कथा कादंबरी

बदतमीज़ दिल - २५

ती डॉ. पैंना भेटायला निघाली तेव्हा ते केबिनमध्येच होते. दोन तासांनी सर्जरी शेड्यूल्ड आहे आणि आत्ता कदाचित रेसिडेंटस बरोबर ते राउंडवर निघणार असतील. पण हे काम पटकन होईल.

हळूच दार किलकिले करून ती आत डोकावली. नेहमीप्रमाणे डेस्कमागे डॉ. अनिश पै, अग्रगण्य सर्जन, मिस्टर हॉटीपॅन्ट्स! त्याने फ्रेश हेअरकट केलेला दिसत होता. कडेने केस बारीक करून वर स्टायलिश सिल्की केस, ज्यांना कर्ल व्हायची घाई आहे पण लांबी तेवढी नाहीये. रोजचा पांढरा कोट घातलाय त्याखाली बॉटल ग्रीन शर्ट आहे. आज सकाळी चकाचक दाढी केलेली दिसतेय. आज तिच्या आणि त्या स्मूद जॉलाईनमध्ये कोणी नाहीये.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २४

सायराला वाटत होतं, त्याला बहुतेक ही लोकॅलिटी आवडणार नाही. जुनी वस्ती आणि घरंही थोडी जुनाट झालेली पण त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांच्या या दोन गल्ल्याच बिल्डरच्या आक्रमणातून टिकून राहिल्या होत्या. बाकी सगळीकडे जुनी घरं पाडून टॉवर्स झाले. तिचं लहानसं बैठं घर होतं. बाहेरचा रंग उडालेला आणि मेंटेनन्सची कमतरता जाणवत होती. तरीही पुढे चार फुटाचं अंगण अगदी स्वच्छ आणि झाडांनी भरलेलं होतं. मनीप्लांटचा एक अजस्त्र वेल घराच्या भिंतीवर पसरला होता. निळ्या दरवाजावर पेपर क्वीलिंग केलेली 17, Deshmukh's अशी अक्षरं असणारी लाकडी फ्रेम होती.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २३

माझा स्वतःवर विश्वास बसत नाहीये, एवढी मी माती खाल्लीय. ती मला घाबरतेय. खुर्चीच्या टोकाला बसून ऑम्लेटचे लहानसे घास कसेबसे खातेय. टेबलाखाली तिचे पाय सलग हलत आहेत. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय. साहजिक आहे, काल संध्याकाळपासून इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यात... तो खाताखाता तिचं निरीक्षण करत होता.

काल सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या मनात ती फक्त त्याची कलीग होती आणि आज सकाळी अचानक फ्यूचर लव्ह इंटरेस्ट! अजून त्याच्या मेंदूला हे नीट प्रोसेस करता येत नव्हतं, पण दोघे मिळून काहीतरी ठरवता येईल, जर तिने आत्ता धीर करून त्याच्या नजरेला नजर दिली तर!

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २१

"नको. प्लीज थांब. आय प्रॉमिस, मी काही करणार नाही." तो भुवया जवळ आणून तिच्यावर फोकस करत म्हणाला.

ती मोठ्याने हसली. "तुम्ही काय सांगताय ते तुम्हालाच कळत नाहीये. यू आर टोटली ड्रंक!"

त्याला सकाळी यातलं काहीच आठवणार नाही. आताही ती कोण आहे हे कळतंय की नाही देव जाणे.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २०

त्यानंतर जेवण कितीतरी वेळ सुरूच होतं. ती कशीबशी शांत बसून होती पण वेटरने टेबलावरची शेवटची प्लेट उचलताच ती चटकन उठली. मधेमधे येणाऱ्या लोकांना चुकवत वॉशरूमकडे पळाली. अपेक्षेप्रमाणे तिथे रांगेत एक लहान मुलगी, तिची आई आणि एक आजी होत्याच. ती भिंतीला टेकून तिच्या नंबरची वाट बघत थांबली, म्हणजे एकदाचं त्या स्टॉलमध्ये स्वतःला कितीही वेळ लॉक करून लोकांना टाळता येईल.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १९

तिने उत्तर देण्यापूर्वीच त्याने तिच्या कोपराला धरून एका रिकाम्या टेबलकडे नेले.

"हळू! तुम्ही पळताय आणि मला ह्या हील्समध्ये फास्ट चालता येत नाहीये."

त्याने तिचा हात किती घट्ट धरला होता ते जाणवून त्याने चालायचा वेग कमी केला. टेबलापाशी पोचल्यावर तिला एका जागी बसवून तो समोरच्या खुर्चीत बसला, जेणेकरून समोरासमोर बोलता येईल.

"जस्ट टू बी क्लिअर, मी तुमच्या नातेवाईकांशी फक्त पोलाईटली बोलत होते." तिच्या आवाजातली मृदुता आता निघून गेली हाती.

नक्कीच.

"शर्विलने तुला ह्या लग्नाला बोलावताना काय सांगितलं होतं?" त्याने गंभीरपणे विचारलं.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १८

केक कापून झाल्यावर संगीत आणि नाचगाणी होण्याआधी वेटर्स ड्रिंक्स आणि फिंगर फूड सर्व्ह करू लागले. अनिश स्वतःला अल्कोहोलमध्ये बुडवून घ्यायच्या विचारात होता जेणेकरून सायरा इथे शर्विलबरोबर असल्याचं तो विसरून जाईल. पण ती शेजारीच शर्विलचं कसंबसं तयार केलेलं एक्स्प्लनेशन ऐकत उभी होती. त्याने ऑलरेडी एक ड्रिंक संपवून दुसऱ्यासाठी वेटरला हात केला. सायरा खूप चिडलीय, ऑब्वीअसली. माझ्या भावाने ही सिच्युएशन अत्यंत वाईट प्रकारे हँडल केलीय आणि मी चुकून पॉसीबल लव्ह ट्रँगलचा एक कोन झालोय. मला तो कोन होण्यात काही इंटरेस्ट नाहीये.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १७

"हो, आलेच!" ती आरशासमोर उभी राहून हसायचा प्रयत्न करत ओरडली. ती बाहेर येताच शर्विल हातातला पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून सोफ्यावरून उठला. तो इतका हँडसम दिसत होता की तिला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला प्रत्यक्ष पाहून महिने उलटून गेले होते, तेही पबच्या अंधुक उजेडात. तिच्या आठवणीतला तो आत्ताच्या त्याला नक्कीच न्याय देत नव्हता. त्याचे जेल लावून स्टायलीश सेट केलेले दाट काळे केस, कडक कॉटनचा पांढरा कुर्ता आणि चुडीदार, वर त्याने आकाशी, चंदेरी फ्लोरल वर्क असलेलं मोतीया रंगाचं नेहरू जॅकेट घातलं होतं. खिशात आकाशी रुमालाचा त्रिकोण.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १६

सायराला शक्य असतं तर तिने चालत्या गाडीतून उडीच मारली असती. थोडं जखमी होणंही परवडेल. पण तरीही ती थरथरत गप्प बसून राहिली. तोही गप्पच होता. "डेड एन्डचं घर" म्हटल्यावर त्याने घरासमोर कार वळवून थांबवली. पावसात उतरून मागचं दार उघडून तिने सॅक काढली आणि पूर्णच भिजू नये म्हणून छातीशी धरली. दार लावल्यावर त्याला लिफ्टबद्दल थँक्स म्हणावं की आत्ताच्या वागण्यासाठी माफी मागावी हे न कळून काही क्षण तिने डोअर हँडल धरूनच ठेवलं. पण शेवटी काहीच न बोलता ती पावसातून घराकडे पळत सुटली. पावसात न भिजणे हे वरवरचं कारण पण मुख्य म्हणजे तिला शक्य तितक्या लवकर त्याच्यापासून लांब जायचं होतं.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १५

गाड्यांची एक रांग पास करून तो पुढे डावीकडे वळला आणि डॉक्टरांसाठी राखीव पार्किंगकडे जाऊन तिची वाट बघत थांबला. ती येऊन पहिल्याच ब्लॅक ऑडीसमोर थांबली.

"माझी नाहीये." तो गालात हसत म्हणाला.

"राईट!" ती पुढे होऊन शुभ्र चमकत्या लेक्ससपाशी गेली.

त्याने नकारार्थी मान हलवली आणि पुढे होऊन चालू लागला.

पुढच्या लालभडक फरारीकडे ती बघतच राहिली.

"डॉ. पंडित! एका सेलिब्रिटी पेशंटने गिफ्ट दिलीय" तो मागे न बघता म्हणाला.

ओहो, चंदाचे कॉस्मेटिक सर्जन! लाईफ इन प्लास्टिक, इट्स फँटास्टीक! तिने मान हलवली.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to कथा कादंबरी
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle