लेख

भारतवारी मे-जून २०२२ - भाग ४

भाग ३

इकडून जाताना कुणासाठी काय न्यायचं याची एक यादी असते. एक यादी असते भारतात आईला करायला सांगायचे पदार्थ, बँकेची किंवा काही कागदपत्रांची कामं असतील तर ती एक यादी, एक शॉपिंगची यादी, ज्यात इकडे येताना आणायचं सामान, कपडे, भांडी असं काय काय असतं. मग गेल्यावर याद्या एकेक करत टिक मार्क होत जातात.

Keywords: 

लेख: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग ३

एक तारीख आली की लगेच आई बाबा सगळ्या कामवाल्या बायकांचे पैसे काढून ठेवतात, कुणालाही पगारासाठी वाट बघावी लागू नये, वेळच्या वेळी दिलेच गेले पाहिजेत ही शिस्त. मी आले म्हणून एक कामवाली खास दोन वेळा येते, त्याचे जास्तीचे पैसे पण देतात. या सगळ्या जणी आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत. पोळ्यावाली रीता म्हणजे आईची मानसकन्याच. एक दिवस तिनी आम्हाला आग्रहाने जेवायला बोलावलं होतं. मी सृजन आणि आई गेलो. तिनी अत्यंत चविष्ट अश्या कचोर्‍या, चाट आणि शिवाय सृजनला आवडतात म्हणून रंगीत पापड कुरड्या असा बेत केला होता. आग्रह करून ती वाढत होती. सृजनला तिच्या घराच्या गच्चीत फार आवडलं. म्हणून तो मला घेऊन गेला.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग २

कधी जायचं भारतात यासाठी सृजन रोज Countdown करत होता, त्यालाही खूप दिवसांनी विमानात बसायला मिळणार होतं. आईची जय्यत तयारी चालू होती. तुम्ही आले की हे करायचं, ते करायचं याच्या याद्या वाढत होत्या. त्या आधीपासून बाबा म्हणत होते की घराला रंग देऊ, आई म्हणत होती आता कशाला? नको एवढ्यात. पण मग मी येणार हे ठरल्यावर बाबा जिंकले आणि रंगाचे काम झाले, त्यामुळे घर पण सगळं सजून धजून होतं. मधल्या काळात घरात नवीन सोफा आला, गार्डन मधल्या फरश्या बदलल्या, नवीन पडदे लागले असे बरेच बदल होते. घरातलं आंब्याचा झाड वाढलं आहे, त्याला कैऱ्या आल्यात त्या बघायच्या होत्या. शक्य त्या सगळ्यांना भेटायचं होतं.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग १

फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.

ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - स्कूल चले हम - जर्मनीतला शाळाप्रवेश - Einschulung

जर्मनीत आल्यानंतर काही वर्ष इथल्या शिशूवर्ग ते पुढे माध्यमिक शिक्षण, या शैक्षणिक व्यवस्थेची काही विशेष माहिती नव्हती. सुमेध आला तो उच्च शिक्षणासाठी, त्यामुळे तो अनुभव पूर्ण वेगळा होता. सृजन मुळे या सगळ्याबद्दल हळूहळू शोधाला सुरूवात झाली, मग त्यातून नवीन माहिती, अनुभव येत गेले. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरूवात कशी होते, काय नियम आहेत, शाळांचे कसे प्रकार आहेत इथपासून तर मग प्रवेशप्रक्रिया, भाषा, विषय कोणते, लोकांची मानसिकता अश्याही विविध बाजू कमी अधिक प्रमाणात समजायला लागल्या, आणि नव्याने समजत आहेत. आधी डे केअर आणि मग किंडरगार्टन असा प्रवास करून, आता यावर्षी सृजन पहिलीत गेला.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

बेर्था बेंझ - पहिल्या ऑटोमोबाईल प्रवासाची कहाणी

अगदी सुरुवातीलाच इथे आल्यावर Stuttgart ला मर्सिडीज म्युझियम बघायला गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा बेर्था बेंझ हे नाव ऐकलं. ते म्युझियम खूप आवडलं होतं, केवळ भारी भारी गाड्या बघायला मिळाल्या म्हणून नाही, तर चाकाच्या शोधापासून ते आताच्या अत्याधुनिक गाड्यांच्या तंत्रज्ञानाचा प्रवास तिथे अतिशय उत्तम पणे दाखवला आहे म्हणून ते खूप आवडलं. त्या आधी मानहाइम या गावाबद्दल माहिती शोधत असताना, कार्ल बेंझ हे नाव वाचून थोडी त्याचीही माहिती वाचली होती. पण ही ओळख इथवरच मर्यादित होती.

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४४

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या सिनियर केअर होममध्ये आज एक नवीन जर्मन आज्जी दाखल झाल्या. वय वर्ष 98. डोळयांनी पूर्णपणे अंध. आज त्यांचा इथे पहिलाच दिवस असल्याने त्यांचे स्वागत करून त्यांना माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल माहिती देऊन आज थोडक्यात संभाषण आटोपून उद्या सविस्तर बोलावे, असे ठरवून मी त्यांना भेटायला गेले.

Keywords: 

लेख: 

काही गाणी आणि आरस्पानी

   बन लिया अपना पैगंबर
   तर लिया तू सात समंदर
   फिर भी सुखा मन के अंदर
   क्यों रह गया
   रे कबिरा मान जा....
   रे फकिरा मान जा..
  आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया

लेख: 

पाने

Subscribe to लेख
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle