July 2019

ला बेला विता - २

भाग १

तिची पाठ वळताक्षणीच तो आपलं जास्तच निरीक्षण करतोय असं तिला जाणवलं म्हणून तिने चालता चालता सहज मागे वळून पाहिले. आता त्याचा गॉगल टेबलवर होता आणि त्याचे हिरवट घारे डोळे तिच्यावर रोखलेले होते आणि चेहऱ्यावर वेगळेच काहीतरी भाव होते जे प्रयत्न करूनही तिला उमगत नव्हते. त्याची नजर तर शांत, थंड होती पण त्या एखाद्या  हिरवट शेवाळलेल्या डोहासारख्या शांत डोळ्यांमागे प्रचंड खळबळ दडलेली आहे असं तिला वाटू लागलं. ती पटकन मान फिरवून रिसेप्शनमधल्या तिच्या खुर्चीवर जाऊन बसली.

Keywords: 

लेख: 

रंग माझा वेगळा - भाग शेवटचा

रंग माझा वेगळा - भाग शेवटचा

आयुष्य खूप छोटं आहे*
*हां हां म्हणता मृत्यू येईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चताप होईल*

सकाळ सकाळी विराजने पोस्ट टाकली . अगदी सकाळ सकाळी

वा क्या बात है . तिने अंगठा दाखवला . आणि सकाळच्या कामाला लागली. आज सुट्टीचा दिवस रविवार . मस्त मजेत आळसाचा दिवस . खूप वेळ मेसेजवर बोलण्याचा दिवस .नेहमी प्रमाणे रविवारच आवरून वगैरे दुपारचा साडेअकरा -बारा वाजत तिने मेसेज केला

"मस्त चारोळी पाठ्वलीस रे सकाळ सकाळी "

." हो मुदामूनच तुला खुश करायला "

"थांब हा जरा मी गिरनार ग्रीन टी घेऊन येते . तुझ्यासारखा हॉट आणि स्वीट . मग माझ्याशी बोल"

Keywords: 

अनुप्रास

सरधोपट सरळसोट
नाजूक बांधा मोठे पोट
आटपा चटचट विना कटकट
पांढरी साडी काळा कोट
श्वासोच्छवास ,भास-आभास
करून घ्या मोकार त्रास
नवी साथ नवी आस
मांडव बाजार -भ्रमनिरास
हा असाच रोजचाच भोगा जगण्याचा अनुप्रास

सोमवारच्या निळाईस ,
सप्रेम

कविता: 

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

अरे देवा विठ्ठला
निघाला निघाला
पायी चालला
वारकरी।।
उभा वाटेवरी
घेऊन भाकरी
करीन चाकरी
क्षणभरी ।।
भक्त मज सम
मुखी तव नाम
राहू नको लांब
जवळी ये ।।
पालखी सोहळा
पाहू निज डोळा
भेटेल सावळा
भाव भोळा ।।
गर्दी वाळवंटी
आस एक गाठी
होवो तुझी भेटी
विठूराया ।।
मिटूनिया डोळे
नजरा नजर
चालला गजर
जय हरी ।।
विठ्ठल विठ्ठल........

विजया केळकर ______

कविता: 

ला बेला विता - ३

भाग २

एन्व्हलप बघून तिला धक्काच बसला. आता मला चिट्ठी लिहिण्यासारखं काय आहे आमच्यात? का ही माणसं जवळीक करायला बघतात उगाच? की हा अजूनही जाईल तिथे असाच बायकांवर चान्स मारत असतो देव जाणे.. एकदा तिच्या मनात तसंच एन्व्हलप फाडून कचऱ्यात टाकायचा विचारही आला पण तिच्यातल्या उत्सुकतेने त्याच्यावर मात केली. असून असं काय असणार त्यात, बॉंब तर नक्कीच नसेल. विचार थांबवत शांतपणे तिने एन्व्हलप उघडलं. आत पांढरी शुभ्र, गोलाकार आणि वर निळ्या शाईत 'White Elite' मोनोग्राम असलेली दोन तिकिटे!

'Asymmetric'
by A. Diwan
tuesday - thursday - saturday

Keywords: 

लेख: 

ला बेला विता (कथा)

आज दुसरा कुठलाही दिवस असता तर कदाचित हा माणूस बेलाच्या इतका डोक्यात गेला नसता आणि तो कोण आहे हे माहीत असतं तर त्याच्यापासून ती चार काय, आठ पावलं लांबच राहिली असती पण... पण तिला ते माहीत नव्हतं आणि आजचा सोमवार असा होता की मंडे ब्लूज ही फारच सॉफ्ट टर्म झाली. आख्खा लंच अवर म्हणजे डोक्याला शॉट झाला होता.

64378E03-1BD2-4497-B17A-DE11E998E570.jpeg

लेख: 

ला बेला विता - ५

त्याच्या इतक्या जवळ गेल्याची जाणीव तिला काही वेळाने झाली तेव्हा त्याच्या अंगाची ऊब,  त्याच्या जॅकेटचा थोडा लेदरी, थोडा वूडी गंध आणि त्याच्या डबलमिंटचा रिफ्रेशिंग वास तिच्या नाकात शिरला. त्याच्या उष्ण श्वासांची आवर्तने तिच्या केसांमध्ये तिला जाणवत होती. तिने डोळे मिटून त्याच्या छातीवर डोके टेकले पण हे पुढे कुठे जाणार ते लक्षात येऊन ती मुद्दाम हळूच ओह.. निखिल, स्टॉप इट.. म्हणून कुजबुजली. अचानक अंगावर पाल पडल्यासारखं त्याने तिला मिठीतून ढकलून बाजूला केलं. पुन्हा मघासारखेच त्याचे डोळे थंड रागाने तिच्यावर रोखलेले होते. ओठ मुडपून त्यांची एक सरळ रेष झाली होती.

Keywords: 

लेख: 

तुझमे तेरा क्या है - ९

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289

तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306

तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318

तुझमे तेरा क्या है - ६
https://www.maitrin.com/node/3460

तुझमे तेरा क्या है - ७
https://www.maitrin.com/node/3522

तुझमे तेरा क्या है - ८
https://www.maitrin.com/node/3711

पुढे चालू

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle