ललित

जित्याची खोड

आयुष्यातला पहिला पिझ्झा खाल्ला तेव्हा किती मीठ आणि मिरची त्यात घालू असं झालं होतं. तरीही त्याला चव नव्हतीच. तीच गोष्ट बर्गरची. इतका छान वडा पाव मिळत असताना त्यात संपर्क बर्गरसाठी ३५ रुपये का घालवायचे असा मला प्रश्न पडायचा. पुढे हळूहळू महाराष्ट्रीय जेवण सोडून बाकी पदार्थांची ओळख होऊ लागली. त्यातही गुजराती जेवण गोड असेल तर त्यात थोडं मीठ घालायची इच्छा व्हायचीच. इडली डोसे, सांबार चटणी मात्र जशी ची तशी आवडली आणि पंजाबी जेवणही. अर्थात हे सर्व त्या त्या प्रदेशात न खाता त्यांचं मराठी रूप पाहिलेलं त्यामुळे ते कितपत खरं-खोटं माहीत नाही.

लेख: 

ImageUpload: 

हेअरकट पार्ट २

दोनेक आठवड्या पूर्वी मी केस कापून आल्यावर मोठया तोऱ्याने एक पोस्ट टाकली होती की कसे केस कापणे, रंगवणे किंवा लांब ठेवणे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. मग प्रोफाईल लाही तोच फोटो लावला. आणि हो शिवाय, ऑफिसमध्येही भरपूर हवा करून घेतली. अगदी,"वाटत नाहीस हो आई!" असेही. Wink बोलत बोलत त्या कोरियन बाईने केस कापून कसे सेट केलेत हे काय पाहिलेच नव्हते. आणि इतक्या छोट्या केसांना काय लागतंय? त्यामुळे काय एकूण मजाच होती पहिला आठवडा तरी. पुढे त्याचा पार्ट २ होणार आहे असं बिलकुल वाटलं नव्हतं.

लेख: 

हेअरकट

विकेंडला हेअरकट केला. कापले म्हणजे अगदी संदीपचे चार महिने कापले नाहीत तर किती वाढतील इतके बारीक केले. माझ्या एक लक्षात आलं की गेल्या काही वर्षात दर थोड्या दिवसांनी आपले वय अजून जास्त वाटत आहे असे वाटायला लागते. केस वाढले की नेहमीप्रमाणे मागे बांधून टाकले जातात त्यामुळे अजूनच चेहरा कंटाळवाणा वाटायला लागतो आणि केस कापायची खुमखुमी येऊ लागते. मुलीचा वाढदिवस आणि माझा यात चार महिने असतात मध्ये आणि तिच्या वाढदिवसापासून माझा येईपर्यंत मधेच कधीतरी मी केस कापून येते. मला वाटतं की हा तिशीतला आजार असावा एखादा. त्यात जसेजसे वय वाढेल तशी केसांची लांबी कमी होत जाते.

लेख: 

डायरीतला एक दिवस

आजपण सकाळी लवकर जाग आलीच नाही. रोजची रडारड आहेच मग. त्यात स्वप्नीलची काहीही मदत नसते सकाळी. स्वत:चं आवरून जातो फक्त. बिघडवून ठेवलाय आईने, दुसरं काय? असली वळणं लहानपणीच लावायला पाहिजे होती. आमचं नशीब कुठे इतकं? त्यात हा यश, अजिबात काही आवारात नाही. सगळी ढकलगाडी आहे. आणि जरा रागावलं की ओठ काढून बसतो. कित्ती क्यूट दिसतो. अगदी सशाचं पिल्लूच. मम्मिशिवाय याचं पान हलत नाही. :) अगदी लेसही मीच बांधून द्यायची याच्या शूजची. याला शाळेत सोडायचं म्हणजे जीवावर येतं. काय करणार ? अजून थोडी वर्षं तरी नोकरी करायलाच लागणार. मी तर पक्कं ठरवलंय अजून दहा वर्षं नोकरी करणार फ़क्त.

लेख: 

पोपट झाला रे ...

रविवारच्या निवांत दुपारी शाकाहारी जेवण जितपत अंगावर येईल तितपत आलेलं. मला होत असलेली झोपेची तीव्र इच्छा निग्रहाने नाकारून लेकीच्या अभ्यासाला बसण्याकरता मिनतवार्‍या करत होते. अर्थात 'असल्या प्रयत्नांना कसे टाळावे?' या विषयात पीएचडी केली असल्यामुळे ती नुसतीच इथे तिथे वेळकाढूपणा करत होती.

अचानक माझ्या बाल्कनीला आवाज फुटला. टीटीव्....टीटीव... (याचं मराठी भाषांतर विठू विठू असं करतात.)

माझ्या बाल्कनीला वेगवेगळे आवाज फुटतात. त्यातला घुट्टरघूं आवाज अतिशय वैतागवाणा असतो. आणि तो सदोदित येत असतो. कावळेदादा कधीमधीच येतात.

Keywords: 

लेख: 

वय वर्ष दहा

वय वर्ष दहा पर्यंत (म्हणजे पाचवीत हो )आम्ही दोघी अगदी जीवश्च्य कंठश्च्य मैत्रिणी.दोघी हातात हात घालून शाळेत जाणार. एकमेकींचे डबे वाटून खाणार. मला लागल की तिच्या डोळ्यात पाणी तिला लागल की माझ्या डोळ्यात पाणी वगैरे. सहावीत असताना तिच्या वडिलांची बदली झाली पुण्याला. जाताना आम्ही अगदी गळ्यात गळे घालून भरपूर रडून घेतलं.आपल तिच्याविना यापुढे कस होणार म्हणून दोघींचा जीव अगदी कासावीस झाला आणि ती पुण्याला निघून गेली. मला तिच्या शिवाय करमेना तिला माझ्या शिवाय. एकदम उदास उदास वाटायला लागल.रोजची काम आवरत होतोच पण त्यात मजा येत नव्हती.पण शेवटी नाईलाज पण होता.

लेख: 

करू तो क्या करू ?

मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही.

लेख: 

ऊन

ऑफिसातला एक नेहमीचा दिवस . कटकट करणारे सीनियर्स , नेहमीच्या डेडलाईनची रडारड , एसीची गोठलेली हवा , या सर्वात डोक्यात प्रश्नांचं भेंडोळ जमलेल असताना चेहऱ्यावर दिसू न देण्याची कॉर्पोरेट कसरत करत असलेले आपण . एका क्षणी डोक्यातल काहूर चेहऱ्यावर पसारायला सुरुवात होते. स्क्रीन धूसर दिसू लागते . डोळे जड होतात . पटकन फ्रेश होऊन येण्याच्या नावाखाली पाऊले वॉशरूमची वाट चालू लागतात . पण तिथून येऊनही काही होत नाही . सुरुवातीचं लो फिलिंग आता सिंक होऊनच थांबणार काय इतपत प्रकरण येतं .

आणि तेव्हाच टिंग टॉंग होतं .

Keywords: 

लेख: 

ते चार तास...

(जुनाच लेख आहे,आज इथे आणला.)

गेल्याच आठवड्यात माझ्या मोठ्या जावेचे ऑपरेशन मुंबईतील एका टर्शियरी केअर हॉस्पिटलमध्ये करण्याचे ठरले. ऑपरेशन दुपारी अडीच वाजता होणार होते. चार तास शस्त्रक्रियेसाठी लागणार होते. अडीचच्या सुमारास त्याना ओ.टी. त नेले. हॉस्पिटलच्या नियमानुसार एकच जण ओ.टी. च्या बाहेर थांबू शकत होता. दादांना तिथे थांबवून आमची रवानगी रिसेप्शन लॉबीत झाली. दादांना काही लागले तर कळवा असे सांगून आम्ही सगळे खाली आलो आणि त्यानंतरचे चार तास आम्हाला चार युगांसारखे भासले.या चार तासांत बरंच काही अनुभवलं. दडपण, अधीरता, काळजी, असहाय्यता अशा संमिश्र भाव्-भावनांची स्थित्यंतरे बरंच काही शिकवून गेली.

Keywords: 

लेख: 

भूमी

अजूनही आठवतात ते दिवस. नुकती थंड होत होते मी. पोटातली आग अजूनही ढवळायची, वर वर यायची. पण मग आकाशातून तू पाझरु लागला, अन तुझ्या शिडकाव्याने शांतवत गेले मी. मग किती तरी काळ असाच गेला. मी, अन हळूहळू वाढत गेलेले तुझे कोसळणे.
अन मग अचानक काही हलले उदरात. आधी वाटले, तीच ती आग. पण नाही, हे काही वेगळे होते. काही शांत करणारे, अगदी तुझ्या सारखे, मनाला शांत करणारे, मन तृप्त व्हावं असं काही. ती जाणीव, पहिली जाणीव माझ्या स्त्रीत्वाची. काही रुजत होते, वाढत होते, आत आत, उदरात.अस्तित्वाची एक नवी अनुभुती.

लेख: 

पाने

Subscribe to ललित