लेख

शतायुषी भव !

शाळेच्या ग्रुपवर माझ्याच माहेरच्या कॉलनीत रहाणार्‍या मित्राने जेव्हा सांगितले की तू या वर्षी ५० वर्षांचा झालास, त्यानिमित्त मोठ्ठं सेलिब्रेशन असणार आहे, तेव्हा काय वाटलं कसं सांगू तुला? ५० नसले तरी २२-२३ वर्षे नक्कीच तुझ्या सान्निध्यात होते मी. तू यायचास तेव्हाचे १०-१२ दिवस म्हणजे मंतरलेले दिवस असत. अजुनही त्याचं गारुड आहे मनावर. लोक उन्हा-पावसाची तमा न बाळगता पायी चालत पंढरीला जातात, शिर्डी गाठतात. काय मिळतं त्यांना असा त्रास सोसून? माझ्या लेखी या प्रश्नांचं जे उत्तर तेच तुझ्यासमवेतचे दर वर्षीचे १०-१२ दिवस जगतानाचे उत्तर....निव्वळ आनंद.

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

'मी'पण माझे

या महिन्याचा साहित्य कट्ट्याचा विषय सगळ्यात अवघड विषय आहे...निदान माझ्या साठी तरी!

जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की 'यावेळी स्वतः बद्दल लिहायचं आहे' तेव्हा वाटलं, " माझ्याबद्दल लिहायचं म्हणजे तर किती काही लिहिता येईल. कारण माझ्या इतकं मला कोणीच ओळखत नाही." पण जेव्हा त्या दृष्टीनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये..

माझ्यातलं 'मी'पण शोधताना मला बरंच काही सापडतंय. माझ्या आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षांत मी कशी घडत आणि काही वेळा बिघडत गेले याचा अभ्यास करताना किती तरी interesting गोष्टी लक्षात आल्या.

लेख: 

आमचे प्राणी जीवन

"टॉयलेट मध्ये गेलो, बघतो तर काय, कमोड शॉवर च्या नळावर सरडा!! थोडक्यात वाचलो."
या वाक्याला अपेक्षित 'हो का, अरे बापरे' न येता समोरचं नाक मुरडून समोरच्या कपाळावर आठी पडली.

"भलत्या शंका घेऊ नका.कमोड वर बसण्या आधीच दिसला सरडा, बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीच्या टॉयलेट मध्ये काम केले."
कपाळाच्या आठ्या विरून अपेक्षित 'अरे बापरे' आले.
"हे तर काहीच नै, त्या चीन का थायलंड मध्ये एकाच्या टॉयलेट मध्ये अजगर होता. चावला ना भलत्या जागी.टाके पडले."
सरड्या पासून बचावलेल्या वीराने मनात 'हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी केलं पाहिजे.भलत्या वेळी भलत्या दचकवणार्या बातम्या बघत असते" अशी खूणगाठ बांधली.

Keywords: 

लेख: 

माझे गाव : एक संकलन

प्रस्तावना
टिमवित असताना आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवण्यासाठी मी एक कल्पना मांडली होती. डिस्टन्स मोड शिक्षण असल्याने आमचे विद्यार्थी अगदी खेड्यापाड्यात पसरले होते. त्यामुळे त्या त्या गावांचा इतिहास लिहिला जाईल म्हणून "माझे गाव" ही कल्पना मी मांडली. काही कारणांनी ती तिथे प्रत्यक्षात आली नाही. पण ही कल्पना मनात ठाम रुजून राहिली.

लेख: 

तेरा इमोशनल अत्याचार

मी सध्या आय एफ़ करतीये...

ते काय असतं..?

का..?

पण कशासाठी..? म्हणजे कशासाठी..?

पण तुला काय गरज आहे..?

चांगली बारीक झालीयेस आता.. शाळेत असताना खुप जाड होतीस..

तरीच एवढी खराब झालीये तब्येत.. शाळेत असताना जरा चांगली दिसायचीस..

शुगर नॉर्मल आहे म्हणालीस ना.. मग कशाला..? सगळं खावं.. नाही म्हणू नये..

२०० वगैरे चालते की.. काही होत नाही..

आमची बघ.. कायम ३०० ३५० असते.. पण खायचं सगळं.. आजच गोडाचा शिरा केला होता..

आम्हाला लागतचं गं.. आमच्यात गोडाशिवाय जेवण म्हणजे नाहीच.. ह्यांना तर आजिबात नाही..

कसा पितेस बिन साखरेचा चहा..? किती घाण लागत असेल..?

Keywords: 

लेख: 

रात्रंदिन तिला। युद्धाचा प्रसंग

१३ डिसेंबर २००१…
जर गुगलवर ही तारीख टाईप केलीत तर त्या दिवशी घडलेली एक खूप महत्वाची घटना आठवेल तुम्हांला… हो, त्या दिवशी दिल्लीमधे आपल्या देशाच्या पार्लमेंटवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तुम्ही सगळ्यांनी ही बातमी वाचली असेल. त्यानंतर काही दिवस मीडियामध्ये त्यावर खूप चर्चाही झाली. आणि नेहेमीप्रमाणे इतर नव्या ‘breaking news’च्या ओझ्याखाली ही बातमी दबून, लोकांच्या विस्मरणात गेली.
पण कितीतरी घरांमधे या एका घटनेचे पडसाद नंतर जवळजवळ एक दीड वर्षं ऐकू येत होते….आणि आमचं घर हे त्यातलंच एक होतं!

लेख: 

ती_आणि-त्या १

ती

पण काय हरकत होती त्यांनी सोहमला दोन तास सांभाळायला. तिची नुसती चिडचिड चालली होती. पॉपकॉर्न फुटावे तशी ती फुटत होती. सोहम च्या जागी निशा ताईंचा अर्णव असता तर त्यांनी दोन तास काय दोन महिने बघून घेतलं असतं. तुझ्या आईला मला कधीच मदत करायची नसते. ही काही आजची पहिली वेळ नाही. लग्न ठरल्यापासून बघते आहे मी. काहीही करताना निशा ताईंना माझ्यापेक्षा चांगलं घेतात त्या. मला काही करायचं झालं की त्या आजारी तरी असतात, किंवा उरकायचं म्हणून उरकतात.

Keywords: 

लेख: 

माझी सैन्यगाथा (भाग ४)

संध्याकाळी साडे पाच च्या सुमाराला गेस्ट रूम च्या बाहेर फेरफटका मारायला बाहेर पडले. सगळीकडे सोनेरी संधीप्रकाश पसरला होता. आकाशात केशरी, पिवळ्या रंगांची उधळण झाली होती. मी फिरता फिरता सहज मेस च्या मागच्या बाजूला गेले. तिथून खालच्या valley  चा पूर्ण view दिसत होता. मला हरिश्चंद्रगडा वरच्या कोकणकड्याची आठवण झाली. खाली पाहिलं आणि नजर तिथेच खिळून राहिली. हिरव्या रंगाच्या इतक्या छटा मी पहिल्यांदाच पहात होते… जणू काही Asian paints चं green shade card च!

लेख: 

म्युचुअल फंड्स- फंड का फंडा

हाय मैत्रिणीनो, कशा आहत??

गुंतवणुक म्हणजे काय आणि गुंतवणुकीची गरज याबाबत आपण मागील लेखात बघितलं.

आता वळुयात 'म्युचुअल फंड'कडे.

१. म्युच्युअल फंड म्हणजे काय??

म्युचुअल फंड म्हणजे शेयर्स, बाँड्स, दिबेन्चर्स, गवर्मेंट सिक्युरिटिज या आणि अशा प्रकारच्या गुंतवणूकीच्या पर्ययात, वेगवेगळ्या काँबिनेशनमधे एकाच वेळी गुंतवणुक करण्याची संधी देणारा पर्याय आहे.
"Mutual fund is a basket of investments.. as its name suggests it offers investment in mutual options"

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to लेख