July 2022

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५

जर्मनीतील हॅनोवर शहरात मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करते त्या सिनियर केअरहोममध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक उंचपुरे धिप्पाड कोट-सूट घातलेले निळ्या डोळ्यांचे एक ८४ वर्षांचे आजोबा दाखल झाले.

एकेकाळी स्पोर्ट्स ट्रेनर आणि व्यवस्थापक असलेले पण आता माईल्ड विस्मरणाचा आजार डेव्हलप झालेले हे आजोबा फॅमिलीविषयी किंवा त्यांच्या जॉब विषयी विशेष काही सांगू शकत नसले, तरी आपले सर्व काही काम स्वतः करू शकतात.

Keywords: 

बदतमीज़ दिल - २८

अनिशला मी माझ्यापासून लांब ठेवतेय कारण मी एक जबाबदार आणि प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. मी स्वतःला कायम सांगतेय की तू स्वप्नं काहीही बघ पण त्यांच्या आहारी जाऊ नको. मला माझ्या भविष्याचा आणि नेहाच्याही भल्याचा विचार करायचा आहे. आत्ताच काही काळापूर्वी माझी नोकरी जाणार होती. त्यावेळची दुसरा जॉब मिळेपर्यंतची अनिश्चितता आणि अस्वस्थपणा मी विसरू शकत नाही. फक्त माझ्या मनाला वाटतं म्हणून मी स्वतःला असं मोकळं सोडू शकत नाही. आय डोन्ट हॅव दॅट लग्झरी. सायरा अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करत होती.

Keywords: 

लेख: 

पडू आजारी

बालपणी माझं एक सिक्रेट दुःख होतं. ते म्हणजे, मी फारच कमी आजारी पडायचे. तेव्हा माझ्या काही मैत्रीणी होत्या. त्या सतत आजारी पडायच्या. त्यांना हमखास वार्षिक परिक्षेच्या वेळी टायफाॅईड, काविळ नाहीतर कांजिण्या होत आणि मग त्या परिक्षा न देताच पुढच्या वर्गात जात. मला तेव्हा त्यांचा फार हेवा वाटायचा. आपल्याला पण कधीतरी वार्षिक परिक्षेआधी असलं दणदणीत आजारपण यावं आणि आपलीही परिक्षा बुडावी असं मला कायम वाटे. पण संपूर्ण शैक्षणिक कालखंडात एकदासुद्धा, अगदी घटक चाचणी परिक्षेलासुद्धा टांग मारता येईलसं आजारपण मला कधीच आलं नाही.

बदतमीज़ दिल - २९

शुभदा तिच्या डेस्कमागे उभी राहून कानाला रिसीव्हर लावून हाताने भराभर नोटपॅडवर लिहीत होती. त्यांना येताना बघताच तिने फोन होल्डवर टाकला आणि डॉ. पैना भराभर अपडेट दिले. "डॉ. गांधी सर्जरीमे हैं, वो कॉल बॅक करेंगे. डॉ. कनसेका लंच ब्रेक है, उनको बादमे कॉल करती हूं, अभी लाईन पर डॉ. डिसूझा है. पेशंट को सुबह की फ्लाईट मिली है, दे विल रीच हिअर अराउंड इलेव्हन. मैने सामनेवाला हॉटेल ट्राय किया लेकिन वो फुल्ली बुक्ड है."

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४६

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या जर्मनीतील सिनियर केअर होममध्ये मी दुपारच्या राउंडला गेलेले होते. दुपारची वेळ  वामकुक्षीची, त्यामुळे शक्यतो दरवाजा वाजवून कोणाची झोपमोड करणे, मी टाळते. जे जागे असतात, हे माहिती असते, त्यांनाच भेटते किंवा ज्यांचे दार उघडेच असते, तिथे हळुच डोकावून, जागे आहेत ही खात्री करून घेऊन मग भेटायला, बोलायला जाते.

बदतमीज़ दिल - ३०

रात्रीचे तीन वाजत आलेत. एव्हाना मेंदूची अक्षरशः चाळण झालीय. खिडकीबाहेर रस्ताही किर्रर्र अंधारात बुडालाय. त्याने हात वर करून आळोखे पिळोखे देत बाहेर बघितलं. समोर सायरा ब्लॅंकेटमध्ये गुरगुटून झोपली होती. सकाळ होण्यापूर्वी थोड्या तरी झोपेची त्याला नितांत गरज होती. एवढीशी असून पसरून झोपल्यामुळे तिने सोफ्यावर खूपच जागा व्यापली होती. त्याने शूज काढले आणि लॅपटॉप मिटून खाली ठेवला. तिने ब्लॅंकेट अजून गुंडाळून घेत थोडी हालचाल केली. तिचं ब्लॅंकेट ओढून घ्यायचं विसरून जा! तो खाली कार्पेटवर झोपू शकला असता पण दुसऱ्या दिवशी पाठ भयंकर दुखली असती, आज ते परवडण्यातलं नाही.

Keywords: 

लेख: 

ओट्स नट्स लाडू

मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि शाळेतून आल्यावर काहीतरी नवीन खायला दे हि मागणी सुरू झाली
नेहमीचे रवा-नारळ-गुळ लाडू, शेंगदाणे-गुळ लाडू करून झाले.नवीन काय बनवावे म्हणून युट्युबवर पाहताना दोन तीन ओट्स-ड्रायफ्रुट्स रेसिपीज सापडल्या. त्यातलं घरात जे उपलब्ध होतं त्यातून हे लाडू बनवले.

पूर्वतयारीचा वेळ: १ तास
प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
● अडिच वाटी रोल्ड ओट्स, कोरडे भाजून.
● अक्रोड, बदाम,पिस्ता पाऊण वाटी, कोरडे भाजून.
● तीळ पाव वाटी भाजून
● गुळ एक-सव्वा वाटी
● इलायची पावडर-अर्धा छोटा चमचा
● पळीभर तुप

पाककृती प्रकार: 

बदतमीज़ दिल - ३१

आम्ही इथे असण्याची काहीच शक्यता नव्हती पण आम्ही होतो! आम्ही ओटीमध्ये होतो, सोनलची सर्जरी आता कुठल्याही क्षणी सुरू होणार होती. खोलीभर एक तणावाने भरलेली शांतता होती. वेगवेगळ्या यंत्रांचे आवाज आणि मधेच ऐकू येणारे बीपबीप एवढेच काय ते शांती भंग करत होते. ती पूर्ण तयारीनिशी अनिशच्या इशाऱ्याची वाट बघत होती. आज ऑपरेशन टेबलसमोर ते दोघेच नव्हते. त्यांच्याबरोबर अजून एक कंजेनिअल हार्ट सर्जन होते. MS करताना अनिशला ज्युनियर असलेले डॉ. शिंदे. ते नाशिकहून सकाळीच इथे पोचले आणि ही सर्जरी कुठलीही फी न घेता करणार होते, रादर ते सगळेच ही सर्जरी कुठलीही फी न घेता करणार होते.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle