कादंबरी

रूपेरी वाळूत - ४२

रमेशला औषधांची लिस्ट देऊन तिने तालुक्याच्या दवाखान्यात पाठवले. रिकामं बसण्यापेक्षा कपाटातून इसेंशीअल्स ऑफ व्हेटर्नरी सर्जरीचा ठोकळा काढला. बराच वेळ वाचून जांभई देताना गेटबाहेर थार येऊन थांबली आणि तिचे डोळे चमकले.

तिने घड्याळाकडे नजर टाकली तर फक्त साडेबारा वाजले होते. ती उठेपर्यंत पलाश लांब ढांगा टाकत दारात पोचला. हातानेच तिला बस म्हणून इशारा करत त्याने आत येऊन हातातली पिशवी टेबलवर ठेवली आणि सनग्लासेस काढून जीन्सच्या खिश्याला लटकवले.

"आत्ता? पुन्हा कोणी पेशंट आणलाय का?" तिने हसत विचारले.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ४१

"ऊंss कोण आसा काय दवाखान्यात?" पांदीतल्या गावकराच्या गडयाने रस्त्यात बैलगाडी थांबवून हाक मारली.

कीबोर्डवर पळणारी नोराची बोटं थांबली. ती पीसीसमोरून उठून दरवाज्यात आली.

"अरे डॉक्टरीण बाई! तुम्ही केंना आयलात? बरें मां?" तिला बघून गडी लगेच खाली उतरला आणि हौद्यातून एक भुरे, गुबगुबीत वासरू उचलून आत घेउन आला. अंगणात बांधल्यावर वासरू मान टाकून मलूल पडून राहिले. "होss " म्हणत तिने वासराचे निरीक्षण केले.

"रमेशss" तिने मोठ्याने हाक मारली तरी पडवीच्या सावलीत, बाकड्यावर डुलकी लागलेला रमेश ढिम्म हलला नाही.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ४०

सर्जरीपासून चार दिवसांनी नाकातले पॅकिंग काढल्यावर ते ऑलमोस्ट कपाळापर्यंत आत होते हे कळून, इतके दिवस कडकपणाचा आव आणणारी नोरा ढासळली. पलाशने खांदे धरून ठेऊनसुद्धा तिचे हुंदके थांबत नव्हते. पण इतक्या दिवसांचा सगळा त्रास डोळ्यांवाटे वाहून गेल्यावर तिला मोकळं वाटलं.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३९

"डॉक्टर, मला नाकाने श्वास घेताना खूप त्रास होतो आहे." नोरा मध्येच म्हणाली.

"हम्म, काही दिवस त्रास होईल. नाकातलं पॅकिंग तीन-चार दिवस असेल, ते काढलं की श्वास घेता येईल.

"मला डिस्चार्ज कधी मिळेल?" नोराने घाईत विचारले.

डॉक्टर हसले. "निघायची घाई झालीय का?"

"नाही, म्हणजे.."

"आय गेट इट. कंटाळा येईल पण बहुतेक हा आठवडाभर रहावं लागेल.  आपण मेंदूच्या खूप जवळ होतो त्यामुळे पॅकिंग असलं तरी इन्फेक्शन वर लक्ष ठेवावं लागेल."

"ओह, इन्फेक्शनची कितपत भीती आहे?" पलाशने विचारले.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३८

तीन वाजले तरी नोराची सर्जरी सुरूच होती. पलाश दोन अडीच तासांपासून पिंजऱ्यात कोंडलेल्या प्राण्यासारखा कॉरिडॉरमधल्या खुर्चीत बसून होता. एव्हाना त्या जागेचा इंचन इंच त्याने येरझाऱ्या घालून संपवला होता. खिडकीत उभा राहूनही त्याच्या डोळ्यांना बाहेरचं काही दिसत नव्हतं. ममाला ऐकू येऊ नये म्हणून माया मधून मधून व्हॉट्सऍपवर त्याला अपडेट विचारत होता. त्याला उत्तर देऊन शेवटी तो पुन्हा त्या खुर्चीत तळहातांत चेहरा बुडवून बसला.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३७

सीएसएफ लीकचे निदान झाल्यावर न्यूरो सर्जन, स्पेशल इएनटी सर्जन वगैरे लोकांच्या तारखा जुळून आठवड्याने सर्जरीची तारीख मिळाली ती नेमकी गणेश चतुर्थीची. जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोय नसल्यामुळे, पणजीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी करायची ठरली. नोराच्या आजाराबद्दल घरी सगळ्यांना सांगितल्यावर लोक फारच तणावात आले. ममाने सर्जरी शब्दानेच बीपी वाढवून घेतलं. शेवटी नोरानेच निर्णय घेतला. पलाश एकटाच तिच्याबरोबर जाईल आणि माया डॅडींबरोबर ममावर लक्ष ठेवेल. पलाशच्या घरी गणपतीची गडबड असणार होती.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३६

नोराने जरा बावचळून त्याच्याकडे बघितले. "यू डोन्ट हॅव टू डू धिस पलाश!"

"इज इट सेफ?" तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने टेक्निशियनला विचारले.

तीही थोडी गोंधळली पण पलाशच्या रागीट चेहऱ्याकडे बघून बोलू लागली. "अम्म.. सेफ आहे, पण तुम्हाला.."

"आय नो." तो लगेच चेंजिंग रूमकडे गेला. पटकन बेल्ट, घड्याळ, रिंग आणि शूज काढून परत आला.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३५

"दॅट वॉज अ बॅड आयडिया." पलाश कुलूप उघडताना म्हणाला. तिने नाकावर धरलेल्या टिश्यूवरून त्याच्याकडे पाहिले. "बाहेर नको जायला, तुला त्रास होईल. तू फ्रेश हो, आरामात कपडे बदलून खाली ये, मग बोलू."

त्याने तिची बॅग उचलून आत भिंतीपाशी ठेवली. नोरा भराभर जिना चढून तिच्या खोलीत गेली. गरम पाण्याने अंग शेकत आंघोळ केल्यावर तिला थोडा उत्साह वाटायला लागला. तिने कपाट उघडून क्वचित घातलेली व्हाईट जीन्स बाहेर काढली. जीन्सवर व्हाईट लेसचा टॉप घालून त्यावर क्रॉप टॉपसारखा बेबी ब्लू निटेड कार्डिगन अडकवला. पायात रोजच्या गुबगुबीत सपाता सरकवून ती जिन्यातून हळूहळू खाली उतरली.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३४

इनोव्हाच्या खिडकीतून वाकून, हसत हात हलवत दिसेनाशी होईपर्यंत तो नोराला डोळ्यात साठवून ठेवत होता. परत आल्यावर त्याने स्वतःला कामात बुडवून घेऊन तिची अजिबात आठवण येऊ दिली नाही. पणजीच्या हॉटेलमध्ये पोचल्यावर नोराच्या मोबाईलला रेंज नव्हती म्हणून तिने रिसेप्शनवरून कॉल करून त्याला सगळे अपडेट्स दिले होते, पण रात्रीच्या शांततेत रिकामं घर त्याला खायला उठलं. तो उठून तिच्या खोलीत ठेवलेल्या नव्या टॅन्कसमोर जाऊन बसला. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात पाण्यात भिरभिरणाऱ्या माश्याचे खवले चमकत होते. माश्याला खायला घालून बराच वेळ झाल्यावर तो उठला आणि तिच्या बेडवर ब्लॅंकेट घेऊन आडवा झाला.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३३

तो संध्याकाळी जरा लवकर घरी आला तेव्हा ती नव्या, मोठ्या चार फुटी टॅन्कमध्ये माश्यासाठी झाडं, गवत, दगड, गुहा वगैरे तयार करत होती. बेल वाजताच खाली जाऊन दार उघडलं तेव्हा त्याने समोर धरलेला गुलाबी जरबेरांचा गुच्छ तिच्या हातात दिला आणि तिच्या खुषीत आणखी भर टाकत दुसऱ्या हातातलं पार्सल उचलून दाखवलं. चायनीज! येय! म्हणत तिने फुलं नाकापाशी नेताच आत येत त्याने तिच्या गालावर ओठ टेकले. तिने डोळे मिटून खोलवर त्याचा सुगंध वेचून घेतला.

"पलाश डोन्ट ट्राय टू चार्म मी, ओके?" फुलं कोपऱ्यातल्या उंच फुलदाणीत ठेवत ती हसत म्हणाली.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to कादंबरी
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle