ललित

भटकंती -११ कच्छच रण

भटकेपणा पक्का मुरलेला आहे माझ्यात. अन वर्ष सहा महिन्यातल एखादं भटकण काही मनाला पुरेस वाटेना. आणि अचानक धनलाभ म्हणतात तसा अचानक सायकल लाभ झाला मला. एका मैत्रीणीची, तिला उंच वाटणारी सायकल उर्फ रेड रायडींग बडी उर्फ रामप्यारी माझ्या घरी आली. It is said Car is too fast and walking is too slow , so cycling is the best way to see the world! रामप्यारी बरोबर ते अगदी पटायला लागल! पुणं चाकाक्रांत करता करता सिमोल्लंघनाचे वेध लागले. २०२१ च्या दसर्‍याच्या दिवशी कारला सायकल लटकवून मी अन रामप्यारी नाशकात पोचलो.एका ग्रुप बरोबर नाशकाच्या आजूबाजुचे रस्ते फिरले, विनयार्ड्स पाहिली , वाईन टेस्टिंग केल.

लेख: 

वसंतोत्सव

वसंत रंगात न्हाला गं
वसंत अंगात आला गं
पळस पांगारा शितल अंगारा
लेवून केशरी झाला
- शांत शेळके

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वसंतानुभव - १

शुष्क, पर्णहीन आणि राखाडी, ब्राऊन रंगाची झाडं, ढगाळ हवामान, सूर्य उगवला तरी थंडीचंच साम्राज्य, हिमवर्षाव झाला तर नवलाईचे दोन दिवस असे हिवाळ्याचे महिने जातात आणि मार्च उजाडतो. नेहमी सारखी थंडी नव्हतीच असे आठवणींचे उमाळे असले तरी रोजच्या सूर्यदर्शनाने, निळ्या मोकळ्या आकाशाने आपोआप जास्त उत्साही वाटायला लागतं.

सृजनच्या शाळेत या दिवसात एक खूप छान गाणं म्हणतात. मागच्या वर्षी मला पहिल्यांदा हे गाणं समजलं, पण सगळे शब्द लक्षात आले नव्हते, आता यावर्षी सृजन सध्या अखंड हे गाणं छान चालीत म्हणत असतो आणि मी पण त्याच्या सोबत म्हणत असते. त्या ओळींचा अर्थ मराठीत साधारण असा होतो -

लेख: 

इ इरॉटिकाचा

तर मी सध्या करियर चेंजच्या विचारात आहे. मला काहीतरी वेगळे करायचे आहे, हटके करायचे आहे, कूल करायचे आहे, माझ्यातल्या अंगभूत कलागुणांना, कौशल्याला बाहेर आणायचे आहे, मला माझ्या टर्म्सवर कामाचे तास हवे आहेत, मला स्वतःसाठी काम करायचे आहे. पण काय बाई करू, काय करू बरे, कायच बाई करू बरे? अशी माझी भुणभुणभुण ऐकून माझ्यासाठी करियर ऑप्शन्स शोधण्याचे आव्हान माझ्या ३ जणांच्या मार्केट रिसर्च टीमने स्विकारले. ही टीम म्हणजे माझी मुलगी चिन्मयी, भाची सानिया आणि भाचा आकाश. मी परत पूर्ववत अमेरिकी भांडवलशाही बळकट करणारे काम करू नये असे आमच्या त्रिकूटाचे ठाम मत होते.

Keywords: 

लेख: 

अ................आणि अस्मि

Screenshot_20211008-130930_WhatsApp.jpg

अ..... आणि अस्मि

 अ  ----  हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो.

अस्मि ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो.

हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही.

लेख: 

चिमणे जग

डेकेअरविषयी चाललेली चर्चा वाचून हे ललित आठवले. खूप जुने आहे. १३ वर्षांपूर्वी लिहिलेले. पण मुलं अजूनही अशीच रडतात आणि अशीच रूळतात. Haahaa 2 Haahaa 2

लेख: 

हिंजवडी चावडी: होमवर्क आणि नेटवर्क

वेळ: सकाळी 8.30
तिकडे बाथरूम चं दार उघडल्याचा आवाज आला आणि इथे स्वप्नाने इडल्यांचा पहिला सेट कुकर मध्ये ठेवला.शक्य तितक्या वेळा कुटुंबाला गरम पदार्थ खायला घातल्यास पदार्थ उरण्याचे चान्सेस कमी होतात.शिवाय गोवेकर बाई म्हणतात ताजं गरम खा, वेट लॉस ची हार्मोन जागी होतात.लॅपटॉप ओट्यावर कोरड्या बाजूला ठेवून जपानची मीटिंग चालू होती. मध्ये इडली चं मिश्रण ढवळत असताना तिला बरेच वेळा 'यु वेअर गोईंग टू क्रिएट इश्यू इन मिदोलो मे' ऐकू आलं.तिने घाबऱ्या घाबऱ्या मैत्रिणीला फोन करून विचारलं.
"अगं हे मिदोलो काय आहे?आता नव्या टूल मध्ये टाकायचे का इश्यू?जीरा कुठे गेलं?"

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

आठवणींचा ठेवा ... आरामखुर्ची

मध्यन्तरी सपा च्या आरामखुर्ची च्या फोटोने मला माझ्या लहानपणात पोचवले. समरण रंजनात वेळ खूप छान गेला. म्हणून हे सपा ला डेडिकेट करतेय. थॅंक्यु सपा

आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची

मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर मैत्रिणीच्या पिकनिकचे फोटो बघत होते. लोकेशन सुंदर होतं. खोलीची छानशी गॅलरी आणि गॅलरीतून समोर दिसणारी हिरवीगार टेकडी, त्यावरून वहाणारे छोटे छोटे झरे, ढगांमधून सूर्य हळूच डोकावत असल्याने हिरवळीवर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन ... फ्रेम अप्रतिम होती होती. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते गॅलरीतल्या आराम खुर्चीने, जिने मला कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे नेलं.

Keywords: 

लेख: 

लेडीज टाईम

11)लेडीज टाईम

जॉगिंग करताना रस्त्याच्या शोल्डरिंग वरून घसरून पायाचा अ‍ॅन्कल जॉइन्ट जायबंदी व काही काळापुरता पाय प्लॅस्टर मधे होता. मग प्लॅस्टर निघाल्यावर व्यायामासाठी पोहोणे हा पर्याय निवडावा लागला. ब्रिस्क वॉक/जॉगिंग मला काही काळापुरता तरी बंद करावं लागलं. म्हणून इथल्या उन्हाळ्याचा फ़ायदा घेऊन मध्यंतरी काही वर्षं बंद पडलेलं पोहोणं परत चालू केलं. त्यातही घराजवळचा नगरपालिकेचा पूल मॅनेजमेंट बदलल्याने पहिल्यापेक्षा जरा बराच ऊर्जितावस्थेत आल्याचं समजल्याने, नेहेमीच्या क्लबच्या पूलमधे न जाता इथेच नगरपालिकेच्या पूलवर "लेडीज टायमात" जाण्याचं ठरवलं. (क्लब घरापासून खूप लांब आहे.)

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to ललित
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle