April 2016

दिवेआगरमधील आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती हवी आहे.

नमस्कार मैत्रिणींनो,

येत्या आठवड्यात पूर्ण कुटुंबासमवेत गावाला जाणार आहे. (माझं गाव रायगडमध्ये माणगाव). गावी २ दिवसांच काम आहे. ते झाल्यावर कुठेतरी २ दिवस भटकायचं प्लान करतेय. कुटुंबामध्ये आम्ही ३ बहिणी, भाऊ, आई आणि बहिणीचा लहान मुलगा (वय वर्ष ४) आहोत.

एक ठिकाण short लिस्ट केल आहे, ते म्हणजे दिवेआगर. अलिबाग गेल्या सुट्टीत फिरून झाला आहे. तर तुमच्यापैकी कोणाला तिथल्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती असल्यास जरूर सांगावी. तसेच राहण्याची सोय, जेवण वगैरेचा अनुभव असल्यास जरूर सांगावे.

Keywords: 

मधुबनी आणि वारली पेंटींग

बर्याच मैत्रीणींना माहीत असेलच तरीपण परत एकदा सांगते.
मध्यंतरी आं.जा वरील एका पोस्टने आमचे डोके सटकले. तर ते सटकलेले डोके ताळ्यावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न...

IMG_1355.JPG
मधुबनी बुकमार्क-१

IMG_1359.JPG
मधुबनी बुकमार्क-२

IMG_1305.JPG
वारली बुकमार्क-१

Keywords: 

कलाकृती: 

राधाकृष्ण चित्र

भाच्यासाठी काढलेले पेंटिंग. फोटोशॉपमधे काढले आहे.
IMG_20160420_140627.jpg
कॉम्प बंद होत म्हणून फ्रेमचा काढलेला फोटो टाकलेला. आता काढलेले चित्र बघा

rahul.jpg

कलाकृती: 

करू तो क्या करू ?

मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही.

लेख: 

राज्य

जराजराशी सैल होऊ दे बोटांच्या गाठींची गुंफण..
जराजरासेे पुसून टाकू पाठीवरचे हलके गोंदण..
जराजराशी शांत होऊ दे कुंडलिनीची अलगद थरथर..
जराजरासे वाफ होऊ दे केसांवरचे गंधित दहिवर..
जराजरासा खुडून टाकू उरात भरला उनाड वारा..
जराजरासा उतरून देऊ देहावरचा मोरपिसारा..
जराजरासे हटव तुझे ते, पायांवरचे पाय आर्जवी.
जराजराशी फिकट होऊ दे ओठांवरची मोहमाधवी.
जराजरासे पुन्हा येऊ दे मला नियंत्रण श्वासांवरचे..
जराजरासा दृष्टीआड हो, राज्य त्यागुनि प्राणांवरचे..

-संघमित्रा

खूप दिवसांनी लिहीलेली कविता..

Keywords: 

कविता: 

नेकलेसकरता दोरी/कॉर्ड कशी बनवतात?

नेकलेसकरता दोरी, कॉर्ड कशी बनवावी किंवा विकत घेतलेली कॉर्ड असल्यास त्यात बिड्स वगैरे कसे घालावेत ह्याचे युट्युब विडिओ खूप दिवसांपासून शोधतेय पण अजिबातच मिळत नाहीयेत. कुणाला माहित असल्यास सांगा.
पहिल्या फोटोत दोन लूप्स दिसत आहेत पण दुसर्‍या फोटोत तसं काहीच नाही तेव्हा त्याकरता माझा प्रश्न जास्त वॅलिड होईल.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

आजोळ

अनिश्काच्या लेखावरून मला पण माझ्या आजोळविषयी लिहावसं वाटल. मला अजीबात लिहीता येत नाही तरीही प्रयत्न करतेय.

Keywords: 

लेख: 

नाटक - कुछ मिठा हो जाये

तसं बर्‍याच दिवसांनी नाटक पाहायला गेले होते. खरं तर मी नाटक सिनेमा कितीही पाहिले तरी त्याबद्दल फारसं लिहित नाही, पण ह्या नाटकाबद्दल जरा खासच वाटतय म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं.

Keywords: 

किल्ले रायगडला भेट देऊया

मुलींनो गेले काही दिवस मी शिवचरित्र जरा जास्तच वाचते आहे आणि ते वाचून रायगड येथे भेट देण्याची इच्छा जरा जास्तच वाढत चालली आहे. रायगड अशाकरता की रायगडावर वर पर्यंत जाण्यास रज्जुमार्ग उपलब्ध आहे. आणि नुकतीच गेल्या तीन वर्षात सिंहगड आणि प्रतापगड येथे भेट देऊन झाले आहे.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle