कविता

जय गजानन जय गजानन

जय गजानन जय गजानन

घरोघरी झाले आगमन
जय गजानन जय गजानन
लंब उदर, शुंडा वदनी
मूषक शोभे वाहनी
आवडे बहु मोदक
सारणात गूळ-खोबरे एक
वाहा एकवीस दुर्वा
संकटांनो दूर व्हा
गंध पुष्प रक्तवर्ण
सुखे हलवी गजकर्ण
दिसे गोंडस कैक रुपात
वसे मग मन्मनात
करता आरती मंत्रपुष्पांजली
आशीर्वादे भरली अंजुली
विसरुन आपपर भाव
दशदिन चाले उत्सव
पुन्हा ये लवकरी हीच आण
जय गजानन जय गजानन
विजया केळकर_______

कविता: 

अंतरीच्या गूढगर्भी

निःशब्दतेच्या गूढगर्भी
अर्था-अनर्थांची वादळे
अर्थाच्या हिमनदीखाली
वाहणारे
घाव मनीचे कोवळे-सावळे

जुनाट जखमा, वाळलेले अश्रू
चोळामोळा झालेलं
चुरगळलेलं मन
आणि
कोरड्या एकाकी वाटा
पाहणारे निष्प्राण चक्षू

असह्य एकटेपणानी
चहुबाजूंनी उठवलेली वावटळ
आणि त्या अंधारानी
फेर धरून मांडलेली रास
आणि
कुडीचं वस्त्र फेडून
बाहेर येण्यासाठी
तगमग करणारं
आपल्या आतलं
काहीतरी

नकोसेच वाटणारे
निरर्थक उन्हाळे-पावसाळे
बाहेरचे आणि आतलेही .
नकोश्या संवेदना
नकोशी नजर , आवाज
स्पर्श आणि अस्तित्व .
या सगळ्यांची ,
पंचेंद्रियांच्या काड्यांची
मोळी बांधून फेकून देणारी

कविता: 

शिक्षकदिनाच कारण

शिक्षकदिनाच कारण

अक्षर ओळख करून झाली
वाचा आता धडे
रोज रोज म्हणून घेतले
गणितातले पाढे

सुर्याच्या उष्णतेमुळे होते
पाण्याची वाफ
बाष्पीभवन घनिभवन पर्जन्य
घोटून झाले तर सर्व खोड्या माफ

मराठीतल्या कविताना
लावून सुंदर चाल
संदर्भासहित स्पष्टीकरण करत
संपवला सर्व तास

असे शिक्षक घडवतात
नव्या दमाची पिढी
संस्कार करत वाहून घेतात
राहातात साधीसुधी

शिक्षक म्हणून नेहमीच वाटतो
आम्हा तुमचा आदर
भाव पोहचवायचाय आजच
साधून शिक्षकदिनाच कारण

शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले )

कविता: 

क्रृष्णाष्टमी

कृष्णाष्टमी------
कृष्ण कृष्ण गाता
मन तेथून न हालेना

दही घुसळत असता
नवनीत काही निघेना

कृष्णकृष्ण आठवता
लोणी वरतीआलेना

दही-लोणी शिंकाळ्यात ठेवता
मनीची धाकधुक जाईना

: दही हंडी काढता
तोल सावरता येईना

कान्हा कान्हा पुकारता
कोठून आला कळेना

खांद्या-खांद्यावर चढता
कोणाचेच लक्ष जाईना

सांडले दही थाप मारता
मनी आनंद माईना

गोविंदा आला रे आता
पण पेंद्यास नाचता जमेना

त्याच्या भोवती फेर धरता
गोकुळ हसले सारे गुंगले ना

विजया केळकर_______

कविता: 

ती उमेद

'ती' उमेद

हसाव का रडाव ?
मला काहीच नव्हत कळत
पावसाच्या धारेत
मन होत नुसत वाहत !

कळलच नाही कधी
सुटला मनावरचा बांध
धरण फुटाव तसा
वाहिला तिरावरचा गाव

आधाराला फांदीच्या
मुठ पकडली घट्ट
पुढच्या प्रवासात आता
मी एकटीच नव्हते फक्त

इवल्याश्या कळीचा
नाजूकसा आवाज
आपण 'दोघी' सोबतीन
करू सुंदर जीवनप्रवास

निळ्या मोकळ्या आभाळात
उंचच उंच उडाव
कुठ काही चुकताना
'ते' नेमक कळाव

शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले )

कविता: 

काहूर

काहूर

कधी कधी स्वतःलाच
स्वतः चा अंदाज नसतो.
आज आहे उद्या नाही
म्हणूनच भांबावतो.

कळतच नाही का ? पण...
विचार कर करून थकतोच.
तस घडत काहीच नाही.
तरीही.. ठोका चुकतोच

संकेत घेत मनाचा
सावरूनच बसतो
अन चौकटीच्या आत बाहेर
भिरभिरत बहकतो...

सरते शेवटी देवाच्या
समोर दीप लावतो
शांत तेवणाऱ्या ज्योतीमधून
आत्मविश्वास दुणावतो..

शांत तेवणाऱ्या ज्योतीमधून
आत्मविश्वास दुणावतो..

शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले)

कविता: 

काहूर

काहूर

कधी कधी स्वतःलाच
स्वतः चा अंदाज नसतो.
आज आहे उद्या नाही
म्हणूनच भांबावतो.

कळतच नाही का ? पण...
विचार कर करून थकतोच.
तस घडत काहीच नाही.
तरीही.. ठोका चुकतोच

संकेत घेत मनाचा
सावरूनच बसतो
अन चौकटीच्या आत बाहेर
भिरभिरत बहकतो...

सरते शेवटी देवाच्या
समोर दीप लावतो
शांत तेवणाऱ्या ज्योतीमधून
आत्मविश्वास दुणावतो..

शांत तेवणाऱ्या ज्योतीमधून
आत्मविश्वास दुणावतो..

शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले)

कविता: 

जीवन गाणं

जीवन गाणं

सरिते किती धावतेस गातगात
विचारले दोन्ही तीरांनी तिज सावरत
तारू चालले एक संथ गतीत , सांगत
ने मज मम गावी
ने मज मम गावी
अवखळ, तरी अलगद नेले आपुल्या गावी
नुकतेच उजाडले सोनपावली
रान मोकळे,पाखरं सुगम संगीत गात झेपावली
धावली गोवत्से , पिलांस मायसावली
मधुसेवना भृंग डोलती
राग येत नाही फूलां, उलट भावती
ठेका धरुनी साथ देती
प्रथम नक्षत्रांचे देणं
अंजुलीचे भरणं
विजयानंद हे मग जीवन गाणं
विजया केळकर______

कविता: 

'काचपंख' आणि 'पाठीमागून'

हा वीकांत कविता वाचत घालवला. (शुम्पीच्या इरामुळे स्फूर्ती मिळाल्यामुळे :fadfad: ) शोधाशोध करताना जपानी कवयित्री सगावा चिका हिच्या abstract, modernist (btw ह्या कविता १९२०-३० च्या काळातील आहेत) कविता खूप आवडल्या. ही उमदी कवयित्री वयाच्या अवघ्या पंचविशीत कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडली. अवघ्या पाच सहा वर्षात लिहिलेल्या तिच्या कविता आहेत. एक- दोन कवितांचा अनुवाद करण्याचा मोह आवरला नाही. त्या कविता इथे देतेय.

काचपंख

माणसं हळूच प्रेम पाठवतात
काचेच्या पंखांमध्ये अलगद ठेवून
चौकातच सूर्य त्यांचा करून टाकतो चुरा.
खिडकीसमोर आभाळ उभं ठाकतं
काळवंडू लागतं खोटा श्वास थांबताना.

Keywords: 

कविता: 

माझा वेडा पाऊस

एका तपापुर्वी लिहिलेली माझी ही कविता इथे आणतेय. सध्या अप्रकाशित केलेल्या माझ्या जुन्या ब्लॉगवर होती आणि ऑर्कूटच्या जमान्यात मराठी कवितांच्या फोरम मधेही टाकली होती.
परवा बोलता बोलता एका मैत्रीणीने हिची आठवण काढली म्हणून शोधून वाचली..

तो पाऊस,
जेव्हा मला भेटला होता ना
तेव्हां तो वेडाही नव्हता
आणि माझाही नव्हता...

तो एक
ढगांच्या गडगडाटा शिवाय,
आणि भेदरवणा-या वा-याशिवाय,
कोसळणारा एक साधा सरळ
पाऊस होता.

एकदा त्याने मला भिजवायचं ठरवलं
मग मी सुद्धा भिजायचं नक्की केलं
तशी छ्त्री होती ना सोबतीला
पण तीचा कधी उपयोग होतो का?

मग तो पाऊस आधी वेडा झाला
कारण तो थांबण विसरला

Keywords: 

कविता: 

पाने

Subscribe to कविता
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle