कविता

आपापलं ऊन

कॉफीची फिकी वर्तुळे उमटलेला उन्हाळा
आळशी दुपारी छेडलेल्या गिटारच्या तारा
आणि टेबलावर बर्फ चमकणारा ग्लास

निळ्या खिडकीतून येणारा चोरटा सूर्य
शुभ्र नक्षीदार पडद्यातून फाकत उजळ रेषा
पसरत राहतो खोलीभर मिटवत पापण्या

दरवळतात आपले आवडते सगळे गंध
समुद्र, कॉफी आणि आंब्याचा मोहोर
प्रत्येक श्वासाने वाहणाऱ्या माझ्या धमन्या

आणि एक दिवास्वप्न
शांत, मग्न तळ्याकाठी
थांबून वाट बघणारे..

मग जमण्यासारखी एकच गोष्ट जमते
डोळे उघडे ठेवून बघत रहाते रहदारी
तुझ्या चमकत्या डोळ्यांत बघितल्यासारखी..

Keywords: 

कविता: 

शुभप्रभात

शुभ प्रभात
आकाशाच्या गाली लाली
पाहुनी शुक्रचांदणी हसली
म्हणत फिरली माघारी
सकाळ घेणार भरारी
उषा धावली निशेपाठी
नाही घडत भेटी-गाठी
कोण करतेय आडकाठी
उषेच्या भाळी पडली आठी
रिझविण्यास तीस ........
पक्षी गाणी गाती
स्वरांची मग जुगलबंदी
फुले बहरती, झाडे डोलती
सुगंधी दरवळ मादक धुंदी
नटली सोनेरी पहाडी अन्
शोभती चंदेरी जलधारांचे काठ
उषा पाहे आवडीनं
निराशेची टाके कात ....
शुभप्रभात .....
उषा सरसावली एक पायरी
जरा कलंडली (झोपली)भर दुपारी
दुपार ठाकली काम करता-करता

कविता: 

जय हरि विठ्ठल.....

जय हरि विठ्ठल.......

आवली ही आवडीने
गातसे संसारगाथा ।।
सांगे सांगे कौतुकाने
ऐका बुवा ममनाथा ।।
तुका म्हणे कळवळ्याने
विठ्ठलाsssपंढरीनाथा ।।
पोरे जमली आनंदाने
ऐकावया ज्ञानकथा ।।
झोपली शांतमनाने
हरपली भूकबाधा ।।
मायबाप मूकदृष्टीने
(पहाती,)चूंबतीलेकरांमाथा ।।
विठू-सावळ्यानावाने
आठवती एकनाथा ।।
ओलावल्या नयनाने
रुक्मा पाहे जगन्नाथा ।।
जय हरि विठ्ठल.......
जय हरि विठ्ठल........

विजया केळकर

कविता: 

चल सखे...

चल सखे आज खेळू
एक नवा लपंडाव
दुःख लपवून शोधू
नवा सुखाचा ग गाव

वेशीपाशी खुणावेल
बघ श्रावण सोहळा
नभी मोकळ्या नेईल
तुझ्या मनीचा हिंदोळा

वाटेत रंगेल मग
सुख दुःखाची लगोरी
डाव जिंकून घे सारा
चांदण्या भरून उरी

मग ओलांड स्वतःला
मांड नव्हाळीची नक्षी
तुझ्या नवं बहराला
गाव सुखाचा ग साक्षी..
-कल्याणी

कविता: 

बायकांनी हे ही बोलावं...

काल whatsapp वर एक कविता वाचली.. तिला प्रतिसाद द्यायचा, म्हणून लिहायला लागले, तर मी जे लिहीलं तेच कवितेसदृश झालं. मैत्रिणी, नातेवाईकांना सहज म्हणून शेअर केलं, अनपेक्षितपणे मला त्यावर खूप छान प्रतिसाद मिळाले, म्हणून आज मैत्रीणवरच्या मैत्रिणींसोबत शेअर करत आहे.

आधी मूळ कविता देते, मग त्या खाली माझी टाकते.

बायका बोलतात..

भाजीतल्या मिठावर
भाकरीच्या पिठावर
फोडणीच्या तेलावर
सासूच्या तालावर

बायका बोलतात...!!

जावेच्या मुलावर
नणंदेच्या डूलावर
झालंच तर आईवर
दुधावरच्या साईवर

बायका बोलतात...!!

पैठणीच्या काठावर
देवघराच्या पाटावर
जेवणाच्या ताटावर

कविता: 

लेक म्हणजे....

लेक म्हणजे शहाळ्यातली मलई,
लेक म्हणजे गुलाबी थंडीत पांघरलेली दुलई,

केसांचा गुंता... नाजूक पसारा...
लेक म्हणजे घामेजले ल्या मनावर प्रसन्न वारा.

लेक म्हणजे रात्री बेरात्री बिनधास्त फिरणे...
अन अचानक दिसलेल्या पाल/ झुरळाला भयानक घाबरणे.

स्वतः खूप काही गपचुप सहन करते,
पण दुसर्‍या वरच्या अन्यायाने चटकन गहिवरते.

लेक म्हणजे खडकाळ, भकास वाळवंटावर चांदण्याचा शिडकावा.
कधी प्रचंड ऊर्जा तर कधी सहज गोडवा.

लेक म्हणजे थरथरते रंगी बेरंगी फुल पाखरू...

गेले भर्र कन उडून माय म्हणे आता मी काय करु?

Keywords: 

कविता: 

सगळं काही वारा..

सरत्या पावसात, काही डबकी साचलेली.
घनगर्द अरण्य मी चाचपडत आहे..
रंगीबेरंगी पक्षांची भरघोस विण.
दुधी आवाज, आकाशाच्या पार जाणारा.
एक झरा टणक कातळाला टोचा मारत आहे..
गुळगुळीत गोटे अंतर्बाह्य हलतात.
त्यांच्या मुलायम, दगडी त्वचेवरचा शहारा.
वाऱ्याचा एक मजबूत हेलकावा
आणि सूर्य शिवण उसवून ओघळतो,
लांबचलांब पसरलेल्या शेतांमध्ये.
आता शेकडो योजने दिसतील मला
माझ्या मिचमिच्या पापण्यांमधून..
उनाड वाऱ्याची हळूच कुजबुज,
"माहितीये? उजेडाची नशा माझ्यात असती,
तर मी अक्खा समुद्र भरला असता
या फुलत्या कमलिनीच्या पोटी..
वेड्या!
इतकं दिलदार आणि दिलफेक असू नये रे माणसाने!

------

Keywords: 

कविता: 

इथपासून तिथपर्यंत

ती खिडकीतून बघते
वेलींच्या दोरखंडांनी जखडलेली झाडे
वाऱ्यावर हलायच्या प्रयत्नात

कुठेतरी उठून दिसतो
कोपऱ्यावरच्या नवश्या मारुतीसाठी
नवी घंटा बांधणारा सुटातला माणूस

पुढच्या एका वळणावर
भिकारणीचं पोर टाचा उंचावून पहातं
बास्केटमध्ये अलगद पडणारा बॉल

अंधारून येता येता
हेडफोन खुपसून पळणारी मुलगी
बघून दात विचकणारा एक बुलेटस्वार

चायनीज टपरीसमोर
मान टाकून सुस्त पडलेला कुत्रा
ताणत टम्म फुगलेलं शरीर

पायऱ्या चढून
वर पत्रे निसटलेली एक झोपडी
'येथे हावा भरून मिळेल'

आत फक्त गर्दी
धक्के देणारा आवाजाचा कोलाहल
मेंदू हलवणारी एखादी कळ

फुटपाथवर व्यायामाची यंत्रे

Keywords: 

कविता: 

चाहुल

खुपचं दिवसांनी इकडे येतीये.... खरं तर वेळच मिळत नव्हता. वेळ काढला की मिळतो.. पण आधी जॉब मध्ये खूप वेळ जायचा. आणि नंतर सेल मध्ये.. गडबडीत दिवस संपून जायचा..स्वतःसाठी सुधा वेळ मिळत नव्हता.... पण आज खूप दिवसांनी कविता सुचली.. मग काय इकडे सांगितल्याशिवाय राहवेना... आता आईकडे आहे ना..त्यामुळे वेळच वेळा आहे... आराम आहे.. आता येत जाईन इकडे regular....

या कवितेला मला खास अस काही शीर्षक सुचलं नाहीये..तर तुम्हीच सुचवा काहीतर.. मी आपलं तातपुरत नाव दिलं..

चाहूल
लागली नाजूक पावलांची चाहूल
आणि आपल्या सहजीवनी सुंदर आला बहर

कविता: 

नव मैत्रीण - उपक्रम

पुस्तकाची आवड दूरदेशी जपणारी आणि अतिशय उत्तम आणि सजग आई असलेली माझी नव मैत्रीण दिपाली हिने मला मैत्रीण वर स्वतःच लिहिलेलं काहीतरी पोस्ट कर असं चॅलेंज दिली नवरात्री औचित्य साधून लेकीवरची कविता टाकते ... सध्या लिहिते आहे पण प्रकाशित करत नाहीये पण आता सुरु करेन ... थँक यु दीपाली ...

IMG_4488.JPG

कविता: 

पाने

Subscribe to कविता
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle