March 2018

ठंडाई मूस (thandai mousse)

सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी रे होळी, पुरणाची पोळी हे नेहमीचंच आहे, पण आज उठल्या उठल्या ही नवी मस्त रेसिपी दिसली म्हणून इथेही सांगतेय.
इच्छूकांनी लाभ घ्यावा :)

साहित्यः
१. कंडेन्स्ड मिल्क - साधारण २०० ग्रॅम किंवा अर्धा टिन
२. दूध - २ कप
३. क्रीम (फेटलेले) - २ कप
४. जिलेटीन - १ टीस्पून
ठंडाई पेस्टसाठी:
१. भिजवून सोललेले बदाम, पिस्ते, काजू/सोललेल्या कलिंगड बिया - प्रत्येकी सात आठ
२. खस (वाळा) इसेन्स - १ टीस्पून
३. बडीशेप - २ टीस्पून
४. वेलदोडा पूड - १ टीस्पून
५. खसखस - १ टीस्पून
६. जायफळ (किसून) - १ टीस्पून
७. पांढरी मिरी - १ टीस्पून

कृती:

Taxonomy upgrade extras: 

मराठी भाषा दिन २०१८ मध्ये स्पर्धकांनी केलेल्या कविता

मैत्रीण.कॉमने मराठी भाषा दिन २०१८ निमित्त घेतलेल्या स्पर्धेतील हा एक टप्पा होता.

स्पर्धेची रूपरेषा :

१. खाली एकूण १५ शब्द दिले आहेत.
२. या शब्दांमधून निदान ३ शब्द वापरून तुमच्या गटाला एक काव्य रचायचं आहे.
३. हे काव्य आरती, अभंग, भावगीत, मंगलाष्टक, श्लोक, ओवी यापैकी एका प्रकारात मोडणारं असावं. काव्य गंभीर, भावूक, विद्रोही, विडंबन अथवा विनोदी कसंही चालेल. यमक जुळेल असं हवं आणि काव्यातून काही अर्थ निघावा अशी अपेक्षा आहे.
४. काव्य किमान एक कडव्याचं असावं आणि बाकी कितीही मोठं असेल तरी चालेल.

कविता: 

गायन, वादन, कला-प्रदर्शन आणि फिल्म्स/नाटकांचे कार्यक्रम - माहिती आणि परिक्षण

आपल्या गावांतील शास्त्रीय, उपशास्त्रीय वा इतर प्रकारचे गायन, वादन यांचे कार्यक्रम कधी आहेत याची माहिती द्यावी.
याशिवाय एखाद्या विशिष्ट कला-प्रदर्शन किंवा नाटक/फिल्म्सचे छोटेखानी कार्यक्रम तुमचय शहरात होणार असतील तर ती ही माहिती आवर्जून द्यावी.
तसेच बघून आलेल्या कार्यक्रमांचं परिक्षण, चांगले वाईट पैलू इथे लिहावेत.

कर्करोग - ४ (उपचार पद्धती)

मागील भागात आपण कर्करोग होण्याच्या संभाव्य धोका ओळखण्यासाठीच्या जनुकीय चाचण्यांबद्दल थोडक्यात चर्चा केली. या भागात, कर्करोग झाला असता सध्याची अत्याधुनिक उपचार पद्धती आणि त्यामागचा विचार याबाबत बोलूया. या लेखाची व्याप्ती allopathy पर्यंत मी मर्यादित ठेवली आहे. आयुर्वेद आणि बाकी उपचारपद्धतीचा समावेश यात नाही

Keywords: 

पायनॅपल राईस

पायनॅपल राईस

साहित्य

१ भांडे बासमती तांदूळ
१/२ भांडे अननसाचे तुकडे ( मी टिन मधला वापरला )
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
२ तमालपत्रे
४ लवंग
१ छोटा चमचा लसूण पेस्ट
थोडे गाजराचे तुकडे, भो मि चे तुकडे, आवडीप्रमाणे, आज मी थोडी फरसबी पण ढकलली Heehee

कृती

तांदूळ २०/३० मि धुवून निथळत ठेवले, थोड्या तुपावर एक तमालपत्र घालून परतले, दीड भांडी पाणी वापरले, शिजताना मीठ घातले, यावेळेस टिन मधले पण पाणी घातले, भात शिजल्यावर मोकळं करून गार होऊ दिला.

पाककृती प्रकार: 

ती आहे पूर्णत्व…पुरूषाचं.

लहानपणी आजीकडून त्यांनी एक गोष्ट ऐकली होती, बृहन्नडेची. अर्जुनासारखा शूरवीर , धनुर्धारी, महापुरुष एका वर्षासाठी स्त्री होतो त्याची कथा. दहा बारा वर्षाचा असताना ऐकलेली ती गोष्ट. राम, कृष्ण यांच्या मैत्रीच्या , पराक्रमाच्या गोष्टीनी भारून जायचं वय होतं ते. तोपर्यंत प्रत्येक खेळात त्याला राम किंवा कृष्ण व्हायचं होतं. कृष्णच जास्त. त्याची ती बासरी वाजवणं, गोपिकांसोबत मस्ती करणं हे सारंच आगळावेगळ वाटायचं. त्याचा धोरणी चतुरपणा, सोयीस्कर सबबी सारं काही मानवी वाटायचं. मग अशातच कधी तरी पांडवांची, त्यांच्या कथाविश्वात एन्ट्री झाली. पाच भावांमध्ये मिळून एकच बायको. पाच भाऊ पण.

लेख: 

अमेरिका भेट - कुठे जाऊ, काय करु?

मी आयुष्यात पहिल्यांदा अमेरिकेला जाणार आहे. शिकागोपासून १ तासाच्या अंतरावर ट्रेनिंग आहे. २५ एप्रिलला ट्रेनिंग संपेल. मग मी २ दिवस् सुट्टी टाकली आहे.
२५ एप्रिल संध्याकाळ ते २९ एप्रिल असा फिरण्यासाठी वेळ आहे माझ्याकडे. ३० एप्रिलला भारतात परत यायचे आहे.
मी एकटीच फिरणार आहे.
तर कुठे जाऊ, कशी जाऊ, काय बघू? कुठले मुख्य पटेल पॉईंट्स बघु? कितीही सुरक्शित शहर असेल तरी कुठलातरी भाग असुरक्शित असतो. तो कसा शोधू आणि टाळू?

महत्वाच्या गोष्टी:
१. मी रुपयात कमवते. रोजचा विमान प्रवास खूप महाग पडेल. त्यामुळे एकाच ठिकाणी जाऊन राहुन जवळपासचे बघायचे असा विचार आहे.

Keywords: 

मुळ्याचे पराठे

माता इकडे असली की एरवी ऑप्शनला टाकलेले सगळे किचकट, कंटाळवाणे, निगुतीने करायचे पदार्थ आठवायला लागतात. खाऊन खाऊन वजन वाढू शकणे हा बारिकसा धोका सोडला तर हे पदार्थ आईबरोबर करायला छान मजा येते. मस्त गप्पा मारत, जुन्या आठवणींना उजाळा देत अधून मधून आईचा ओरडा खात (नीट लाट, असा धसमुसळेपणा नको करूस वगैरे) हा हा म्हणता म्हणता काही तरी छान बनवून पण होते आणि ते नेहेमीच खूप खूप छान होते. आईच्या स्पेशल रेसिपीचे हे मुळ्याचे पराठे. एरवी मुळ्याला मनापासून नाक मुरड्णार्‍या मुलाने ३ पराठे खाऊन आजीला तू आईपेक्षा चांगला स्वयपाक करतेस असे सांगण्याचे सत्कृत्य पण केले.

साहित्य

सारणः

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

ग्लुटेन-फ्री नसलेले अर्थात कणकेचे लाडू

थंडीमधे मला हे लाडू करायला फार आवडतात. पटकन होतात,पाक वगैरे नसल्याने सोपे आहेत आणि बर्‍यापैकी गुणी आहेत, काहीही घातले तरी बहुतेक चांगलेच लागतात.

साहित्य
४ वाट्या नेहेमीची कणिक (गव्हाचे पीठ)
१/२ वाटी डाळीचे पीठ (बेसन)
१ वाटी तूप (लागल्यास थोडे जास्त)
१.५-२ वाटी बारीक चिरलेला गूळ
२ टेबल्स्पून पीठीसाखर
बाकी मग मी घातलेले साहित्य खालीलप्रमाणे
२ टे. स्पून काजू
२ टे. स्पून आक्रोड
२ टे. स्पून सालासह बदाम (हे सगळे फूड प्रोसेसर मधून भरड पूड करून घेतले)
१ टेबलस्पून भाजलेल्या तीळाची पूड
७-८ सुके अंजीर अगदी बारीक चिरून
३-४ खजून बी काढून बारीक चिरून
१ टेबलस्पून बेदाणे

कृती

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle