April 2017

अस अस घडलं... ६. आणि मी मोठा झालो.

(अश्मयुगातल्या रामची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )

रात्र झाली होती. आमची सर्वांची जेवणं झाली अन मग सगळे बाबांच्याभोवती जमले.
मुलं ओरडू लागली, "गोष्ट गोष्ट ! आज जंगलात काय काय झालं, त्याची गोष्ट ! "
मोठे बाबा हात वर करत म्हणाले, " अरे हो हो ! पण आधी सगळे शांत बसा बरं. आज रामचे बाबा गोष्ट सांगतील."
मी खुष झालो. आज माझे बाबा गोष्ट सांगणार !

लहान मुलाच्या सर्जरीसाठी मदतीचे आवाहन

ही एक माहितीतली केस आहे. सायन बाचर ह्या ५ वर्षीय मुलाला Tricuspid atresia, VSD, Severe PS, हा धमन्यांशी संबधित आजार झालेला आहे. मुलाच्या ह्रदयाला ३ भोके होती. त्यातली २ चे ऑपरेशन झाले व ते यशस्वी झाले. त्याच्यावर तातडीने ऑपरेशन होणे गरजेचे आहे. तिसरे ऑपरेशन करायला डॉक्टरांनी मागील वर्षीच सप्टेंबरमधे सांगितले होते पण पैशाअभावी पुढे ढकलेले. त्याचे वडील इलेक्ट्रीशियन असून त्यांना पैशाची आत्यंतिक निकड आहे. सर्जरीला साधारण ५ लाख रूपये खर्च येणार असून त्यातील १.५ लाख जमले असून अजुनही मोठी गरज शिल्लक आहे. डॉ. फी कमी करायला तयार नाहीत.

माझं दुसऱ्या डावातील शिक्षण...

काही तीन-चार वर्षांपूर्वी मी आणि माझी एक मैत्रीण वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरलेलं एक चित्रप्रदर्शन बघायला जात होतो. दादर स्टेशनपासून वरळीला जाणारी बस प्रभादेवी भागातून जाते. तिथल्याच आर्किटेक्चर कॉलेजात मी माझं पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं होतं. त्या गोष्टीला साधारण वीस वर्षे उलटून गेली होती. त्या एकेकाळी सुपरिचित असलेल्या रस्त्याकडेच्या बैठ्या चाळींच्या जागी आता उंचच उंच इमारती आल्या होत्या आणि माझ्या डोक्यावरच्या दाट, काळ्या केसांच्या जागी विरळ, पांढरे केस!. सगळा परिसर किती बदलून गेला होता. कितीतरी नवे फ्लायओव्हर, नवी दुकानं, सगळा रागरंगच नवीन होता.

Keywords: 

लेख: 

बक्लावा - खाऊगिरीचे अनुभव ३

न्यूकासलला जेसमंड मॉलमध्ये मिशेल्स नावाचं एक केक्स आणि पेस्ट्रीजचं दुकान होतं. मला तेव्हा केक्स आणि पेस्ट्रीजचं फारसं आकर्षण नव्हते. भारतीय गोड पदार्थ जास्त आवडत होते. परदेशी गोड पदार्थ फारच अगोड वाटायचे. एक दिवस नवरा म्हटला की "चल तुला मिशेल्समध्ये बक्लावा खाऊ घालतो". तेव्हा बक्लावा हे काय प्रकरण आहे ते मला अजिबातच माहित नव्हतं. मी त्याला विचारलं "हे काय असतं?" तर तो म्हटला "एक टर्कीश गोड पदार्थ असतो. आवडेल तुला" म्हटलं बघुयात तरी काय आहे हे. आम्ही एकेक बक्लावा घेऊन तिथे खायला बसलो. तेव्हा सुद्धा फोटो काढलेले नाहीत. खालचे फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.

लेख: 

ImageUpload: 

चित्रपट, मला आवडलेला / न आवडलेला ...

आपण चित्रपट पहात असतो त्यातले काही आपल्याला खूप आवडतात तर काही बिल्कुल आवडत नाहीत... इथे आपण त्याबद्दल बोलू ... आवडलेल्या चित्रपटाचं परीक्षण लिहिणं सगळ्यांनाच शक्य नसतं पण हा मुव्ही आवडला हे सांगावस तर वाटतं , ते इथे सांगत जाऊ
न आवडलेले मुव्ही का नाही आवडले ,अर्थात त्याबद्दल लिहावंसं वाटत असेल तरच हो :ड

जमलं तर थोडक्यात कथानक लिहू नाही तर फक्त विषय लिहू ...आवडलेला प्रसंग , आपली मतं सगळं सगळं जे बोलावंसं वाटेल ते लिहू

चित्रपट नवीनच असावा अशी अट नाही जुने पिक्चर ही पाहतोच की आपण, त्या बद्दल लिहू.

Keywords: 

स्वागत

स्वागत
शिशिर सरता सरता सांगे वसंताशी
बर का नीट कर सृष्टीशी
अन बहरला कि रानी-वनी
पिका गानाची घाली मोहिनी
गुलमोहरा दिली लाल वसनं
बहावा वर लाविली पिवळी केतनं
मधुरा फळांची परीक्षिती कोण कोण?
रावे नि सारे खग गण
आली आली चैत्रगौर
नवरात्रीच्या तृतीयेस माहेरी
नवरात्रीत जागवा नवदुर्गा नि अंबिका
गालात हसली रेणुका
उधळा उधळा मोगरा न सुगंधी फुले
नि ती उधळील सुवर्णफुले
सौख्यासिंधू च्या लहरी या लहरी
स्पर्शल्या मनास, चढल्या शेखरी ...

विजया केळकर___

कविता: 

ऋतुचक्र

उन्हाच्या झळा, आता तीव्र होऊ लागतात
कोकिळाला आपला सूर, बरोब्बर सापडू लागतो
आसमंतात आंब्याचा गंध, दरवळू लागतो
वाळक्या सुक्या फांद्यात, हिरवा रंग घुमू लागतो
अन रानातल्या झाडांमधून, "वसंत" पिंगा घालू लागतो

आभाळात काळे-निळे ढग, डोकावू लागतात
मधूनच वा-याच्या अंगात, वादळ घुमू लागते
भूमीची तृषा अजूनच, भेगाळत वाढत जाते
कोकिळाची लकेर, आता अधिकच तीव्र होऊ लागते
अन त्या तिथे, नैऋत्येकडून "ग्रीष्मा"ची चाहूल येऊ लागते

आता फुटतो, आवाज पेर्ते व्हा ला
शेता शेतात, लगबग वाढीस लागते
झाडांच्या निष्पर्ण टोकांना, उभारी येऊ लागते
अन आकाशातून जीवन, अक्षरशः कोसळू लागते

कविता: 

अस अस घडलं... ७. आणि मी मोठी झाले.

(अश्मयुगातल्या सीतेची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )

पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "

आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.

लेख: 

चाय गररररररम ... मी केलेल्या कपातून!

IMG_20160828_080221-COLLAGE-01.jpeg

हे मधे केले होते. आपल्या घरी सुखाने नांदताहेत.

Keywords: 

कलाकृती: 

ग्रीष्म

ग्रीष्म
सरले नवपल्लवांचे कोवळेपण,वृक्ष झाले घनदाट
गळले पुष्पदल, आला फळांचा बहर
उठले सूर्यदेव घाई-घाई, लवकर झाली पहाट
पडले ग्रीष्म पाऊल, झाला उष्म्याचा कहर ---
स्वतापे तापला, चाल मंदावली
ढग सरसावला करण्या सावली
तापे विरला, सरला मागे आल्या पावली
वाट पहाता संध्या खंतावली ---
तप्त वारा.. द्या द्या त्यास थंडावा
पाजा पाणी वा पेय थंडगार
अडोशाला आला रानपाखरांचा थवा
बालकांच्या आनंदा न पारावार---
पिवळी खिरणी,लांब काकडी
बदामी खरबूज, लाल टरबूज
विविध आंब्यांची हात गाडी
पण सारे करती कुजबूज ---
जांभळे हिरवीच आहेत अजून
मोगरा गंध मुठीत आहे धरून

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle