कविता

निरमोही

तू तो निरमोही, हे मुरारी
मुडके न देखा एक बार भी
तू तो निरमोही, हे मुरारी

रंग तो सारे डारे तुने
भिगी चुनरि, मै रंगी सारी
तू तो निरमोही, हे मुरारी

एक बार रख ली मुरली
फिर ना रे तुने उठाई
तू तो निरमोही, हे मुरारी

कैसे सहुँ दु:ख ये सारे
कैसे रहु तुमबिन अकेली
तू तो निरमोही, हे मुरारी

चल पडे परदेस तुम तो
अब तो मै रहु तरसती
तू तो निरमोही, हे मुरारी

कविता: 

गाज

आय थिंक,देअर फोर आय अॅम
हे,देकार्ट कधीच गेला सांगून
पण हे मला कळल्यापासून
हे अस्तित्व माझं मलाच
मिरवावं, मिरवावं वाटू लागलं

कधी संथ,शांत,निवांत वरून
कधी प्रचंड खळबळ आतून
कधी वादळापूर्वीचं गडदभरून
कधी उचंबळणारं खदखदून
अन मग वादळं, अनेक एकामागून

कधी लोकांचं एेकणारं मन
कधी तावातावाने केलेलं भांडण
कधी रुढीतले उपटलेलं तण
कधी स्वत:शीच केलेलं रण
अन कधी अगदी, अगदी नवं सृजन

कविता: 

कळी

कळी ..........

कळी कोवळी
फुले पाकळी पसारा
खुले चेहरा हसरा
डुले देठ आसरा
बोले सरा, मागे सरा .......

खट्याळ गोजिरी
अर्धोन्मीलित साजिरी
लपे पानाड लाजरी
कुजबुजली वल्लरी ....

झोंबे थंडगार वारा
लागे चाहूल भ्रमरा
नि वास फुलपाखरा
माय कुर्वाळी लेकरा ..........

खुडे कोणी ऐरागैरा ?
बरा काटेरी पिंजरा
फुले ती दहा बारा
देती भवती पहारा ............

मग कळीस कळले
कसे फुलून जगावे .................

कविता: 

प्रेम

जाब तुला देणार नाही
विवरणे पुसणार नाही
प्रश्न आणि उत्तरांच्या
व्यूहात मी शिरणार नाही

वचने तुला देणार नाही
वायदे ऐकणार नाही
आश्वासनांची भूल मी
स्वत:स कधी देणार नाही

बंधनात अडकणार नाही
कैद तुला करणार नाही
स्वातंत्र्यात आहेस तू
परतंत्र मी होणार नाही

कबुली मागणार नाही
प्रमाण तुला देणार नाही
प्रेम आहे माझे तुझ्यावर
ते सिद्ध मी करणार नाही

कविता: 

ती राधा होती, हरीच्या अधरी...

मोरपिसातुनि हळूच आली
मऊ, गार झुळूक जराशी
उधळीत स्वप्ने सप्त रंगी
राधेची अलवार ओढणी

कुरळ्या कुंतला मधुनि सुटुनि
घुंगुर माळा होऊनि बसली
चाल जराशी घुंगुरवाळी
राधेच्या सुकुमार पाउली

पितांबरीचा रंग सोनसळी
उन कवडसे लख्ख चमकति
झरझर झर झर येती खालति
बरस बरसले राधेच्या कांती

मधाळ भाव श्रीहरीच्या वदनी
निल गडद मेघांच्या मधुनि
भोर काळ्या मिटलेल्या डोही
काजळ काळे राधेच्या नयनी

अन मुरली मधून पाझरली ती
नव्हती दुसरी तिसरी कोणी
तीच हळूवार उतरली होती
ती राधा होती, हरीच्या अधरी...

कविता: 

अदभूत दिवस

अदभूत दिवस

दामिनी तळपती कडाडून
दाट गडद काळ्या जलकुंभातून
दावी नृत्यकला दशदिशातून
दान गान अमृत धारांचे ||
मदमस्त पवनारूढ मेघ पलटण
मजल दरमजल कूच करणं
मनसुबा, टपाटप करू आक्रमण
महीवर पाट वाहिले ||
लेकुरवाळेनदी-नाले वाहती
लेणी हिरवी ल्याली क्षिती
लेखाजोखा आनंदाचा वर्णू किती
लेशमात्र मळभ नाही उरले ||
रेशीम स्पर्श होता नव सूर्याचा
रेणूरेणूत पूर नव चैतन्याचा
रेखीव कलात्मक ढंग निसर्गाचा
रेतीत चमकले शंख-शिंपले ||
खारा वारा साद देई नारळी पोफळीस
खाजगीत सांगे संदेश मयंकास
खाणा खुणा करी सागरास
खाशी गंमत, अदभूत घडले ||

कविता: 

फिर भी...

कुछ अरमाँ बिखरे से,
कुछ दील टूटे से,
फिर भी चाहत बसती रही....
............. हर इंसान में ।

कुछ आँसू सूखे से,
कुछ दर्द ठहरे से ,
फिर भी मुस्कान खिलती रही....
........ हर चेहरे पे ।

कुछ ख़्वाब अनदेखे से,
कुछ ख्वाहिशें अधुरी सी,
फिर भी ज़िंदगी चलती रही...
.................. अपनी रफ़्तार से ।

कविता: 

वाटचाल

अहंचे काटेरी झुडूप
केलं थोडे दूर
तर असतोच रस्ता
सोपा, सहज अन आनंदाचा

स्वार्थाचे खडक फोडून
केले अंमळ दूर,
तर नितळ झरे
सोबतीने असतातच वहात

मानपानाचा काथ्याकूट
वेळोवेळी केला साफ
तर मैत्रीच्या सुंदर बागा
करतातच वाट, रंगीत अन सुगंधी

"मी" लाच केले जssरा दूर
बघितले जssरा "स्व"च्या पल्याड
तर असतोच की पायाखाली
मुक्तिचा मार्ग!

कविता: 

लकेर

कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!

लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!

मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!

मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!

- चिन्नु

Keywords: 

कविता: 

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

माझ्या साजणा,माझी हौस कि हो पुरावा
माळा कि माझ्या केसात मोगऱ्याचा गजरा

धवल पुष्पे,गंध मादक हा बरवा
धरा जीवलगा,हात हातात कि धरा

वीणेची तार छेडता, वेड लागले जीवा
वीजू चमकता जैसे नाचे मन मयुरा

वैभव विपुल आता घर कि सजवा
वैशाख तृतीया आज, सख्या येतील घरा

द्याया शुभेच्छा, आंबे-डाळ, पन्हे बनवा
द्या हरभऱ्याची ओटी, येऊ द्या थंडगार वारा

सख्या म्हणती रहावा जीवनी गोडवा
लाजती 'नाव'घेता,दिन झाला साजरा

गौरी निघाली आपुल्या गावा
या शुभ दिनी हसत मुखे पाठवण करा....

कविता: 

पाने

Subscribe to कविता