April 2017

उगाच काही बाही

Cool अ‍ॅडमिनटीमने सृवा घोषित केल्यावर मी लगेचच थंड्या वाहत्या गंगेत हात धुवून घेते आहे Cool

उगाच काही बाही बोलून ठंडी ठंडी कूल कूल राहणारी विशाखा इथल्या मैत्रिणींसाठी.....

*************************************************************************************

Keywords: 

सृजनाच्या वाटा : ठंडा ठंडा कूल कूल : घरची बाग

४ दिवसाची भारत वारी झाली, तिथून निघताना डोळे ओले होतातच. आपली माणस तर पाहिजे च असतात शिवाय हिरवाई , झाड खूप मिस करते मी.
पण कर्मभूमी मध्ये येणे भाग असते. काल रात्री परत आलो. इथल्या उन्हाळ्याच्या रखरखाटाबद्दल आम्ही तक्रार ही नाही करु शकत कारण बोलून चालून हे तर वाळवंटच. विमानातून खाली बघताना नुसते लांबच लांब पसरलेले वाळवंट दिसते..

मी आता बाल्कनीतच भर्पूर झाड लावली आहेत , बुडत्याला काडीचा आधार :)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

मृदू आवाज

एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वातच असं काहीतरी असतं की त्याची समोरच्यावर लगेच छाप पडते. कोणाची उंची छान असते, काही लोक दिसायलाच खूप छान असतात, कोणाचं हास्य अगदी मनमोहक असतं तर काहीजणांचा आवाजच चक्क मृदू असतो म्हणे! मृदू, म्हणजे नुसता गोड आवाज नाही… गोडही आणि शिवाय हळूवार आणि तलम असाही! म्हणजे अगदी विविधभारतीवरच्या निवेदकांचा असतो तसा (कोणतेही एफेम चॅनेल नाही हां, विविधभारतीच. बाकी एफएम चॅनलवरचे ते आरजे आणि मृदू आवाज यांचा काहीच संबंध नाही. तर ते असो.) असं म्हणतात, की असा गोड आवाज ऐकून समोरची व्यक्ती खुश होऊन जाते म्हणे, तिला आपण खूप स्पेशल आहोत वगैरे असंही वाटायला लागतं म्हणे..

लेख: 

वारा

वारा
आला आला आला
कोणी पहिला ?
कसा दिसला ?
नाही कळला ,आला आला आला

अलगद पडदा हलला,
घरभर फिरला
प्रत्येक जण हसला
आला आला आला

आला म्हणता पसार झाला
कोणी नव्हते खेळायला
रागावला, गरम झाला
स्तब्ध व लाही लाही झाला

अंगात आले,गरगर फिरला
धुळीने माखला
धक्का दिला झाडाला
गेला गेला गेला

ढगांना गराडा घातला
गडगडाटात कडकडून भेटला
अश्रूत न्हाला
आला आला आला

थरथर कापत आला
दार कोणी उघडीना त्याला
दुलई शोधू लागला
गारव्यातच उभा राहिला

फुंकर मारली शेकोटीला
पर्णेच पांघरला
ऊब मिळाली शरीराला
सुगंध उधळीत आला

लू sलूsलू sलूs करत बहुरुपी अनिल बनला

कविता: 

ऑनलाईन विणकाम शिकण्याबाबत

विणकाम, क्रोशा आणि दोन सुयांचे ( क्रोशा आणि निटिंग) मी गेली पाच वर्ष ऑनलाईन शिकवते. बऱ्याचदा याबाबत विचारणा केली जाते, कसे शिकवता, कसे जॉईन करता येईल वगैरे. तर त्यासाठी हा लेख. ( मै टिम हे आपल्या नियमात बसत नसेल तर कृपया धागा उडवावा ___/\___)

"शिकाशिकावा"  हा ब्लॉग कोणासाठी आहे ? 
हा ब्लॉग रिस्ट्रीक्टेड  आहे. म्हणजे तो फक्त सदस्यांसाठीच खुला आहे; सार्वजनिक नाही.

या ब्लॉगचे सदस्यत्व कसे घेता येईल ? 

कलाकृती: 

सागरओढ

Sea Fever : BY JOHN MASEFIELD या कवितेचा स्वैर अनुवाद

सागरओढ

आज गेलंच पाहिजे, खोल खोल एकांत समुद्रात आभाळासोबत,
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;
सुकाणूचा ताबा अन वाऱ्याच्या शिळेवर फडफडणारे शुभ्र पांढरे शीड,
सागरावरच्या गुढ गडद धुक्याला कापत जाणारा संधीप्रकाश.

मला पुन्हा जायलाच हवं, समुद्रात खोल खोल, बोलावतेय प्रत्येक लाट
वाऱ्याचा तो पुकारा, अगदी आतून आलेला, नाहीच टाळता येणार आता;
शुभ्र नभांनी गच्च भरलेला वादळी दिवस हवाय फक्त एक,
फेसाळलेल्या फुटणाऱ्या लाटांचे तुषार, सीगलचा आर्त पुकारा.

मला गेलच पाहिजे समुद्रात खोल खोल, त्या वेड्या दर्यावर्दीसारखं,

कविता: 

काही वेगळंच...

धो धो पाऊस
विजांचा कडकडाट
भरून आलेला अंधार
वेढून टाकणारा गारवा...

तशीच थोडी भिजत
थोडी थरथरच
थोडी कापत
मी वर्गात शिरले

वर्गात फक्त तू,
तू ही भिजलेला...
रुमालानी तोंड पुसत
तू वर बघितलस मात्र...

अन त्या एका क्षणात
तू काही वेगळच शिकवत गेलास
अन मीही शिकत गेले
काही वेगळच...!

कविता: 

फावल्या वेळेतील पराक्रम

हॅलो मैत्रीणींनो,
काहीना ना काही काम करत राहायच्या सवयीमूळे बरेचदा काही गोष्टी हातून तयार होऊन जातात. बर त्या गोष्टींचा काही उपयोग असलाच पाहिजे, आपण पुढे त्या वापरल्याच पाहिजे हे असले फाल्तु प्रश्न त्यावेळी पडत नाही. उगाच हाताला, बोटांना काही काम म्हणुन करत राहायच, राहिलेलं काही हातावेगळं करायच. बरं ते क्रिएशन सर्वांन सेपरेट धाग्यात एक्स्प्लेन करुन सांगण्याइतपत मोठं किंवा गरजेच असावच असा आपला विचारही नसतो.

मुद्दा म्हणजे मी असल्या फालतू टिवल्याबावल्या भरपूर करत राहते. वाटल कि माझ्यासारखे आणखी कोण इथ असतील तर तेपन आपले स्पेअर टाईम उद्योग इथे शेअर करतील.

Keywords: 

कलाकृती: 

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

माझ्या साजणा,माझी हौस कि हो पुरावा
माळा कि माझ्या केसात मोगऱ्याचा गजरा

धवल पुष्पे,गंध मादक हा बरवा
धरा जीवलगा,हात हातात कि धरा

वीणेची तार छेडता, वेड लागले जीवा
वीजू चमकता जैसे नाचे मन मयुरा

वैभव विपुल आता घर कि सजवा
वैशाख तृतीया आज, सख्या येतील घरा

द्याया शुभेच्छा, आंबे-डाळ, पन्हे बनवा
द्या हरभऱ्याची ओटी, येऊ द्या थंडगार वारा

सख्या म्हणती रहावा जीवनी गोडवा
लाजती 'नाव'घेता,दिन झाला साजरा

गौरी निघाली आपुल्या गावा
या शुभ दिनी हसत मुखे पाठवण करा....

कविता: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle