July 2022

बदतमीज़ दिल - २३

माझा स्वतःवर विश्वास बसत नाहीये, एवढी मी माती खाल्लीय. ती मला घाबरतेय. खुर्चीच्या टोकाला बसून ऑम्लेटचे लहानसे घास कसेबसे खातेय. टेबलाखाली तिचे पाय सलग हलत आहेत. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय. साहजिक आहे, काल संध्याकाळपासून इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यात... तो खाताखाता तिचं निरीक्षण करत होता.

काल सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या मनात ती फक्त त्याची कलीग होती आणि आज सकाळी अचानक फ्यूचर लव्ह इंटरेस्ट! अजून त्याच्या मेंदूला हे नीट प्रोसेस करता येत नव्हतं, पण दोघे मिळून काहीतरी ठरवता येईल, जर तिने आत्ता धीर करून त्याच्या नजरेला नजर दिली तर!

Keywords: 

लेख: 

आम्ही औरंगाबादकर.

आम्ही औरंगाबादकर...  हो .. हो ... थांबा!  मला माहिती आहे,  लेखाचा विषय दिलेला होता तो , 'मी औरंगाबादकर" असा  होता. पण आमच्या  औरंगाबादला , ' मी ' असे  काही नसते.  सगळे ' आम्ही ' असेच असते. ( आणि हे आम्ही आदरार्थी बहुवचन नाही तर खरेच बहुवचन असते. अनेक नात्या, संबंधा, आठवणींनी मिळून बनलेला मी कसा असणार? आम्हीच असणार!)  त्याच्यामुळे मी लिहिणार आहे, 'आम्ही औरंगाबादकर' ह्या विषयावर!  

क्रिमी मसाला भिंडी/भेंडी

ही पाककृती मी १,२ आठवड्यापूर्वी युट्युबवर पाहिली होती. आवडली म्हणून करुन बघितली.

साहित्य- कोवळी भेंडी लागेल तशी, टोमॅटो भेंडीच्या प्रमाणात, दोन तीन हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर, ८,१० काजू, काश्मिरी लाल तिखट, हळद, तमालपत्र, जिरं, एक छोटा दालचिनीचा तुकडा, धणेजिरे पावडर, गरम मसाला पावडर, फ्रेश क्रिम, मीठ, फोडणीकरता, तळण्याकरता तेल, आणि थोडं बटर.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

बदतमीज़ दिल - २४

सायराला वाटत होतं, त्याला बहुतेक ही लोकॅलिटी आवडणार नाही. जुनी वस्ती आणि घरंही थोडी जुनाट झालेली पण त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांच्या या दोन गल्ल्याच बिल्डरच्या आक्रमणातून टिकून राहिल्या होत्या. बाकी सगळीकडे जुनी घरं पाडून टॉवर्स झाले. तिचं लहानसं बैठं घर होतं. बाहेरचा रंग उडालेला आणि मेंटेनन्सची कमतरता जाणवत होती. तरीही पुढे चार फुटाचं अंगण अगदी स्वच्छ आणि झाडांनी भरलेलं होतं. मनीप्लांटचा एक अजस्त्र वेल घराच्या भिंतीवर पसरला होता. निळ्या दरवाजावर पेपर क्वीलिंग केलेली 17, Deshmukh's अशी अक्षरं असणारी लाकडी फ्रेम होती.

Keywords: 

लेख: 

काही गाणी आणि आरस्पानी

   बन लिया अपना पैगंबर
   तर लिया तू सात समंदर
   फिर भी सुखा मन के अंदर
   क्यों रह गया
   रे कबिरा मान जा....
   रे फकिरा मान जा..
  आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया

लेख: 

बदतमीज़ दिल - २५

ती डॉ. पैंना भेटायला निघाली तेव्हा ते केबिनमध्येच होते. दोन तासांनी सर्जरी शेड्यूल्ड आहे आणि आत्ता कदाचित रेसिडेंटस बरोबर ते राउंडवर निघणार असतील. पण हे काम पटकन होईल.

हळूच दार किलकिले करून ती आत डोकावली. नेहमीप्रमाणे डेस्कमागे डॉ. अनिश पै, अग्रगण्य सर्जन, मिस्टर हॉटीपॅन्ट्स! त्याने फ्रेश हेअरकट केलेला दिसत होता. कडेने केस बारीक करून वर स्टायलिश सिल्की केस, ज्यांना कर्ल व्हायची घाई आहे पण लांबी तेवढी नाहीये. रोजचा पांढरा कोट घातलाय त्याखाली बॉटल ग्रीन शर्ट आहे. आज सकाळी चकाचक दाढी केलेली दिसतेय. आज तिच्या आणि त्या स्मूद जॉलाईनमध्ये कोणी नाहीये.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २६

मी ते ऍग्रीमेंट साइन करायला नको होतं. खोटं तर ते होतं, नक्कीच. कुठली लीगल डॉक्युमेंट्स 'हूमसोएव्हर इट मे कन्सर्न' ने सुरू होतात!! पण तरीही तो कागद महत्त्वाचा होता. त्या किसनंतर सायरा नक्कीच घाबरलेली होती.. आय गेट इट. टेबलावरचा काचेचा पेपरवेट फिरवत तो विचार करत होता.

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४४

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या सिनियर केअर होममध्ये आज एक नवीन जर्मन आज्जी दाखल झाल्या. वय वर्ष 98. डोळयांनी पूर्णपणे अंध. आज त्यांचा इथे पहिलाच दिवस असल्याने त्यांचे स्वागत करून त्यांना माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल माहिती देऊन आज थोडक्यात संभाषण आटोपून उद्या सविस्तर बोलावे, असे ठरवून मी त्यांना भेटायला गेले.

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २७

त्याने फोन ठेवताच तिने नेहाबरोबर बसून पूर्ण कॉलचं सगळ्या बाजूंनी डिसेक्शन केलं.

कदाचित त्याला खरंच त्या नीट घरी पोचल्याची खात्री करायची असेल.

कदाचित त्याला महत्त्वाचं काही सांगायचं असेल पण ऐनवेळी त्याने पाऊल मागे घेतलं.

कदाचित हा नुसता फ्रेंडली कॉल होता.

फ्रेंडली! फ्रेंड्स! फ्रेंडशिप! अचानक ह्या सगळया शब्दांचा तिला प्रचंड राग येत होता.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle