केके

ऐल पैल 2- किल्ली

नवीन मालकांना घर सोपवण्याआधी ते थोडंसं आवरून पुसून देण्याची जबाबदारी त्रिशा मीनाक्षी ने घेतली होती. आदल्याच दिवशी त्यांनी सुमंतांकडेच आधी कामासाठी असणाऱ्या बाईला आजचा वेळ देऊन ठेवला होता. सोसायटीत असं एक दिवस एखाद्याच कामासाठी तयार होणारी बाई मिळणे कठीण होते, त्यामुळे ही जुनी बाई हमखास येईल म्हणून हिला मीनाक्षीने सांगून ठेवले होते आणि त्यामुळे तिचा नंबरही घेऊन ठेवावा असे तिला वाटले नव्हते. तिची वाट पाहात त्या दोघींनी तिथेच हॉल मध्ये जमिनीवर बसकण मारली.
" किती भकास झालं हे घर एकाएकी" मीनाक्षी चहूबाजुंना पाहात म्हणाली.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 1- सुरुवात

तुम्ही लोक खरंच निघून चालला आहात, मला विश्वासच बसत नाहीये. आम्हाला अजिबात करमणार नाही " त्रिशा सुमंत काकूंचा हात हातात घेत म्हणाली.
"काकू खरंच.. रद्द करा शिफ्टिंग बिफ्टिंग, तुमचं घर आमच्यासाठी सेकंड होम आहे! काका, तुम्ही, अजय, दिशा तुम्ही सगळे फॅमिली आहात. मी तर नाही जाऊ देणार तुम्हाला, बस ठरलं" मीनाक्षी डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
"पोरींनो आता मी काय करणार, इथून पुढे जिकडे अजय, तिकडे आम्ही. मला मेलीला तरी कुठे सोडावं वाटतंय हे घर, तीस वर्षे राहिलीये मी या शहरात आणि या घरात पंधरा वर्षे. तुम्ही दोघी पोरी आल्यापासून तर मला मुलीच मिळाल्या" काकू म्हणाल्या

Keywords: 

लेख: 

खोल

किती वर्षे उलटली असतील? दोन? तीन? पाच? सतत इथेच बसून काळाचं भान राहिलेलंच नाहीये. आणि हवंय तरी कशाला? ना मी मागे जाऊ शकत, ना पुढं. आताशा मला कळू लागलंय. इथेच , अशीच, याच परकर पोलक्यात , गुडघ्यावर हनुवटी ठेऊन बसायचंय मला कायम. नाही म्हणायला हा डोक्यावरचा वड सोबतीला असतो. तो मात्र आहे तसाच आहे. त्याच्या लांब, अस्ताव्यस्त, खालीवर लोम्बणाऱ्या पारंब्या मात्र मला आवडत नाहीत. रात्र झाली की चंदेरी प्रकाशात खालून एवढ्या उंचावर पाहताना भेसूर दिसतात. कधी कधी वाटतं माझ्या हातांची बोटंच पसरली आहेत अशी लांबच लांब, वाकडी तिकडी, फाटे फुटलेली! छे , मूर्खच आहे मी. मी का घाबरतेय?

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 12 (शेवटचा भाग)

......
क्रिस्टन चा फोन खणखणला. आरशा समोरून ती तशीच तिच्या पर्सकडे गेली. जेसीका चा फोन होता.
" क्रिस्टन, गुड न्यूज. Carry's मधून मला फोन आला होता. तुझा ड्रेस आजच मिळतोय. इन फॅक्ट आताच. मी तिकडंच आहे आता. ड्रेस पीक केलाय आता बिलिंग च्या लाईन मध्ये आहे. आधी थेट घरीच येऊन सरप्राईज देण्याचं प्लॅन..
" जेसीका, ठेऊन दे तो ड्रेस. मला नकोय."
" काय? क्रिस ही जोक करण्याची वेळ नाही, चल बाय मी बिल पे करते"
" मी सिरीयस आहे. ठेऊन दे तो ड्रेस. मला नकोय. " क्रिस्टन थंड आवाजात शेवटचं बोलून फोन ठेवला.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 11

व्हिक्टोरीयाने डोळे किलकिले करून पाहीले तेव्हा ती कुठल्याशा घरात होती. जाग आली तशी ती पटकन उठून उभा राहीली. आजूबाजूला पाहु लागली. ते एक लहानसे, जुनाट पण मजबूत दगडी घर वाटत होते. भिंतीतल्या एका कोनाड्यात कंदील ठेवलेला. चौकोनी आकाराचा, काचेच्या भिंती असलेला. त्याचाच मंद, मरगळलेला प्रकाश त्या खोलीत पसरलेला होता. तिच्या लक्षात आलं की घरात सामान असं काही नाहीच. एका भिंतीत जमिनीलगत जळून राख झालेली लाकडं असलेली अगदी लहानशी फायरप्लेस होती एवढंच. नक्की कोणती वेळ असावी ही? रानातला रस्ता लागला तेव्हा रात्र झाली होती हे तिला आठवले, आपण कोसळून खाली पडलो होतो हेही आठवले. आता काय आहे? सकाळ? रात्र?

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 10

घरी पोहोचल्यानंतर व्हिक्टोरिया विल्यम्स ला स्टडी हॉल , रूम, घरात सगळीकडे शोधू लागली. शेवटी तिने घरातल्या नोकर माणसांना विचारल्यावर तो कुठल्याशा दौऱ्यावर गेलाय आणि रात्रीच परतेल असं तिला कळालं. या वेळेत तिला शांत बसवले नाही. ती पुन्हा हेन्री च्या घराकडे गेली. जवळ तेरेसा चे पत्र होतेच. शेजारी रसेल्स च्या घराचे दार ठोठावले. आतून एक वेगळाच माणूस बाहेर आला.
" मला डेव्हिड रसेल यांना भेटायचं आहे"
तो माणूस प्रश्नार्थक नजरेने व्हिक्टोरिया कडे पहात राहीला.
" तुम्ही कोण?"
"मी मिस व्हिक्टोरिया विल्यम्स. प्लिज माझं खूप अर्जंट काम आहे. ते आहेत का घरात? "

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 9

व्हिक्टोरिया ने तेरेसा चे पत्र वाचले. तिच्याकडे एक लहानशी लाकडी पेटी होती. त्यात तिने आजवर तिला जपून ठेवावीशी वाटतात अशी पत्रं ठेवलेली होती. तेरेसाचे पत्र ठेऊन देण्यासाठी ती पेटी तिने बाहेर काढली . पेटी उघडताच सगळ्यात वर ठेवलेले हेन्री ने मरण्याच्या आधी तिला लिहिलेल्या पत्राचे पाकीट ठेवलेले होते. हेन्री ची शेवटची आठवण! तिने ते सहज उलटून पालटून पाहीले. उघडून पत्र बाहेर काढले, पुन्हा वाचले. पाकिटात खाली असलेली जांभळी फुलं तशीच होती, फक्त सुकून करडी पडलेली, हात लावला की चुरा होणारी. तिने पत्राचा कागद पुन्हा नीट घडी घालून पाकिटात ठेवला.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 8

जमिनीवर आपले पाय मरगळल्या सारखे पडताहेत, कोणीतरी आपल्याला धरून चालवत नेत आहे असं काहीसं ग्लानीत असलेल्या व्हिक्टोरियाला जाणवत होतं. कोणीतरी आपल्याला गाडीत बसवत आहे असं वाटत असताना ती घाबरून थोडीशी भानावर आली. तिच्या अंगावर घातलेल्या कोटाने तिला थोडीशी उब वाटत होती. तो माणूस तिचे डॅड आहेत हे पाहून तिला धीर आला.
"डॅड, तुम्ही कधी आलात? त्या नदीत कोणीतरी वाहून.. त्याचा चेहरा"
" विकी शांत हो बाळा, सावकाश बोलू आपण सगळं" विल्यम्स ने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 7

पुढचा भाग टाकायला खूपच उशीर करतेय त्याबद्दल बिग सॉरी....!
लिंक लागण्यासाठी आधीचे भाग पटकन वाचायचे असतील तर ही लिंक!

https://www.maitrin.com/node/3733

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस- 6

.....…......चार दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतल्यानंतर व्हिक्टोरिया ब्रेकफास्ट ला डायनिंग हॉल मध्ये येण्यास तयार झाली. मेजर विल्यम्सने तिच्या आणि हेन्री च्या लग्नाला असलेला विरोध काढून घेतला होता. हेन्री शहरातल्या गरीब वस्तीत आपल्या आईबरोबर राहणारा, वडील नसलेला, दुसऱ्यांच्या शेतीत राबून कष्ट करणारा मुलगा. तो एक उत्तम शिल्पकार होता. शिल्पकलेच्या विद्यालयात शिकून व्यावसायिक शिल्पकार होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण शिक्षणासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी त्याने शेतकामे सुरू केली. लवकरात लवकर पुरेसे पैसे जमा करण्यासाठी तो दुप्पट कष्ट करत असे.

Keywords: 

पाने

Subscribe to केके
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle