स्पॉयलर अलर्ट - पुढील लेखात बिभत्स रस आहे. तो अगतिकते पोटी आलेला आहे. कोवळ्या मनाच्या वाचकांनी खरंच वाचू नये. चुकून माकून कुठेतरी "करुण" रस जाणवला, तर तोच योगायोग समजावा.
सत्याचा शोध हा मनुष्याच्या डोक्याला लागलेला कायमचा भुंगा आहे. सापडलेलं फळ खाण्याजोगं आहे की नाही, पाऊस पडेल की ऊन अश्या प्रश्नांपासून कदाचित सुरुवात झाली असेल; पुढे समोरचा माणूस मित्र असेल का शत्रू, दिवस रात्र का होतात, प्रत्येक जिवाच्या जगण्याचं काय प्रयोजन इथपर्यंत. माणसाला प्रश्नच प्रश्न पडत गेले. एक उत्तर मिळून ही प्रश्नशृंखला थांबत नाही ते एक, दुसरं म्हणजे मिळालेली उत्तरंही वेळोवेळी तपासून बघावी लागतात. कधी कधी जुने सिद्धांत पुढे चुकीचे ठरतात, नवे पुरावे हाती लागतात. याला आपण साधारणपणे प्रगती असं म्हणतो.
वैदिक किंवा सनातन वाङमय म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ नसून संपूर्ण संस्कृतीचा 'Encyclopedia' आहेत. ज्यात भाषेपासून (व्याकरण) ते अंतराळापर्यंत (ज्योतिष) आणि आरोग्यापासून (आयुर्वेद) ते मनाच्या गाभ्यापर्यंत (उपनिषदे/दर्शने) सर्व विषयांचा ऊहापोह आहे. ढोबळ मानाने वैदिक वाङमयाचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
श्रुती साहित्य: ह्यात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ह्या चार वेदांचा समावेश होतो.
स्मृती आणि इतर पुरक साहित्य: ह्यातील मुख्य घटक खालीलप्रमाणे
“परत हिचं काय अजून नवीन???”
हा प्रश्न पाडून धागा उघडलात का???
बरेच दिवसापासून रादर वर्षांपासून मनात हे सुरू करायचं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जात होतं. भीती ही होतीच. इनव्हेस्टमेंट ची !
पण मारलीच एकदाची उडी.
सोन्याचे भाव कुठवर गेलेत यावर मी बोलूच नये खरं तर. सगळेच धस्तावलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी काही हजारात मिळणारी वस्तू आता लाखात मिळू लागली आहे.
ऋग्वेद म्हणजे जगातील आजच्या घडीला उपलब्ध असणारे सर्वात प्राचीन पुस्तक. ‘काय आहे ह्या पुस्तकात?’ असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर आहे कविता! अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर ऋग्वेद म्हणजे अनेक कविता संग्रहांचे संकलन आहे. वेगवेगळ्या कविंनी वेगवेगळ्या वेळी केलेल्या कविता असलेल्या पुस्तकांचा एकत्रित संच! ह्यातील प्रत्येक पुस्तकाला मंडल अशी संज्ञा आहे. आता हे संकलित वाङमय आहे म्हणजे त्याचे संपादन करणारी कुणितरी व्यक्ती असणार हे ओघाने आलेच. तर असे कितीतरी संपादक होऊन गेले ज्यांनी आपापल्या मतानुसार कविता आणि त्या पठण करण्याच्या पद्धतीनुसार ऋग्वेदाचे संपादन केले.
ऋग्वेदाचा निश्चित काळ ठरवण्याबाबत संशोधकांचे एकमत नसले तरी ऋग्वेदातील मंडलांच्या कालनुक्रमाबाबत तज्ञांमध्ये एकवाक्यता आढळते. आपण मागील भागात पाहिले की ऋग्वेदाच्या शाकल शाखेत एकुण दहा मंडले आहेत. भाषाशास्त्रज्ञांना असे आढळून आले की, ह्या दहा मंडलांची तुलना केली असता त्यातील भाषेत कालौघात झालेले बदल दिसून येतात. भाषाशास्त्र(Linguistics) आणि शैलीशास्त्र (Stylometric) ह्या दोघांच्या आधारे संशोधकांनी ऋग्वेदातील मंडलांचा खालील कालानुक्रम (Chronology) लावला आहे.
आता ह्यात मुद्दाम पाककृती लिहिण्यासारखं काही नाहीये, तरीही माझ्यासारख्या सगळे पदार्थ विसरून आणि पुन्हा वाचून करणाऱ्यांसाठी लिहून ठेवतेय. कदाचित तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा वेगळी चव मिळून जाईल.