प्रत्येक संस्था, कार्यालय आपल्या मनुष्य बळ विकासासाठी अनेक प्रकारचे ट्रेनिंग, मीटींग्ज, सेमिनार इ. सारखे कार्यक्रम हाती घेत असते. यामुळे त्या संस्थेचा फायदाच होत असतो. पण निवृत्त होणार्या स्टाफला आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने कसे घालविता येईल याचे ट्रेनिंग देणार्या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या संस्था मला माहित आहेत त्या पैकी आमचं ऑफिस एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे . नुकतीच मी Retirement and Investment Planning ह्या ट्रेनिंगला जाऊन आले आणि त्याने मी अक्षरशः प्रभावित झाले आहे.
ही माझी लाडकी मदतनीस व साथीदारीण कोण ?पाहिलत का ? म्हणून तर या- या म्हणत बोलाविले ना. अहो ही माझी आवडती '' gasशेगडी '' गेली ४६ वर्षे मी ती सतत वापरत आहे. लग्ना नंतर इतक्या लवकर मला ' ती ' मिळाली आणि स्वयंपाकासाठी कोळशाची शेगडी किंवा भुसा-शेगडी किंवा स्टोव्ह या साधनांचा उपयोग जास्त करावा लागला नाही जे मला जमत नव्हते.तसेच त्या छोट्या गावात gasएजन्सी नव्हती तर एका दुकानदाराने भोपाळून आणून दिली होती व तोच दोन महिन्यांनी तिचे स्पेशल खाद्य म्हणजे नवीन सिलेंडर आणून देत असे.कालांतराने गावात एजन्सी आली.तिची बटणे फक्त एकदाच बदलली आहेत.
आज ८ डिसेंबर. तिचा वाढदिवस. पण ........
काय काय करावे काही सुचेना असं झालय. ....विचार करता करता आठवतंय आमच्या विवाहाची तारीख२१ नोव्हेंबर.आणि २७ ला आम्ही दोघे ह्यांच्या नोकरीच्या गावी गेलो होतो.सवय नसल्याने कसंबसं काम निभवत होते अन् चमत्कार झाला म्हणायचा -' ती ' आली माझ्या घरी.... आनंदी आनंद गडे.......
कामात हुश्शार असावी हे पहाताच कोणीही जाणावे अशी. देखणी देखील.येताच कामास लागली.
ही ख़ुशी कोणाबरोबर शेयर करावी हे ही उमजेना. गावात नवीन,शेजारी-पाजारी तेवढी ओळख नाही.
काही काही गोष्टी उगाचच लक्षात राहतात . कॉलेज मध्ये सुहिता म्हणून मुलगी होती. माझ्या ग्रुप मध्ये नव्हती तरी मला ती आठवते . सुहिता शांत मुलगी होती आणि अभ्यासू पण. टिपिकल चोटी गर्ल्स म्हणतात तशी पण खूप छान. कॉलेज मध्ये एक अगदी भावखाऊ ग्रुप असतो, एक अभ्यासू ,एक गरीब आणि एक ओव्हरस्मार्ट . सुहिता अभ्यासू पण सुंदर मुलींच्या ग्रुप मध्ये होती. छान होती. गोरी थोडी शॉर्टच दोन वेण्या . जराशी स्वतःच्या विश्वात असणारी. तर तिचा तसा कॉन्टॅक्ट नव्हता बरेच दिवस. मग मध्ये एकदा मी बहिणीबरोबर ग्रेट साडी खरेदीला गेले म्हणजे टीपीkल सिल्क आणि पदराच्या साड्या मुंजीसाठी हव्या म्हणून. आम्ही साड्या बघायला लागलो .
एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील कै. शशिकांत गणपत घरत उर्फ अण्णा. अण्णांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथील फुंडे गावचा. आई,वडील चार भाऊ आणि पाच बहिणी असा आग्री समाजातील भला मोठा परिवार. अण्णा भावांमध्ये शेंडेफळ. अण्णांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. घरी शेती व मिठागरे होती. अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने सगळ्या मुलांना सक्तीने शाळेत घातलेले.
अंगण म्हणजे घराचंच एक अंग जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असत. प्राजक्ताच्या सड्याच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असत, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असत, गार गार वार्याच्या झुळूकेने शहारलेलं असत, कधी चंद्रदीपात तेवत असत तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असत.
आफ्रिकन सफारी करण्याचे स्वप्न कित्येक वर्षांनी साकार होणार होते. माझ्या आणि नवऱ्याच्या स्वभावानुसार आफ्रिकन जेवण मिळणार म्हणूनसुद्धा मन हवेत होते. १५-१६ तासाचा प्रवास करून रात्री ९ च्या आसपास नैरोबी एयरपोर्टवर उतरलो. आमचा गाईड आम्हाला हॉटेलवर सोडून, जुजबी सूचना देऊन, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला तयार रहायची आठवण करून देऊन निघून गेला. आम्हाला प्रचंड भूक लागली होती. म्हणून आम्ही हॉटेलच्याच रेस्टॉरंटकडे कूच केले. रात्रीचे १०-१०.१५ वाजले होते रेस्टॉरंट मध्ये शुकशुकाट होता. लॅम्ब चॉप्स ऑर्डर केले. जेवण येईपर्यंत धीर निघत नव्हता इतकी भूक लागली होती.
आगर म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर. अलिबाग साईडला वाडी ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तोच आमच्या भागात आगर ह्या शब्दाला.
आमचं आगर खूप मोठं आहे. पण आमचं घरच उतारावर असल्याने आगर ही तीन लेव्हल वर आहे . प्रत्येक लेव्हलला पाच सहा तरी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात आगरातल्या सगळ्या वाटा कोकणातल्या अति पावसामुळे उखडल्या जातात म्हणून दिवाळी पूर्वी सगळ्या वाटा चोपण्याने चोपून, शेणाने सारवून नीट केल्या जातात. घरात काही कार्य वैगेरे असलं की आगारातल्या वाटा ही अशा रांगोळ्या घालून सुशोभित केल्या जातात.दिवाळीत या वाटांवर पणत्या ठेवून त्या उजळल्या ही जातात . एरवी मात्र आगरात रात्री अगदी मिट्ट काळोख असतो.