लेख

'ती' (भाग-३)

Namaskar ती -भाग ३

आज ८ डिसेंबर.तिचा ४८ वा वाढदिवस .
आज माझ्या आनंदास पारावार नाही.कारणही तसेच आहे नं .
'ती' भाग १ आणि भाग २ वाचलेत? हो तर ठीकच आहे.
नाहीतर ते वाचा बघू .म्हंजे तुम्हाला कळेल अनायासे ...
अपूर्व योग जुळून आला दोन महिन्यांपूर्वी.शिवणमशीन
साठी तेल आणायला गेले असता तेथे एक gasशेगडीचा
डॉक्टर (मेकेनिक ) भेटला.आणि सहर्ष दुसऱ्या दिवशी आमच्या
घरी येईन असे आश्वासन देत फोन नं. ची देवाणघेवाण झाली.
आश्वासन पाळणारे लोक आहेत अजून म्हणून जग चाललेय.

लेख: 

ImageUpload: 

अर्थशास्त्रातील २०१८ चा नोबेल पुरस्कार

लेखिका - मामी

'हवामान बदल' या विषयावर काम करणाऱ्या विल्यम नाॅरडस आणि पॉल रोमर या द्वयीला यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडगोळीने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ९ : लिमिटेड संस्कार

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!

------------------------------------------------------------------------------------------------

ऑफिसमधून येऊन नुकतीच घरात शिरले तर बाजूच्या खोलीतून किंकाळी आली - I am dead, I am dead!! -

लेख: 

अनमोल नथ

माझ्या आईच्या पश्चात इतके वर्ष बहिणीने संभाळलेली तिची नथ अलीकडेच फार मोठ्या मनाने तिने मला दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. मला स्वतःला नथ घालणे खरं तर आवडत नाही पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला माझा सन्मानच वाटला. त्यावेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.

Keywords: 

लेख: 

माझं आवडतं पुस्तक

आज माझ्या नवमैत्रिणीने अनुजाने आवडत्या पुस्तकाबद्दल लिहायला सांगितले आहे.  तर माझा हा बाल प्रयत्न. मला लगेच  सुचलेलं पुस्तक म्हणजे दुनियादारी लेखक सुहास शिरवळकर. मी वाचुन झाले त्याला  18-  19 वर्ष. तेव्हा मला खूप आवडली होती.  तेव्हाच ही कादंबरी येऊन बरीच वर्षे झालीच होते. तरी देखील वाचताना जनरेशन गॅप जाणवत नव्हती.

पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेपासूनच पुस्तकाचं वेगळेपण लक्षात येत. आणि जेव्हा मी विकत घेतली ही तेव्हा त्याचा प्रत्येय देखील आला.  मी वाचून एकाला ते पुस्तक दिले ते अजून 15 16 वर्ष झाली तरी परत मिळतेय आहे...

लेख: 

या नि:शब्दाचा नाद कोणता ?

काही महिन्यांपूर्वी 'काळोखाचा रंग कोणता' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं. सुरुवातीला केवळ एक कलाकृती म्हणून ऐकलं, आवडलंही. पण मग जरा विस्मृतीत गेलं. गेल्या काही दिवसात मात्र पुन्हा काही कारणाने तेच शब्द ऐकावेसे वाटले आणि तेव्हा ते नव्याने भावलं. किती सुंदर आणि निर्मळ पद्धतीने त्या शब्दात मनाची एक अत्यंत अवघड अवस्था व्यक्त केलेली आहे. नेमकं सांगायचं तर डिप्रेशन, आणि त्या गर्तेत गेलेली व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर.

Keywords: 

लेख: 

पिग वॉर (Pig War)

जगातल्या दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. रणशिंग फुंकलं गेलंय. एक गोळी सुटण्याचा अवकाश. कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. युद्ध नक्की कशासाठी? आजवर जगात विविध कारणांमुळे युद्धं झाली आहेत. पण कधी ऐकलंय दोन बलाढ्य राष्ट्रं लढाईसाठी सुसज्ज झालेली ती एका डुकरामुळे? हो! अमेरिकेच्या इतिहासात 'पिग वॉर' नावाने प्रसिद्ध असलेल्या या युद्धात अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन बलाढ्य महासत्तांनी सान व्हान बेटांवर एका डुकरामुळे रणशिंग फुंकलं होतं.

-xox- -xox- -xox- -xox- -xox- -xox-

पार्श्वभूमी -

लेख: 

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ५

बराच वेळ सलग रायडींग झाल्यावर राधाने मागेपुढे असलेल्यांना ब्रेक घ्यायची खूण केली. एक टपरीवजा दुकान होतं. सगळे थांबले. मस्त कडक चहा आणि मॅगी खाऊन पुढचा रस्ता सुरु झाला. अखेर संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करायला सगळे थांबले. ते एक लहानसं खेडं होतं. ग्रुपचा मुक्काम तिथल्याच एका होमस्टे मध्ये होता. दिवसभराच्या रायडिंगमुळे सगळेच दमले होते. सर्वांनी फ्रेश होऊन जेवणावर ताव मारला. जेवण साधंच होतं पण ते दिवसभराच्या थकव्यानंतर निशाला खूप आवडलं. झोपण्यापूर्वी सगळ्यांना राधाने परत उद्याच्या सूचना दिल्या. निशाला झोप आली नव्हती.

Keywords: 

लेख: 

आगंतुक

तुझं माझं नातं म्हणजे love hate relationship

तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम.....इतकं की त्यामुळे माझं अस्तित्व आलं धोक्यात.

माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल दुस्वास.. तुझ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त

आणि का नसावा ?? मला न विचारता आलास माझ्या आयुष्यात

आणि तेही चोर पावलांनी, माझ्याही नकळत.

किती सुखात होते मी....

प्रेमळ नवरा, गुणी मुली.....सगळं कसं अगदी आखीव रेखीव...

तुझ्यासाठी कुठेच जागा नव्हती - अगदी तसूभरही.. आणि तुझी गरज तर त्याहून नव्हती.

पण तरी तू आलास ....माझ्यावर नसलेला तुझा हक्क गाजवायला

लेख: 

पाने

Subscribe to लेख