ललित

राधे.... गोकुळ सोडताना

आणि आठवतो तो ही दिवस राधे, गोकुळ सोडतानाचा....
मी निघालो होतो मथुरेला जाण्यासाठी. तुम्ही सगळे यमुनातिरी आलेलात, निरोप द्यायला. मथुरेला जाणं भागच होतं. कंसाचे अत्याचार आता थांबवणं गरजेचेच होते. वसुदेवबाबा अन देवकीमातेला सोडवायचे होते साऱ्यातून.

मी,नंदबाबा, यशोदामाई, पेंद्या, सारे गोप, तू, साऱ्या गोपी आपण सगळे यमुनातिरी पोचलो. मग मात्र मी सगळ्यांना थांबवलं. मला माहिती होतं, आता आपली भेट होणार नाही. पण तुम्ही सगळे याकडे फक्त काही काळाचा विरह म्हणून पहात होतात.

Keywords: 

लेख: 

कसे खुलती हे दक्षिणरंग

साडी... भारतीय स्त्रीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. पुरातन कालापासून हा वस्त्र विशेष आपल्या वैशिष्ट्यांसहित स्त्रीमनात एक खास जागा बनवून आहे. श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटकाळी पुरविलेली कधी न संपणारी साडी असो कि आपल्या त्याच अलौकिक भावाला द्रौपदीने फाडून दिलेली भरजरी पदराची चिंधी असो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस सन्मानाने परत पाठविताना शिवरायांनी तिला दिलेली खणनारळाच्या ओटीसोबतची मानाची साडी असो, पदराने बाळाला पाठीशी बांधून स्वदेश संरक्ष्णार्थ संग्रामात उतरलेल्या झाशीच्या राणीची साडी असो. ... हे नाना रंगांचं, पोतांचं विणलेलं

Keywords: 

लेख: 

बार्क ऑटोग्राफ़

किनौर २०१२
आर्ट-नेचर कॅम्पमधल्या नोंदी

खिडकीच्या थेट समोर शहतुतचं झाड आहे. त्याला शेवटचा फ़ळांचा बहर कधी येऊन गेला त्यालाही आठवत नसेल इतकं म्हातारं. मात्र खोड मजबूत, गाठाळलेलं, तपकिरी. इथल्या अंगणात सफ़रचंदाची आणि पीचची भरपूर हिरवी, तरुण झाडं आहेत पण नजर या खोडावर खिळून रहाते.
दुपारी डेमियनने शहतुतच्या खोडावर कागद ठेवून क्रेयॉनने घास असं सांगीतलं. कागदावर खोडाचं टेक्स्चर उमटायला लागलं. ही बार्क ऑटोग्राफ़ी. त्याच्या फ़ोल्डरमधे जगभरातल्या खोडांचे ऑटोग्राफ़्स आहेत असे. फोटोग्राफ़्स पेक्षा हे ग्रेट. जिवंत, ऑरगॅनिक.

Keywords: 

लेख: 

खुलभर दुधाने भरलेला गाभारा

कोणे एके काळी एक राजा होता. राजाचे दोन तीन देव युरोप आणि अमेरिका खंडात होते. देवांची राजावर कृपा होती. राजाला भरभरुन काम मिळाले. त्याची भरभराट झाली. राज्यात समृद्धी नांदू लागली. आता राजाला देवांचा नवस फेडायला पूर्ण गाभारा ईतर राजांपेक्षा कमी वेळात दुधाने भरायचा होता. राजाने प्रजेला हुकूम दिला की दोन दिवसात गाभारा दुधाने भरला पाहिजे. प्रजेची घाई झाली. बर्‍याच जणांनी पोरं बाळं उपाशी ठेवली आणि सगळं दूध गाभार्‍यात नेऊन ओतलं. काही जणांनी पोरा बाळांना दूध पाजलं, स्वतः प्यायलं आणि उरलेल्या दूधात भरपूर पाणी घालून ते दूध गाभार्‍यात ओतलं.

लेख: 

कुठेस?

टी-२ वर होते. बोर्डिंग पास घेऊन शेवटचं एकदा दाराकडे पाहिलं. काचेमागून आई-बाबा आणि दीपिका हात हलवून बाय करत होते. मी पण हात हलवला आणि पटापट आतल्या दिशेने चालयला लागले.. शक्य तेवढं मागे वळून बघणं टाळत... "तेजुला काहीच वाटत नाही", "रडू कसं येत नाही ताई तुला" "घाबरणार नाहीस तशी तू एकटी यायला" ह्या माझ्याबद्दलच्या सगळ्या समजुती खोट्या ठरवत अश्रू मोकाट झाले होते.. आणि हात पाय थरथरत होते.
गेटपाशी आले तेव्हा मुलाकडे चौथ्यांदा जाणाऱ्या एक मराठी काकू बसल्या होत्या. मी कावरीबावरी दिसले म्हणून कि त्यांना टाईमपास हवा म्हणून माहित नाही गप्पा मारत बसल्या मस्तपैकी...

लेख: 

भाजी घ्या भाजी

मला सर्व भाज्या आवडतात आणि त्याहूनही जास्त म्हणजे भाज्या विकत घ्यायला प्रचंड आवडतं.

Keywords: 

लेख: 

पाऊस!!

पहाटे तीन साडेतीनला जाग यावी. जुलैचा महिना असावा. बाहेर धुवांधार पाऊस बरसत असावा. रात्रभर जराही उसंत न घेता. एकही तारा दिसू नये असा गिच्च काळोख असावा. गरमागरम टंपाळभर चहा करून घ्यावा. तो घेतल्यावर जरातरी थंडी कमी जाणवेल. मग घराचा दरवाजा उघडावा आणि निवांत बाहेर पडावं. नो छत्री, नो रेनकोट. सोबत चहाचा थर्मास आणि इतर जीवनावश्यक गोष्टी एका छॉट्या सॅकमध्ये.

लेख: 

पाने

Subscribe to ललित
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle