ललित

'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ४ : अभ्यास आणि उपद्व्याप

मुलांचा अभ्यास म्हणजे घरात एक रणधुमाळीच असते. खरं तर अभ्यास फारसा नसतोच. पण जो आहे तो न करण्याकरीता हजारो कारणे पुढे येत रहातात. 'अभ्यास न करण्याची १०१ कारणे' तत्सम काहीतरी पुस्तक नक्की काढू शकतील दोघं मिळून.

पहिले तर होमवर्क लिहीलेलं पानच घरी पोहोचत नाही. बरं कुठे गेलं विचारावं तर शाळेत नक्की बॅगमध्ये टाकलेलं त्यांना आठवत असतं. शाळा ते घर ती बॅग उघडलेली पण नसते पण काहीतरी चमत्कार होऊन ते पान गायब झालेलं असतं खरं...त्यांचा दोष नसतो त्यात.

लेख: 

ब्रिटनवारी - भाग १ पूर्वतयारी आणि तोंड ओळख

कोणी आपल्याला विचारले कि तुझी आवडती जागा कोणती, तर आपण जे पटकन नाव देतो, तिथे काही खास आहे म्हणून नाही तर आपल्या सगळ्या आठवणी तिथेच अडकलेल्या असतात म्हणून. आपण त्या आठवणींना त्या जागे पेक्षाही जास्त महत्व देतो. जसे जसे आपण मोठे होतो तश्या त्या जागाही बदलत राहतात.

हीच गोष्ट शाळेची, कॉलेजची. आपल्याला आपलीच शाळा/ कॉलेज नेहमी दि 'बेष्ट' :cool: वाटते. ह्या आठवणींबद्दल आपण भरभरून बोलतो.

पण आज फक्त शाळा किवा कॉलेज पुरतं शिक्षण मर्यादित नाहीये. आजच्या विद्यार्थ्यासमोर पूर्ण जग आहे आणि इंटरनेटमुळे ते अजूनच जवळ आले आहे.

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

फॅमिली क्रॉनिकल्स ३ : कौटुंबिक मिटींग

"I want to have a family meeting today!" अरीनशेटांनी मागणी केली.

कुठेतरी आयत्या वेळी जायचं ठरल्याने त्यांच्या स्क्रीन टाईम वर बाधा आलेली त्यामुळे एक तातडीची family meeting हवी – या प्रकरणाचा छडा लावण्याकरीता – अशी त्याची मागणी होती.

तशी रविवारची संध्याकाळ आमची कौटुंबिक मिटींगची वेळ. समस्त ईन-मीन-तीन-चार कुटंबिय जेवणाच्या टेबलाशी जमून एक-मेकांच्या officially उखाळ्या-पाखाळ्या काढायची हीच ती सुवर्णसंधी. एरवी काढतो त्या unofficially!

लेख: 

गंध व आठवणी..

(२००८ मध्ये ब्लॉगवर खरडलेले.. )

सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!!

सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते..

Keywords: 

लेख: 

सख्या रे : एक लखलखीत रात्र

(मुकुल शिवपुत्र यांची "तारुवा गिनत गिनत"ही चिज एेकताना जे वाटत गेलं ते असं...)

आणि ती ही रात्र आठवते सख्या...
तुझा निरोप आला अन सारी दुपार संध्याकाळची वाट बघण्यात गेली. तू येणार...काय करू, काय नकोहोऊन गेलं.तुझ्या येण्याला साजरं करण्यासाठी किती सोसा सोसाने सारे सजवले, सजले... सजणेच जणु साजण होऊन आले!

अन दुपारची तलखी संपून मनातली गोड हुरहूर अंगभर, अंगणभर पसरत गेली, उतरणाऱ्या उन्हातल्या सावल्यांसारखी.

लेख: 

एव्हरग्लेडस नॅशनल पार्क

नुकतीच फ्लोरीडा राज्याची सफर करून आलो. त्या संपूर्ण ट्रीपचं वर्णन ऐकवून मी बोअर करणार नाही पण दक्षिण फ्लोरीडमध्ये पसरलेल्या 'एव्हरग्लेडस नॅशनल पार्क'ला भेट दिली. ते ऐकवून मात्र बोअर नक्की करणारे.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

माती, चिखल आणि कलाकृती

मला आता जवळपास १२ वर्षे होत आली कुंभारकाम करायला लागून पण त्यातली एकुण ६-७ वर्षेच सलग काम केले. याकाळात बरेच वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या प्रकारची माती, वेगवेगळे रंग वापारून पाहिले, वेगळ्या प्रकारचे फायरिंग टेक्निक पण वापरून पाहिले. आता नवीन काय करते असे विचारले तर निरनिराळे सेट्स करते आहे. म्हणजे एकसारखे ४ कप, एक सारखे राईस बाऊल्स, एकातले एक असे मिक्सिंग बाऊल्स, झाकणाचे केसेरोल बाऊल्स असे करते.
Pottery तीन प्रकारे मुख्यत्वे केली जाते -
१. व्हील थ्रोन
२. Slab Work
३. Coil Work

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

पॅसिफिक कोस्ट हायवे

पॅसिफिक कोस्ट हायवे उर्फ हायवे वन उर्फ रुट वन या नावांनी ओळखला जाणारा हा रस्ता माझ्या अत्यंत अत्यंत आवडत्या रस्त्यांपैकी एक आहे. कॅलिफोर्नियाच्या सर्वात पश्चिमेला पॅसिफिक समुद्राच्या बाजूने दक्षिणोत्तर जाणारा हा मर्ग म्हणजे सौंदर्याची खाण आहे. एका बाजूला निळा-हिरवा-मोरपंखी असा अतिशय सुंदर रंगांचा समुद्र अन दुसर्‍या बाजूला हिरव्यागार डोंगररांगा ! मंत्रमुग्ध करुन टाकणार्‍या या रस्यावर कितीदा गेले तरी मन भरत नाही. फोटो मध्ये नाहीच पकडता येत त्या वातावरणातले भारावलेपण !

तर इथे टाकूया आपले लाडक्या पीसीएच चे लाडके फोटो !! :)

Taxonomy upgrade extras: 

फॅमिली क्रॉनिकल्स १ : लग्नाचा वाढदिवस - आमचं सेलिब्रेशन!

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!

------------------------------------------------------------------------------------------------

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं.

तर सकाळी सकाळी त्याला त्याच्या बहिणीचा का कोणाचा व्हॉटस अप आला वाटतं कारण त्याने घोषणा केली,
"१२ बरं का!"
"१२? काय १२ वाजले? एवढा वेळ झोपले मी आज?" तसा रविवार असल्याने घाई नव्हती पण १२?

लेख: 

पाने

Subscribe to ललित
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle