November 2017

असंच एकदा..

ती एकटीच न्याहाळते क्षितिजावरले
आठवणींचे मूक काचेरी पक्षी..

कधी होते हिरव्याजर्द पानी लपलेले इवले घरटे
कधी त्यातून दिसे वर मेघांची निळसर नक्षी

कधी चोच वासुनी उधळे भंडाऱ्यागत भूक
कधी भरपेट सुस्त गुलबक्षी निद्रा मूक

कधी हिंदकळणारे काळे-कबरे वादळ
कधी डुचमळणारे किर्र रातीचे काजळ

कधी उगवतीला पसरेे सोनसळी मोहळ
कधी झुळझुळले नीलमण्यांचे ओहळ

कधी मुलायम शुभ्र पंखी लाभले बळ
कधी मोकळ्या झेपेत असे थरारती पानगळ

ती एकटीच न्याहाळते क्षितिजावरले
आठवणींचे मूक काचेरी पक्षी..

कविता: 

टोमॅटो शेंगदाणे चटणी

IMAG2700.jpg

हे कोरडं भाजून घेतलं
IMAG2703.jpg

आता तेलात लसूण आलं परतून घेतले
IMAG2704_1.jpg

त्यात टोमॅटो घालून खूप परतून घेतले
IMAG2705_1.jpg

टोमॅटो परतून शिजल्यावर सर्व मिक्सर मध्ये घालून मीठ साखर घालून घुररकन फिरवलं
चटणी तयार

Taxonomy upgrade extras: 

अहिल्या !

कोण होती अहिल्या ? पंचकन्यापैकी एक. ब्रह्माची निर्मिती. एक अप्रतिम सौंदर्यवती. गौतम ऋषींची पत्नी. एक पतिव्रता स्त्री! पण तिच्या सौंदर्यावर इंद्रदेव भाळले आणि त्याचा दोषही तिलाच लागला. अहिल्येच्या या गोष्टीत सगळीकडे पुरूषच आहेत. ब्रह्माने तिला निर्माण केली. या आपल्या कन्येसाठी गौतम ऋषी हेच योग्य वर आहेत, असे वाटून अहिल्येचे तिच्याहून वयाने खूप मोठ्या असणारया या तपस्व्याशी ब्रह्माने लग्न लावून दिले. या ऋषींनी, आपल्या या सौन्दर्यवती पत्नीच्या सौंदर्याला एक पुरुष म्हणून, पती म्हणून न्याय दिला असेल? कल्पना नाही. या सौन्दर्यवतीवर इंद्रदेव मोहित झाले. ही सगळी गोष्ट आपल्याला माहित आहेच.

Keywords: 

ऐसपैस अंगण

अंगण म्हणजे घराचंच एक अंग जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असत. प्राजक्ताच्या सड्याच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असत, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असत, गार गार वार्‍याच्या झुळूकेने शहारलेलं असत, कधी चंद्रदीपात तेवत असत तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असत.

लेख: 

प्रोटीन कटलेट्स

प्रोटीनयुक्त पदार्थांचा विचार करताना खूप पुर्वी खानाखजानामधे पाहिलेली संजीव कपूरची ही रेसिपी आठवली. प्रमाण नीटसं माहिती नव्हतं आणि युट्युबवर शोधायलाही वेळ नव्हता.
जसे आठवले तसे हे कटलेट केले, मस्त जमले.

साहित्यः
सोयाचंक्स - एक पाकिट
आवडीच्या भाज्या - मी एक कांदा बारीक चिरून, एक गाजर आणि लाल भोपळ्याची एक फोड किसून घेतली आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली.
चवीसाठी - मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या वाटून.
एक टेबल स्पून दही

पाककृती प्रकार: 

मसाला कोबी

कोबीची बोअरींग भाजी चविष्ट करण्यासाठी:

भाज्या - कोबी, सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो ह्या भाज्या लीड रोलमधे.
बाकी साईड रोलसाठी पिवळे कॉर्न, बेबी कॉर्न, मटार, रंगीत सिमला मिरची, गाजर वगैरे भाज्या आपापल्या आवडीप्रमाणे किंवा फ्रिजात सापडतील तश्या.

चवीसाठी: पावभाजी मसाला किंवा गरम मसाला, थोडं टोमॅटो सॉस, मीठ, साखर, थोडीशी हळद, लाल तिखट.

तेल किंवा बटर.

कोबी, कांदा, सिमला मिरची श्रेड करायची. टोमॅटोच्या मध्यम फोडी करायच्या.
गरम तेलात किंवा बटरात सगळ्या भाज्या एकदम घालायच्या.

पाककृती प्रकार: 

काश्मिरी लँब

साहित्य
२ कश्मिरी लाल सुक्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी जास्त करता येईल)
१ हिरवी मिरची (चवीप्रमाणे कमी जास्त करता येईल)
१ टीस्पून जिरे
१ टीस्पून कश्मिरी गरम मसाला / नसेल तर साधा गरम मसालासुद्धा चालेल
१/२ टीस्पून बडीशेप - साधा साधा गरम मसाला वापरणार असाल तर (काश्मिरी मसाल्यात कदाचित बडीशेप असू शकेल)
१ मोठा टोमॅटो
१ इंच आले
५-६ लसूण पाकळ्या
१ टेबलस्पून किसलेले खोबरे / नसेल तर खवलेला नारळसुद्धा चालेल
१ मोठा कांदा उभा चिरून
१ टीस्पून हळद
१ चिमूट केशर
१ टेबलस्पून दही

पाककृती प्रकार: 

करीब करीब सिंगल - एक सुहाना सफर

काल खूप वर्षांनी एखादा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आणि तो बघून इतकी मजा आली की लगेच लिहायलाच बसले!

तनुजा चंद्राने दिग्दर्शित केल्यामुळे एक जरा धाकधूक होती की तिचे आधीचे दुश्मन, संघर्ष असे मारधाड थ्रिलर्स असल्यामुळे एकदम हा रॉमकॉम कसा काय असेल.. पण मध्ये इतकी आठ दहा वर्षे गेल्यामुळे असेल कदाचित पण तिने हा विषय हाताळला आणि खूप सुंदर ट्रीटमेन्ट दिली आहे.

Keywords: 

माझी लग्नकथा

परवा अंजूताई रिलायन्समध्ये भेटली - मुलींसाठी ऑनलाईन स्थळे बघते म्हणाली, मी गारच! म्हणजे ऑनलाईन स्थळेही बघता येतात? सोपं काम आहे म्हणे.. म्हणजे आपली प्रोफाईल क्रीएट करायची फोटो, bio-data इतकं टाकून आणि आपल्याला कोणी इंटरेस्टिंग वाटले तर त्याला/ तिला अ‍ॅप्रोच करायचे, मग concerned व्यक्ती फोन्स, इमेल्स, व्हॉट्स अ‍ॅप, इतकं करून date वर जातात. लग्न ठरवतात नाही तर मग बाय बाय करतात एकमेकांना. मला माझी वेळ आठवली, बाबांची पूर्ण भरत आलेली स्थळांची डायरी आठवली.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle