वेळ: सकाळी 8.30
तिकडे बाथरूम चं दार उघडल्याचा आवाज आला आणि इथे स्वप्नाने इडल्यांचा पहिला सेट कुकर मध्ये ठेवला.शक्य तितक्या वेळा कुटुंबाला गरम पदार्थ खायला घातल्यास पदार्थ उरण्याचे चान्सेस कमी होतात.शिवाय गोवेकर बाई म्हणतात ताजं गरम खा, वेट लॉस ची हार्मोन जागी होतात.लॅपटॉप ओट्यावर कोरड्या बाजूला ठेवून जपानची मीटिंग चालू होती. मध्ये इडली चं मिश्रण ढवळत असताना तिला बरेच वेळा 'यु वेअर गोईंग टू क्रिएट इश्यू इन मिदोलो मे' ऐकू आलं.तिने घाबऱ्या घाबऱ्या मैत्रिणीला फोन करून विचारलं.
"अगं हे मिदोलो काय आहे?आता नव्या टूल मध्ये टाकायचे का इश्यू?जीरा कुठे गेलं?"
मध्यन्तरी सपा च्या आरामखुर्ची च्या फोटोने मला माझ्या लहानपणात पोचवले. समरण रंजनात वेळ खूप छान गेला. म्हणून हे सपा ला डेडिकेट करतेय. थॅंक्यु सपा
आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची
मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर मैत्रिणीच्या पिकनिकचे फोटो बघत होते. लोकेशन सुंदर होतं. खोलीची छानशी गॅलरी आणि गॅलरीतून समोर दिसणारी हिरवीगार टेकडी, त्यावरून वहाणारे छोटे छोटे झरे, ढगांमधून सूर्य हळूच डोकावत असल्याने हिरवळीवर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन ... फ्रेम अप्रतिम होती होती. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते गॅलरीतल्या आराम खुर्चीने, जिने मला कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे नेलं.
जॉगिंग करताना रस्त्याच्या शोल्डरिंग वरून घसरून पायाचा अॅन्कल जॉइन्ट जायबंदी व काही काळापुरता पाय प्लॅस्टर मधे होता. मग प्लॅस्टर निघाल्यावर व्यायामासाठी पोहोणे हा पर्याय निवडावा लागला. ब्रिस्क वॉक/जॉगिंग मला काही काळापुरता तरी बंद करावं लागलं. म्हणून इथल्या उन्हाळ्याचा फ़ायदा घेऊन मध्यंतरी काही वर्षं बंद पडलेलं पोहोणं परत चालू केलं. त्यातही घराजवळचा नगरपालिकेचा पूल मॅनेजमेंट बदलल्याने पहिल्यापेक्षा जरा बराच ऊर्जितावस्थेत आल्याचं समजल्याने, नेहेमीच्या क्लबच्या पूलमधे न जाता इथेच नगरपालिकेच्या पूलवर "लेडीज टायमात" जाण्याचं ठरवलं. (क्लब घरापासून खूप लांब आहे.)
आमच्या लहानपणी बाळाच्या प्राणी जगताची सफर ही चिऊ काऊच्या गोष्टीने सुरू व्हायची. घरात किंवा आजूबाजूला मोती कुत्रा, मांजर, हम्मा गाय हे सगळे प्रत्यक्षात दिसायचे म्हणून किंवा मग पुस्तकं, टीव्ही या माध्यमातून आमच्या आयुष्यात शिरायचे. पुढे वाघोबा, सिंह, मगर, लांडगे अशांचीही एन्ट्री व्हायची. याशिवाय पाली, झुरळं असे नावडते प्राणी पण कितीही नकोसे असले तरी घरात असायचेच. गाढव पण असायचे, प्रत्येकाचा स्वभाव आणि त्यांच्या गोष्टी या बरोबर डोक्यात असायच्या. लबाड कोल्हा, करकोचा, ससुला, कासव, मासोळ्या या सगळ्यांच्या आपापल्या कहाण्या हा आमच्या लहानपणाचा अविभाज्य भाग होता.
शाळा कॉलेजात जसं इंग्रजी साहित्य वाचत गेले...."वीपिंग विलो"बद्दल एक विचित्र आत्मीयता, फॅसिनेशन वाटत गेलं. फुलांचे अश्रु ढाळणारे झाड! अर्थातच तेव्हा हे झाड फक्त चित्रातच पाहिलं होतं.
शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, "आता हे काय नवीन? दुर्योधन कुठे? कपबशा कुठे? काय संबंध? लिहिणारीचं डोकं जागेवर आहे की नाही?" बरोब्बर ओळखले ना मनातले विचार? पण आहे, संबंध आहे. आणि बऱ्याच जणी लेख वाचल्यानंतर माझ्याशी कदाचित सहमतही होतील.
कडक हिवाळ्यानंतर येणार वसंत ऋतू नेहमीच चैतन्य घेवून येतो. यावर्षी तर या चैतन्याची मनाला फारच गरज होती. सुदैवाने ही चैतन्याची उधळण शोधायला फार लांब जायचे नव्हते. आमच्या काउंटीतल्या निसर्गप्रेमी आणि उदार कुटुंबाच्या द्र्ष्टेपणामुळे ४८ एकराचे रान मौल्यवान निसर्गठेवा म्हणून जपले गेले आहे. दिड्शे वर्षांपेक्षाही जास्त काळ कसलीही मानवी ढवळाढवळ न झालेले रान - ओल्ड ग्रोथ फोरेस्ट . १८५७ मध्ये जॉन मेल्तझर यांनी शेती करण्यासाठी १६० एकराची जागा खरेदी केली. पुढे त्यात त्याच्या मुलाने आणि नातवाने भर घालून जागेची मालकी २८० एकरापर्यंत विस्तारली.
रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी
पश्चिम बंगालबद्दल प्रचंड, प्रचंड आकर्षण वाटतं त्याची मुख्य कारणं म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दक्षिणेश्वरी , रवींद्रनाथ टागोर व शांति निकेतन ... मी मागच्या जन्मी बंगाली होते बहुतेकं !
पहिलीत असताना वडिलांना विचारले 'प्यार' म्हणजे काय , तेव्हा ते 'कुठे ऐकलेसं गं , कुठे ऐकलेसं गं' करून घाबरून उठून गेले. 'प्यार'मध्ये एवढं घाबरण्यासारखं काये बरं , ते स्वतः एवढे गाणे ऐकायचे मगं मला न कळले तर काय नवल.... पण हा विचार करायला आणि दोनचार दिवस गाणी बंद करून अपराधी वाटून घ्यायला ते काही आजकालचे पालक नव्हते. ते गाणे ऐकत राहिले मी 'शिकत' राहिले. 'प्यार'चा रस्ता दिलापर्यंत जाणारच , शास्त्र असतं ते. त्यामुळे दुसरीपर्यंत मला 'दिला'बद्दल कळलं. यावेळेस मी आईकडे गेले व दिलाची चौकशी केली. त्यावेळी ती बावचळली असेलही पण तिने तसे दाखविले नाही. ती सगळ्या गोष्टींना 'भक्तप्रल्हाद वळण ' द्यायची.