लेख

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ७)

१९६० चे दशक हे कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्काकरता निर्णायक होते. १९६४ साली सिव्हील राईट्स कायद्यानुसार अमेरिकेतील सेग्रिगेशन संपले, १९६५ च्या वोटींग राईट्स कायद्यानुसार मतदानाकरता नोंदणी आणि मतदान या दोन्ही बाबींमध्ये पारदर्शकता आणण्यात आली, १९६८ च्या फेअर हाउसिंग कायद्यानुसार घराकरता कर्ज घेताना, घर विकत/भाड्याने घेताना, विकताना कृष्णवर्णीयांविरुद्ध वर्णभेद करणे बेकायदेशीर झाले. कृष्णवर्णीय समाज मुख्य धारेत आणण्याकरता हे तिन्हीही कायदे महत्त्वाचे ठरले. १९६८ साली शर्ली चिझम ही अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडली गेलेली पहिली अफ्रिकन अमेरिकन महिला ठरली.

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ६)

मे १९५४ मधील ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन खटल्यातील निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने शाळेमधील सेग्रिगेशन रद्द केले आणि दक्षिणेत कृष्णवर्णीयांना आशेचा किरण दिसला. वर्णभेद, विभक्तीकरण, असमानता या बाबतीत फारसा बदल झाला नसला तरी शहरांमध्ये कृष्णवर्णीयांनी त्याबद्दल आपापल्या परीने निषेध नोंदवण्यास सुरुवात केली होती. मात्र १९५५ च्या ऑगस्ट महिन्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे वर्णभेदी दक्षिणेत कृष्णवर्णीय समाज न्याय या गोष्टीपासून किती दूर आहे हे सार्‍या देशाने परत पाहिले.

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ५)

होमर प्लेसी हा लुइझियाना राज्यातील न्यू ऑर्लियन्स शहराचा रहिवाशी होता. तो वंशाने एक अष्टमांश अफ्रिकन अमेरिकन होता. त्याचे मूळचे फ्रेंच असलेले आजोबा हे अठराव्या शतकात न्यू ऑर्लियन्सला आले. तिथे त्यांनी अफ्रिकन अमेरिकन वंशाच्या 'फ्री' स्त्रीशी लग्न केले. होमरच्या आईच्या बाजूचा सगळा परिवार हा श्वेतवर्णीय होता. त्याच्या उजळ त्वचेमुळे त्याच्या पूर्वजांविषयी माहिती नसलेल्या लोकांमध्ये तो श्वेतवर्णीयच समजला जायचा पण सेग्रिगेशनच्या नियमानुसार, एका अफ्रिकन पूर्वजामुळे त्याला कृष्णवर्णीयांना लागू होणारे सर्व नियम लागू व्हायचे, पाळावे लागायचे.

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ४)

९ एप्रिल १८६५ साली व्हर्जिनियामध्ये कन्फेडरेट सैन्याचा सेनापती जनरल रॉबर्ट इ ली याने शरणागती पत्करली आणि अमेरिकेत ४ वर्ष सुरु असलेले उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमधील युद्ध संपले. या युद्धाने जवळपास सहा लाखांच्या वर सैनिकांचा आणि हजारो नागरिकांचा बळी घेतला. पराभवाबरोबरच लाखो मुलगे, वडील, भावंडे यांचे मृत्यू, जप्त झालेली जमीन, बेचिराख झालेली शहरे, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था याने दक्षिणेतील राज्ये पोळून निघाली, संतप्त आणि हतबल झाली.या पराभवाचे खापर कोणावर तरी फोडणे क्रमप्राप्त होते. ते साहजिकच नवमुक्त गुलामांवर फोडले गेले.

Keywords: 

लेख: 

डाऊनटन अ‍ॅबी

da.png

mathew.jpg
(फोटो: नेटवरून साभार)

************ या लिखाणात spoilers असतील **********************************

गेला महिनाभर बघत असलेली "डाऊनटन अ‍ॅबी" ही मालिका काल बघून संपवली. खरं तर ही मालिका बघण्यात आमचं वरातीमागून घोडंच झालं पण ते जौंदे.

उंच माझा झोका! Breaking Through : Isher Judge Ahluwalia

इशर! भारतीय अर्थशास्त्राच्या क्षेत्रातली एक चमकती चांदणी! काहीजण बुद्धीमत्तेसोबत उत्तम नशिबाचंही वरदान घेऊन येतात खरे. त्याला मेहनतीची/ चिकाटीची जोड  दिली की  घडत जातो एक विस्मित करणारा प्रेरणादायी प्रवास!

Keywords: 

लेख: 

प्रिगादी प्रागादी पिप्पारकोगीद

नोव्हेंबर महिना उजाडला की आमच्या इटुकल्या शहरातली पिटुकली दुकानं सज्ज होतात ख्रिसमच्या तयारीला. सुंदर सुंदर ख्रिसमस ट्री, कलात्मक वेष्टनात सजवलेले मार्झिपान(१), निरनिराळे 'अडवेंट कॅलेंडर्स'(२) यांच्या जोडीला हवेत मंद असा 'पिप्पारकोक' अर्थातच 'जिंजरब्रेड' बिस्किटांचा घमघमाट. कुरकुरीत अशी हि बिस्किटं खायला जितकी चविष्ट तितकच त्यावर केलेलं कलात्मक नक्षीकामही बघत रहावं असं.

लेख: 

अनोखी  लायब्ररी  : The Midnight Library by Matt Haig

"Between life and death, there is a library.. and within that library, the shelves go on forever. Every book provides a chance to try another life you could have lived. To see how things would be if you had made other choices." 

Keywords: 

लेख: 

आली गौराई

मायबोली २०१३ गणेशोत्सव पत्र सांगते गूज मनीचे स्पर्धेसाठी लिहीलेलं हे पत्र :

प्रिय गौरी, १/९/१३

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to लेख
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle