कविता

निमित्त्य

आई गं माझी पीडा,
मी कशी तुला सांगावी?
नजरेत खोल तुज दिसले,
ते निव्वळ असत्य नाही!

मी जन्मजात एकाकी,
हरवले जिथे सापडले...
तो आला अन् मी हसले,
हे केवळ अगत्य नाही!

मी श्वासांनी गुदमरते,
अन् फासांनी चाळवते
हे भाषांतर स्पर्शांचे...
हे अगम्य अनित्य नाही!

गे माझ्या रात्रींनाही
सावली अताशा असते
तो असतो तो आहे तो!
तो नुसता अवध्य नाही!

तो निघून जावा याची
मी वाट पाहते आहे
मी मरून जावे याला,
गे दुसरे निमित्त्य नाही!

Keywords: 

कविता: 

मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!

उगवलेल्या प्रत्येक दिवशी मी गोळा करते...
हाती लागतील तेवढे सारे गडद फिके रंग
इथून तिथून जमा केलेले काही आकार-उकार
आणि डोळ्यांत ओतायला थोडे भाव थोडी झिंग
पण रोज उठून मीच बनवलेलं माझंच शिल्प वेगळं दिसतं
संध्याकाळपर्यंत अनोळखी वाटू लागतं
त्यात मला माझं रूप काही केल्या आढळत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!

मीच माझं सगळं असणं कागदावर लिहून काढते
शब्दा शब्दांत न मावणारं रिकाम्या जागांत पेरून ठेवते
लिहिलेल्याचे सारे ओघळ पानभर विद्रूप होतात
कवितेखालची माझी सही केविलवाणी पुसून जातात
माझीच भाषा नंतर मला वाचता येईनाशी होते
अगम्यातच व्यक्त होणं माझं काही टळत नाही

कविता: 

स्त्री जन्मा...

स्त्री जन्मा-

अंगावर फुलतात तिच्या घामाचीच फुले
व्यथा जरी गं पोटात, ओठी वात्सल्यच उले
पडझड तन मनी, वाट जाहली दुर्गम,
रक्ताळले कण कण- ती चालतीबोलती जखम!
प्रेम-माया अगणित-असंख्य उधळूनही ती धनी!
जोडे करी कातड्याचे तरी जग तिचेच ऋणी Namaskar

Keywords: 

कविता: 

माझी लेखणी

(हेम-पंचदशी-काव्य)

माझी लेखणी — —

माझी लेखणी
सामान्य चार चौघी समान
गुणवती ती
हरेक रुपी मिळवी मान~~

मूळ अक्षरे
पाटीवर गिरवली छान
शुध्दलेखना
खाऊन मार, दुखलाऽ कान ~~

शिस पेन्सिल
अखंड तासा, पाडा फडशा
कलम दौत
सांडा शाई, रंगवा फरशा ~~

' बोरु 'नावाची
लेखणी' सुलेख ' आले बाई
नवी लेखणी
पिई शाई, शिंपण्याची घाई ~~

नवलाईची
नवी लेखणी अधुनिका हो!
नाविन्यपूर्ण
रंग-ढंग ' वापरा-फेका ' हो ~~

लेखणीची या
सोबत ऐसी जीवनभर
लेखणी विना
अशक्य! मुरली खोलवर ~~

टंक लेखनी
झालीय जीवनधारा आज
तिची सोबत
' शब्द अंतरीचे 'चढे साज ~~

चित्र लेखणी
शाई दौतीची साथ तिजला

कविता: 

मतदान माझा हक्क

मतदान माझा हक्क
हक्का बक्का नका होऊ
आम्ही सारे भारतीय
विचारांनी एक होऊ.....

पक्षचिन्ह ? पदचिन्ह ?
स्वच्छ पडलीत ऊन्हं
तळपेल सूर्यतेज
नको नको प्रश्नचिन्ह ....

झालं जन जागरण
जगायचं साधारण
पथ प्रगती समोर
होवो विकासीकरण....

विचारांची देवघेव
घडवेल हा बदल
आशावाद ही कायम
नको हा दल बदल ....

आम्ही काय करायचं
बोटाला शाई लावायचं
त्यांनी राज करायचं
सर्वांना जगू द्यायच .....

विजया केळकर ______

कविता: 

प्रेम

प्रेम.........

हिरवीगार
वृंदावनी तुळस
प्रेम कळस

उखळीस बांधी
माॅं यशोदा बालका
जगपालका

बन्सीधर हा
रमला वृंदावनी
प्रेम बंधनी

नाचे गोपिका
कृष्णरास रंगला
नच भंगला

लाडकी राणी?
मीठाविना रसोई
हसे रुक्मिणी

द्रुपद कन्या
कृष्णाचा करी धावा
बंधूऽ सोडवा

सुदामा प्रेम
पुरचुंडीत पोहे
श्रीसखा पाहे

मीरेचा प्रभु
गिरिधर नागर
प्रेम सागर

हिरवीगार
वृंदावनी तुळस
प्रेम कळस

विजया केळकर____

कविता: 

कातरवेळ

कातरवेळ

बस मध्ये खिडकीच्या जवळ
तेच तेच विचार कातरवेळी
वाऱ्याचा स्पर्श मनाला स्पर्शून
केसांची बट सावरत
बस चालली पुढे
मन मात्र माझे मागे
असेच एकदा बाजूला बसलास तू
स्पर्शाने खुप काही बोललास
अजून काही तरी बोल
असे वाटताना
तुझा स्टॉप आला
तुझा तो एक कटाक्ष
माझे हृदयातून तुला पाहताना
आज ही आठवते ती कातरवेळ

कविता: 

सुखाचा शोध

सुखाचा शोध

सुखाचा शोध घेताना
मला खुप काही सापडले
जे मी शोधत होते
ते मी प्रत्येक्षात पहिले
बाळ जेवलीस का आईचा स्वर
पैसे आहेत ना तुझ्याकडे बाबांची हाक
तुला काहीतरी सांगायचे आहे भावाची तळमळ
स्वतःला सांभाळ आजीची साद
खुप दिवसाने भेटल्यावर मैत्रिणीने मारलेली मिठी
तब्बेत बारी नसताना काळजी करणारी मुलगी
खुप थकलेली असताना नवऱ्याने फिरवलेला डोक्यवरून हाथ
खरंच अनुभवत होती मी सुख
आणि थांबवला सुखाचा शोध

कविता: 

चांदणी चौक

लाल चौकोनी दिव्यांची अखंड मोहनमाळ
चहूबाजूंनी कर्कश्श उतू जाणारा पाऊस
काचांवर, पत्र्यांवर, सिमेंटच्या मातीवर

भर पावसाळ्यात पानोपानी वठलेले एक झाड
कुजणाऱ्या गवताचा गोडूस, रानटी गंध
चांदणं हरवून बसलेला एक स्तब्ध चौक

विझलेली नजर आणि शिवशिवणारे हात,
चौकोनाच्या आत, चौकोनाच्या वर
रग लागलेल्या गर्दीचे उभे दमट पाय

समोर काचेच्या तड्यांत फुटलेला एक सूर्य
अचानक उतारातून टोळीने घसटणाऱ्या
गुबगुबीत मेंढ्या, प्रत्येकीवर एक लाल ठिपका

Keywords: 

कविता: 

तेजोमय मित्रा

*** तेजोमय मित्रा ***
कोवळी, कोमल हलकेच फिरवी नजर
तप्त,कृध्द, थेट सरळ नजर
तिरकी मान, धूसर कलती नजर
वळवशी मान, नजरेसमोर अंधार.....
तव दर्शनाविना होतसे घाबरी
सतत गिरकी घेत रहातसे सामोरी
तू असा जवळी रहा
तू असा जवळी रहा ......
अंतर राखून फिरते भोवती गरगरा
मंतरलेली मी साहते ऋतुचक्राचा मारा
तुज असे काय ठावं-----
कितेक फिरती तुजभवती
मज नाही त्याची तमा
मज ऐसे ठावं ------
मी एकलीच त्यात तुझी प्रियतमा
या सुखास लागलं गिर्‍हाण (ग्रहण )
मजभोवती गोंडा घालणारा त्यास कारण
देवा ऐक माझं गार्‍हाणं

कविता: 

पाने

Subscribe to कविता
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle