एकता दिवाळी अंक 2022

“ ७८६२” टॅक्सी ड्रायव्हरला सावीने कोड सांगितला. टॅक्सी सुरु झाली. सावीने फोनवरचे बोलणे पुढे सुरू केले,” अग हो आई! वेळेत घरी परत जाईन. काळजी करू नकोस. बरं चल.. ठेवते आता .. मला दुसरा फोन येतोय.”

लेख: 

बदतमीज़ दिल - ४४ - समाप्त

सात महिन्यांनंतर.

"अगंss एवढी वरपर्यंत नको!" मेहंदीवालीने गुढघ्याखाली रेष ओढताच सायरा ओरडली. "फक्त पोटरीपर्यंत बास झाली." चंदा तिच्या ओळखीच्या पार्लरवालीला भलंमोठं ब्रायडल पॅकेज सिलेक्ट करून दिवसभर घेऊन आली होती. आतापर्यंत वॅक्सिंग, फेशियल, मसाज सगळं उरकलं होतं.

"क्या यार! वैसे कही सीक्रेट जगह मेहंदी टॅटू भी कर सकते हैं! डॉ. पै के लिए सरप्राईज!!" शेजारी स्वतःच्या हातावर मेहंदी काढणारी चंदा डोळा मारत म्हणाली.

सायराने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४३

तिने दारात उभी राहून सोफा ते डेस्क ते त्याची खुर्ची आणि मोठया खिडकीपर्यंत पूर्ण केबीनभर नजर फिरवली. इथल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांच्या आठवणी होत्या. तिला तन्वीचे शब्द आठवले.

तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात.

इट मेक्स परफेक्ट सेन्स फॉर हिम टू फॉल फॉर समवन लाईक यू.

ऑलमोस्ट ऍज इफ यू वर वन पर्सन इनस्टीड ऑफ टू.

अनिश कधीही बदलणार नाही. काम हाच नेहमी त्याचा फर्स्ट प्रेफरन्स राहील.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४२

"एक्स्क्यूज मी, डॉ. पैंना OR मध्ये आता तूच असिस्ट करत होतीस का?"

सायराने हातातलं सँडविच खाली डब्यात ठेवलं. अरे यार! आता इथेही एकटं जेवू देऊ नका मला. चंदा आणि पूर्वाचे प्रश्न टाळायला ती आज स्टाफ लाऊंजऐवजी लॉबीच्या एका टोकाला रिकाम्या खुर्च्यांपैकी एक घेऊन बसली होती. तिला वाटलं होतं ती इथे कुणाच्या नजरेस पडणार नाही. पण नाहीच.

तिने तोंडावर टिश्यू धरून समोर एक बोट दाखवलं. एक मिनिट, माझं खाऊन होऊ दे.

समोरची बाई थोडी हसली. "नो वरीज, मीच लंच ब्रेकमध्ये आलेय."

तिने घास गिळला आणि हसली. "इट्स ओके. हो, मीच डॉ. पैना असिस्ट करत होते."

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४१

"फोन कंटीन्यूअसली बज रहा है!" शुभदाच्या डेस्कसमोरून जाताना त्याला थांबवून शुभदा म्हणाली. तिच्या हातातल्या नोटपॅडवर पन्नासेक मेसेज होते. "दुनियाभरके लोग कॉल कर रहे है. लेकीन मैने कह दिया, आप बिझी है. फिर भी डॉ. आनंद लाईनपर है.."

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to कथा
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle