आफ्रिकन सफारी करण्याचे स्वप्न कित्येक वर्षांनी साकार होणार होते. माझ्या आणि नवऱ्याच्या स्वभावानुसार आफ्रिकन जेवण मिळणार म्हणूनसुद्धा मन हवेत होते. १५-१६ तासाचा प्रवास करून रात्री ९ च्या आसपास नैरोबी एयरपोर्टवर उतरलो. आमचा गाईड आम्हाला हॉटेलवर सोडून, जुजबी सूचना देऊन, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला तयार रहायची आठवण करून देऊन निघून गेला. आम्हाला प्रचंड भूक लागली होती. म्हणून आम्ही हॉटेलच्याच रेस्टॉरंटकडे कूच केले. रात्रीचे १०-१०.१५ वाजले होते रेस्टॉरंट मध्ये शुकशुकाट होता. लॅम्ब चॉप्स ऑर्डर केले. जेवण येईपर्यंत धीर निघत नव्हता इतकी भूक लागली होती.
ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
------------------------------------------------------------------------------------------------
हा असा पाऊस कोसळत असताना नीट ऐकावं. असं वाटतं खूप काही सांगायचंय त्याला. जेव्हा आपल्यालाही लिहीण्यासाठी आतून धडका मिळत असतात आणि मग विचार आणि हात यांची स्पर्धा लागल्यावर त्यांना सांधणार्या आपली जी गत होते ना, तीच त्रेधा मला या संततधार कोसळणार्या पावसात दिसते. गेले दहा बारा तास नुसता कोसळतोय. किती साचलं असेल मनात? आणि मग हे बांध फुटले अनावर होऊन.
पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी .
नेल्सन हा आमचा क्लीनर( घर सफाईला येणारा मदतनीस) ! पंधरवड्यातून एकदा असा गेली ७-८ वर्ष तो आमच्याकडे येतोय - यावरूनच हा माणूस किती चिवट असावा याचा अंदाज येतो! दर वेळी तो यायच्या आधीची माझी भीती....एखादं मोठ्ठं वादळ नुकतंच धडकून गेल्यासारखा घराचा अवतार बघून हा त्याचं चंबू-गबाळं आवरून नक्कीच त्याच्या मूळदेशी - होंडुरसला पळून जाणार! नेल्सन काही परत आपल्याकडे येत नाहीये. पण तो येतो. परत परत येतो...पोटापाण्याकरीता माणसाला काय-काय करावं लागतं नाही...?
जरा तपेलीभर पाऊस पडला की भक्क असा आवाज येऊन दिवे जात. प्रमोदबनमधे राहणारी काही मंडळी आपापल्या गॅलर्यांमधे रस्त्यावरून येणारे जाणारे लोक बघत. घरामधे मेणबत्त्या, गॅसच्या बत्त्या वगैरे. समोर डावीकडे कामवाल्यांची वस्ती. तिथली सगळी पोरंटोरं वस्तीच्या बाहेर येऊन पारेकर टेलरच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर. पारेकरचं दुकान वस्तीत नाही. वस्तीला लागून असलेल्या दुमजली चाळीत. चाळीत ज्यांची घरे रस्त्याकडे तोंड करून तेही सर्व आपापल्या गॅलर्यांमधे. तिन्ही ठिकाणच्या समवयस्क जनतेमधे रस्त्याच्या आरपार गप्पा चालत. विशेषत: कॉलेजातल्या दादा ताई जनतेत. त्या गप्पाटप्पांचे प्रमोदबनमधल्या बालिकेस कोण कौतुक.
निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!
रात्रभर मस्त पाऊस पडून गेला होता आणि अजून हि थोडी रिमझिम चालूच होती. हवेत मस्त गारवा आला होता. विचार केला आज थोडा निवांत चहाचा आस्वाद घ्यावा, थोडा पेपर वाचवा आणि मग ऑफिसला जायला निघावे, तसेही काही अतिमहत्वाचे काम वाट बघत नव्ह्ते. थोड्या वेळात ऑफिसला जायला बाहेर पडले, आणि लक्षात आले की आज पाऊस जरा जास्तच आहे. रस्त्यावर जागो जागी पाणी साचले होते. काही गाडीवाले जोरात गेल्याने अंगावर उडणाऱ्या पाण्यापासून पादचारी आपला बचाव करत होते. शाळेत जाणारी काही मुले बसची वाट बघताना पावसात भिजत होती आणि त्यांच्या आया (आई या शब्दाचे अनेक वाचन) त्यांना ओरडत होत्या.