माझा जन्म पुण्यात झाला. माझं बालपण च काय पण किशोरावस्थेचा तो सप्तरंगी काळ ही मी पुण्यातच अनुभवला. थोडक्यात सांगायचं तर माझं लग्न होईपर्यंत मी पुण्याच्या बाहेर फारशी गेले नाही.
लहानपणापासून मला 'आर्म्ड् फोर्सेस्' बद्दल जबरदस्त आकर्षण होतं. दरवर्षी २६ जानेवारी ला दूरदर्शन वरून प्रसारित होणारी गणतंत्र दिवसाची परेड बघणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असायची. दिल्लीच्या राजपथ वरुन शिस्तबध्द आणि तालबद्ध रीतीनी मार्च-पास्ट करत जाणारे ते सैनिक बघताना मला नेहमीच अभिमान वाटायचा. आणि सिनेमात दाखवतात तसं बऱ्याच वेळा त्यातल्या परेड कमांडरच्या जागी मी स्वतःला बघायचे.
पैसा आणि मानमरातब नात्यात आला कि नात्यांच्या झाडाला इजा होतेच, त्याची मुळे सैल होतातच. आणि मग या झाडाला आवश्यक असणारी प्रेमाची माती, जिव्हाळ्याचे पाणी आणि आपुलकीचे क्षार कितीही प्रयत्न केला तरी ह्रदयाच्या गाभ्यापर्यंत पोहचत नाही.
निस्सीम प्रेम, आपुलकी यांच्या जोरावर परक्यांनाही आपलंस करता येत, पण… पैसा नसेल तर आपलेही परके कधी होतात समजत नाही. किती विचित्र आहे माणसाचं वागणं? “भौतिक सुखाच्या गारपिटीसाठी नाती तोडणारी माणसे आणि किंचितशा प्रेमाच्या शिड्काव्यासाठी नाती जोडणारी माणसे” यामध्ये हाच तर फरक असतो. हेतुपुरस्य नाती कधीच टिकत नाहीत, त्यांचा आधारच स्वार्थ असतो.
प्रभात रोडला राहणार्या पांढरकवडे काकूंनी लिहिलेला लेख नुकताच (पुन्हा) वाचनात आला. ('प्रभात रोडला राहणार्या' असं लिहिलं त्याला कारण आहे. आईला पांढरकवडे आडनावाच्या तीन मैत्रिणी आहेत. एक प्रभात रोडला राहतात, दुसर्या बिबवेवाडीत आणि तिसर्या सिडनीत!) आईने त्यांच्यासाठी दिलेलं पार्सल (अर्धा किलो उपवासाची भाजणी. आमच्या घराशेजारच्या किराणादुकानात त्यांच्या घराशेजारच्या किराणादुकानापेक्षा पंचाहत्तर पैशांनी स्वस्त मिळते. खेरीज रोज मी जीआरईच्या क्लासला त्यांच्या घरावरूनच जाते.) त्यांच्याकडे पोचवायला गेले होते, तेव्हा त्यांनी लॅमिनेट करून घेतलेलं लेखाचं कात्रण हळुवारपणे माझ्या हातात ठेवलं.
एकटा , एकटी किंवा एकटं असणं ...अशा असण्यात खूप सामर्थ्य दडलंय. एकट्याला दुकटं असल्याशिवाय आयुष्य समृद्ध होऊ शकत नाही असा समज पूर्णतः चुकीचा आहे. आयुषातले अनेक महत्वाचे निर्णय किंवा जाणीवा आपल्यात मुरतात त्या आपण एकटे असतांना. स्वतःच एकटेपण नीट उपभोगता आलं पाहिजे;ते जमलं नाही तर एकटेपणा बोचतो..
माझ्या पिढीतल्या अनेक जणांना double income families चे तोटे आणि फायदे अनुभवायला मिळाले. शाळेतून घरी आल्यावर, शेजारून किल्ली घेऊन घर उघडायची जवाबदारी काहींना सांभाळावी लागली.
माझ्या कामाच्या वेळा आणि राहिलेल्या वेळात फॅमिली टाइम ह्या कसरतीत ड्रेन आऊट व्हायला झालंय. मागच्याच आठवड्यात पाच आफ्टरस्कूल कँपस ऑर्गनाईझ करुन शिकवावेही लागले.ऐन वेळी टीचर्स बॅकआऊट झाले.असे अनकमिटेड टिचर्स मुलांना कसे मोटीवेट करतील. पुढच्याच आठवड्यात टेस्ट आहे. शेवटी कँप कॅन्सल करणे ह्या उपायापेक्षा मी शिकवणे हा ऑप्शन घेतला. फार फार तारांबळ उडाली.पण शेवटी 'इट्स ऑल अबाऊट द किड्स ' हे माझं ध्येय समोर ठेवलं आणि धकून नेलं. हे सगळं सांगायचं कारण, मला लेख पूर्ण करायचा आहे हे माहिती होतं. सकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ ह्या कामानंतर इमोशनली आणि मेंटली ड्रेन आऊट व्हायला होतेय.
कर्करोग. याबद्दल सगळ्यांनीच काही ना काही ऐकलेलं किंवा वाचलेला असत. कर्करोगाचे वाढते प्रमाण, सध्याची परिस्थितीत आणि आपल्या एकूण जीवनशैलीचा विचार करता, या रोगाबद्दल योग्य माहिती असणं महत्वाचं आहे. मी या लेखमालेतून कर्करोगाची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
लोकमान्य टिळकांची सुप्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेलच. "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" हे ज्या बाणेदारपणे त्यांनी निक्षून (बाणेदारपणे हे नेहमी निक्षूनच असते किंवा जे निक्षून असते ते बाणेदारच असते) सांगितले तो बाणेदारपणा आजकाल कमी होत चालला आहे असे निरीक्षणात आले आहे. पूर्वी मराठी हिंदी सिनेमात तो बाणेदारपणा अगदी ठासून भरलेला असे उदा. विश्वासराव सरपोतदार कसे आठवणीने सत्तर रुपये परत मागतात किंवा जब तक बैठने के लिए ना कहा जाए चुपचाप खडे रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही - आठवलं तरी वाटतं की नंतर प्राण एकटा असतानाही खुर्चीवर बसत नसेल.
आजपासून एका नवीन लेखाच्या मालिकेला सुरुवात करत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक कला आहेत ज्यांचे स्थान आता कमी होत चालले आहे. त्यांची प्रत्यक्ष त्या कलाकारांकडून माहिती घेऊन ती सादर करण्याचा हा एक प्रयत्न. तर अशा कलांच्या भरभराठीसाठी शुभेच्छा देऊन आजची पहिली कला ह्या लेखाद्वारे सादर करत आहे. (फोटो क्रोम वरून दिसतील)
1. कामांची यादी करणे. प्रत्येक कामासमोर किती वेळ लागेल किंवा किती वेळात करायचे याचा tentative plan करणे.
हे सर्वांना जमेल असे नाही. जर तुम्हाला प्रत्येक गोष्टींचं दडपण येत असेल तर वेळ लिहायची गरज नाही.
2. आपल्याला काम करायला कोणती वेळ जास्त productive आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे plan करा.
काहींना भल्या पहाटे उठून केले की लवकर आणि चांगली होतात कामं. काहींना रात्री उशिरा जागून करायला आवडतं.
3. काम सुरू करण्या आधी हलका व्यायाम, brisk walk, sit ups, push ups, वणवण :P,running, पूजा, झाडांना पाणी देणे यातलं काहीही किंवा सर्व केले तरी चालेल.