चिन्नु

सूट - भाग 6

'काय झालं तिलु? अशी झोपून का आहेस? बरं नाहीये का?', विनुने कपाळावर हात लावून पाहिला.
'मी ठीक आहे रे. ते दादा आणि संजूदादा- '
'काय? स्वप्न पडलं का काही? मग दादा दादा काय करतेस तिलु? आठवण आली का घरची?'
'हो. दादाची खूप आठवण येतेय मला आज'
'थोड्या वेळाने फोन करून बोल. बरं वाटेल तुला. खाल्लं का काही? काही order करू का? पिझ्झा मागवू का?'
'ए नको नको. दुपारी मी तेच मागवलं होतं. लुनाने मला मदत पण केली'.
'लुना काय? कोण? असं नाव आहे का कुणाचं?'
तिलुने घडलेल्या गोष्टी सांगितल्या बरोबर विनू काळजीत पडला. 'तिलु, मग मला फोन नाही का करायचा?'

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 5

'हॅलो रूम सर्व्हिस? मला पिझ्झा ऑर्डर करायचाय. आताच करता येत नाही म्हणजे? ओह, 11.30 नंतर होय. हो, तसा उल्लेख आहे मेनू मध्ये, पण मला ब्रेकफास्ट मेनू मधलं ऑर्डर करायचे नाहीये. मला बरं नाही-'
तिकडून फोन कट झाला होता.
तिलुला बरं वाटत नव्हतं. ब्रेकफास्ट मधले तेच ते options try करून तिला कंटाळा आला होता. त्यात ती बर्याच उशीरा उठली होती.
'काय झालं? बरी आहेस का?', लुनाने काम थांबवून विचारलं.
'नाही ना. डोकं दुखतंय. त्यात ही रूम सर्व्हिसवाली बाई माझी order घेत नाहीये. लंच मेनू 11.30 नंतर म्हणे. अजून चांगली 20 मिनिटं आहेत त्याला. माझा भूकबळी जाणार तोवर.', तिलु वैतागून म्हणाली.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 4

'ही अजून इथेच कशी?', तिलु उठून उभी राहिली.
'तुझं झालं ना vacuum करून'
'हो. निघतच होते.' लुना म्हणाली. दारात थांबून तिने मागं वळून पाहिलं. 'पुढच्या वेळेस पियानो on करून वाजव. त्याच्या मागं बटन आहे.'
'अरे देवा! तू कधी पाहिलंस?', तिलुने विचारलं.
'काल दुपारी. त्याच्या आदल्या दिवशी वाजवलेलं ऐकलं मी. तू छान वाजवत होतीस.'
'पण ते हिंदुस्थानी संगीत...'. तिलुचे शब्द हवेतच विरले. ऐकायला लुना होती कुठं. लांब ढांगा टाकत पार दुसरीकडे निघून गेली होती.

Keywords: 

लेख: 

सूट भाग 3.5

'ओह, हाय लुना'
लुना बहुतेक हसली वाटतं तिकडे वळून. आपण तिला आत्ता हाय म्हणायला नको होतं का? तिलु खजील होऊन पाहत राहिली.
'And you are?'
'तिलोत्तमा'
'थी.....?'
'थी नाही. ति, तिलोत्तमा'
'.....????'
'Call me तिलु'
'ओह ठिलु!'
आधीचच बरं होतं की! तिलुने कपाळावर हात मारून घेतला. मनात.

'तुझं नाव कुणी ठेवलं गं?', विनूनं तिच्या केसांशी चाळा चालवला होता.
'आत्यानं. मला पाहील्याबरोबर ती आईला म्हणाली, माले अप्सरेसारखी सुंदर मुलगी आहे तुझी! पुढे त जन्माक्षर आले म्हणून.'. तिलुने एका श्वासात पूर्ण स्टोरी सांगितली. 'का विचारलंस?'
'नाही म्हणजे किती पर्याप्त नाव आहे असं वाटून-'

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 3

'You can do it Billy! C'mon buddy'. स्विमिंग पूलात अर्धवट पाण्यात उभा राहून तो एका लहानशा 'बिल' ला पाण्यात उडी मारायला सांगत होता.
रोज ह्या वेळेला हे कुटुंब स्विमिंग पूलाचा आनंद घेत दिवस काढत. खिडकीच्या एका बाजूला असलेला हा पूल म्हणजे तिलुसाठी मोठा दिलासा होता. कोणत्याही वेळेला डोकावलं तरी कुणी न कुणी दिसायचंच.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 2.5

'काय झालं तिलु? केवढ्या मोठ्याने ओरडलीस. स्वप्न पडलं का काही? थांब, थोडं पाणी पिऊन घे'.
विनूनं तिला उठवून बसवलं. पाणी पिऊन तिलुला जरा हुशारी वाटली. ती सावरून बसली.
'काही व्यवस्थित आठवत नाही. स्वप्नच असावं'
'कसलं स्वप्न? अतिविचार करतेस ना. असं होणार ना मग. काय पाहीलं सांग'. विनूनं लॅपटॉप बंद केला आणि बॅगेत ठेवून दिला.
'तू होतास स्वप्नात'
'काय? तू मला पाहून किंचाळलीस???'
'नै कै', तिलु हसत म्हणाली.
'तुझ्या चेहर्यावर खूप तेज होतं. मी तो प्रकाश कुठून येतोय हे जाणून घेण्यासाठी भरभर पुढे येत होते'
'आणि तू कशाला तरी ठेचकाळुन धडपडलीस?'
'अय्या! तुला कसं माहित? '

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 2

'तिलु, तू किमान अंडं तरी ट्राय करायला हवं. Nonveg खात नाही म्हणजे काय? उपाशी रहावं लागेल अशाने.'
'हं'
'हूं काय? अन्नच आहे ते. सगळे जण खातात.'
'मला नाही खायचं. मी कधी खाल्लं नाही. बघायला आलास तेव्हाच सांगितले होते, मी खात नाही हे सगळं म्हणून'. तिलुचा गळा भरून यायला लागला.
'हो बाई. पण हे काय contract आहे का, आधीच सांगितले होते वगैरे म्हणायला?'
तोवर तिलु मुसमुसु लागली. तसा विनू गांगारून गेला.
'अगं सगळीकडे veg मिळत नाही इथं. म्हणून म्हटलं ट्राय करून पहा अंडं तरी.' एव्हाना विनूचा सूर खाली आला होता आणि तीही शांत झाली.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 1

एका हाॅटेलच्या वरच्या मजल्यावरील एका रूममध्ये उभी होती ती. एकटीच. वार्याची झुळूक आली की नाही असं वाटलं म्हणून खिडकीत उभी राहिली. रस्ता संथ वाहत होता. 'ऑफिसला जाणार्यांची वर्दळ', ती पुटपुटली.

Keywords: 

लेख: 

Productivity improvement tips

Productivity improve करण्यासाठी tips-

1. कामांची यादी करणे. प्रत्येक कामासमोर किती वेळ लागेल किंवा किती वेळात करायचे याचा tentative plan करणे.
हे सर्वांना जमेल असे नाही. जर तुम्हाला प्रत्येक गोष्टींचं दडपण येत असेल तर वेळ लिहायची गरज नाही.
2. आपल्याला काम करायला कोणती वेळ जास्त productive आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे plan करा.
काहींना भल्या पहाटे उठून केले की लवकर आणि चांगली होतात कामं. काहींना रात्री उशिरा जागून करायला आवडतं.
3. काम सुरू करण्या आधी हलका व्यायाम, brisk walk, sit ups, push ups, वणवण :P,running, पूजा, झाडांना पाणी देणे यातलं काहीही किंवा सर्व केले तरी चालेल.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to चिन्नु
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle