April 2016

इट युवर कलर्स - व्हेज कट्लेट्स

लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:

१. १/२ वाटी फरसबी (थोडिशी उकडुन)
२. २ बटाटे उकडून
३. १/२ वाटी मटार (थोडेसे ब्लांच करुन)
४. १/२ चमचा हळद
५. लाल तिखट
६. १/२ चमचा धणे - जिरे पूड
७. हिंग
८. मीठ
९. बाईंडींग साठी तांदळाच पीठ
१०. १ चमचा चिकन मसाला (सुहानाचं वापरला मी )
११. १ चमचा रवा (किंवा ब्रेड क्रम्स )
१२. तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती:
पा. कृ. एकदम सोप्पी सगळे जिन्नस एकत्र mash करून सगळे मसाले मिक्स करून हव्या त्या आकारात कटलेट्स बनवून थोड्याश्या तांदळाच्या पिठात किंवा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तेलात डीप फ्राय करा अथवा shallow फ्राय करा.

मार्किन्ग शिश्टीम.

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

ईट युअर कलर्स - फ्लॉवर बटाटा पॅटीस

आज माझं रायगडच्या केल स्मूदीसारखंच काहीसं झालंय. लेकाला आज शाळेतून आल्यावर पॅटीस हवे होते, त्यामुळे सकाळीच फ्लॉवर आणि बटाटा कूकरला लावून आणि हातात चहाचा कप घेऊन मोबाईलवर मै. उघडले आणि ही घोषणा वाचली. म्हटलं अरे वा, आज काहीच वेगळं नाही कराययंय, फोटो काढण्याशिवाय. त्यामुळे माझी एंट्री लगेच आलीच इथे.

फ्लॉवर बटाटा पॅटीस

पांढर्‍या रंगाची भाजी - फ्लॉवर आणि बटाटा

साहित्य

१. फ्लॉवर - ७ - ८ तुरे
२. बटाटे -२ किंवा ३
३. मटार - थोडे
४. ओटसचे पीठ - ३ मोठे चमचे (बाईंडर म्हणून). ब्रेड क्रंब्स, रवा, तांदूळ पीठही घेऊ शकता.
५. आले-लसूण पेस्ट - १ लहान चमचा
६. तिखट - २ ते ३ लहान चमचे

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला - ईट युअर कलरव - पिनव्हील्स

आज पण अगदीच योगायोग ... आज मैत्रिणी आल्या होत्या स्नॅक साठी... तर हे बनवले होते ... ते सगळे गेल्यावर इकडे डोकावले ... बहुतेक फिट होतीये रेसिपी

साहित्य सारण - २ बटाटे उकडून
१/४ वाटी मटार वाफवून
आल हिरवी मिरची, जीर
गरम मसाला

पारीसाठी- घट्ट भिजवलेला मैदा - जिरे पूड आणि मीठ टाकून

तळायला तेल

कृत्ती- थोडे तेल गरम करून जीरे परतून घ्यावे ,
मग त्यातच , आल मिरची वाफवलेले मटार गरम मसाला टाकून परतून घेतले..
मिश्रण खाली उतरवून त्यात मॅश केलेला बटाटा घातला , चवी नुसार मीठ घालून सारण तयार केले

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

बाळंतविडा

बस्कू आणि टीमने इतका छान उपक्रम (मैत्रिण) सुरू केलाय...पण वेळेअभावी इथे बागड्ता येत नाहीये.
तरी मी केलेल्या बाळंतविड्याचे काही फोटो.
आता काहीजणींना आठवेल की तिकडे मायबोलीवरही हे पाहिल्याचं. बरोब्बर. काही कपडे तेच आहेत. काही नवीन पण आधीच्यातल्या उरलेल्या कापडातलेच शिवले. असं लागतं किती कापड ......चिंगुल्यांच्या टिंगुल्या कपड्यांना!

हा पहा निळा चौकटीचा पायजमा आणि शर्ट.
शर्टावर निळा त्रिकोण आहे तो खिसा नाही बरं .... नुसता एक त्रिकोण लावून त्याला एक बटण लावलय.

कलाकृती: 

रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- मुळ्याचे लोणचे

वडे, भजी, कबाबमें ये लोणचं किधरसे आया असं वाटलं का? पण हा आपला लाल मुळा आहे आणि लाल "चटणी, लोणचे, कोशिंबीर" (तसंच हिरवी पेये) अजून चालू आहेत त्यामुळं याचं लोणचं केलंय.

साहित्य-
२ कप लाल मुळ्याचे तुकडे, पातळसर तुकडे किंवा जाड किसला तरी चालेल
१ टेबलस्पून मोहरी
१ टीस्पून मेथी
१ टीस्पून बडिशेप
२ टीस्पून लाल तिखट
थोडा हिंग आणि हळद
मीठ
साखर
२ टेबलस्पून तेल
अर्ध्या लिंबाचा रस

कृती-
मोहरी, मेथी आणि बडिशेप थोडी भरड कुटावे. मोठ्याच कढईत तेल तापवून घ्यावे. मग लो हीटवर त्यात हिंग हळद घालून मग भरडलेली मोहरी, मेथी आणि बडिशेप घालावी. तिखट घालून गॅस बंद करावा. तिखट करपू देऊ नये.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

डोहाच्या खोल तळाशी..

Julio Cesar नावाच्या ब्राझिलियन आर्टिस्टची चित्र पाहण्यात आली, कुठलाही फोटो बघून त्या माणसाचं व्यंगचित्र काढण्यात त्याची हातोटी आहे आणि ती चित्र फोटोपेक्षा अफाट सुंदर आहेत.

त्यातलंच हे एक चित्र माझ्या डोक्यात घर करून राहिलं आणि शेवटी उतरवलंच कागदावर..

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- लाल सिमला मिरचीची चटणी

लाल सिमला मिरची ची चटणी

साहित्य:
२ मोठ्या लाल सिमला मिरच्या(मध्यम आकारचे तुकडे करुन घ्यावेत)
१ मोठा टोमॅटो (मध्यम आकारचे तुकडे करुन घ्यावेत)
तेल
१ छोटा चमचा हरभरा डाळ
१ छोटा चमचा उडीद डाळ
२-३ सुक्या लाल मिरच्या(आवडीप्रमाणे कमी/जास्त)
हिंग
मोहरी
जीरे
हळद
मीठ
कृती:

कढई मधे तेल गरम करुन त्या मधे ह.डाळ आणि उडीद डाळ घालावी.
हलका लाल रंग आला की त्या मधे सुक्या लाल मिरच्या,हिंग,मोहरी,जीरे,हळद घालावी.
त्या वर सिमला मिरची चे तुकडे परतावेत.झाकण ठेवुन १ वाफ आणावी.
साधारण मऊ झाली की टोमॅटो चे तुकडे घालून परतावेत.
परत १ वाफ आणावी.
चवीप्रमाणे मीठ घालावे.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle