July 2020

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३२

२६.०६.२०२० या दिवशी विस्कळीतपणे लिहिलेला हा मोठा भाग नीट लिहून नंतर प्रकाशित करावा, म्हणता म्हणता तो प्रकाशित करायचा राहूनच गेला. हा भाग खूप मोठा झाल्याने दोन भागात विभागून टाकत आहे.
(भाग:१)

डायरीच्या या भागात मी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटीच्या निमित्ताने बराच काळ राहता आल्याने काय काय नवीन शिकता आले आणि अनुभवता आले, त्यातला काही भाग सांगणार आहे.

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३३

२६.०६.२०२० रोजी लिहिलेली डायरी नीट लिहून प्रकाशित करायचे काही ना काही कारणाने राहून गेले. हे लिहून झाल्यानंतर आता बरेच काही घडलेले आहे, पण हे वाचल्याशिवाय पुढचा संदर्भ लागणार नाही, म्हणून आधी हे २ भागात प्रकाशित करते आहे.
(भाग:२)

जगभरात काही देशांमध्ये करोना परिस्थिती सुधारते आहे, तर काही देशांमध्ये ती चिघळत चाललेली आहे, मात्र सगळीकडेच आता करोनासोबत जगायला सुरुवात करण्याविषयी एकवाक्यता व्हायला लागलेली असल्याने लॉकडाऊन शिथिल करत अनलॉकच्या फेजेस सुरू होतांना दिसत आहेत.

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३४

आयुष्य म्हणजे 'सापशिडीचा' खेळ किंवा जर्मन भाषेत 'मेन्श एर्गेरे दिश निष्त' हा खेळ तर नाही ना, असे वाटावे, इतक्या पटापट घडामोडी होऊन गोष्टी क्षणात होत्याच्या नव्हत्या होऊन पुन्हा शून्यापासून सुरू कराव्या लागत आहेत. करोनाने आयुष्याचा आपल्याजवळ काहीही कंट्रोल नाही, आपण प्लॅन करायचा आणि ह्या करोनाबाबाने उधळून लावायचा, असा जणू चंगच बांधलेला आहे, असे आता वाटायला लागलेय आणि हे दुष्टचक्र कधी संपेल, संपेल की नाही, असे निराशाजनक विचार मनात निर्माण होत आहेत, पण ते झटकून इतर निराश लोकांना सावरण्याची जबाबदारी निभावतांना आता माझ्या मात्र नाकी नऊ यायला लागलेले आहेत..

ऐल पैल 1- सुरुवात

तुम्ही लोक खरंच निघून चालला आहात, मला विश्वासच बसत नाहीये. आम्हाला अजिबात करमणार नाही " त्रिशा सुमंत काकूंचा हात हातात घेत म्हणाली.
"काकू खरंच.. रद्द करा शिफ्टिंग बिफ्टिंग, तुमचं घर आमच्यासाठी सेकंड होम आहे! काका, तुम्ही, अजय, दिशा तुम्ही सगळे फॅमिली आहात. मी तर नाही जाऊ देणार तुम्हाला, बस ठरलं" मीनाक्षी डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
"पोरींनो आता मी काय करणार, इथून पुढे जिकडे अजय, तिकडे आम्ही. मला मेलीला तरी कुठे सोडावं वाटतंय हे घर, तीस वर्षे राहिलीये मी या शहरात आणि या घरात पंधरा वर्षे. तुम्ही दोघी पोरी आल्यापासून तर मला मुलीच मिळाल्या" काकू म्हणाल्या

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 2- किल्ली

नवीन मालकांना घर सोपवण्याआधी ते थोडंसं आवरून पुसून देण्याची जबाबदारी त्रिशा मीनाक्षी ने घेतली होती. आदल्याच दिवशी त्यांनी सुमंतांकडेच आधी कामासाठी असणाऱ्या बाईला आजचा वेळ देऊन ठेवला होता. सोसायटीत असं एक दिवस एखाद्याच कामासाठी तयार होणारी बाई मिळणे कठीण होते, त्यामुळे ही जुनी बाई हमखास येईल म्हणून हिला मीनाक्षीने सांगून ठेवले होते आणि त्यामुळे तिचा नंबरही घेऊन ठेवावा असे तिला वाटले नव्हते. तिची वाट पाहात त्या दोघींनी तिथेच हॉल मध्ये जमिनीवर बसकण मारली.
" किती भकास झालं हे घर एकाएकी" मीनाक्षी चहूबाजुंना पाहात म्हणाली.

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३५

मी खालच्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर डॉक्युमेंट करत बसलेले असतांनाच मला कॉल आला, एका आज्जींना मिस्टरांच्या फ्युनरलला जायचे नाहीये, त्या खूप रडत आहेत, तू प्लिज त्यांना जाऊन भेटशील का लगेच?

फ्युनरलला जायचे नाहीये? असे कसे होऊ शकते? आज्जींनी आजोबा गेले, हे अजूनही स्वीकारले नाहीये का? असे प्रश्न मनात असतांनाच मन दोन आठवडे मागे भूतकाळात गेले..

ऐल पैल 3 - त्रिशा

त्रिशाला नोकरी लागली त्याच महिन्यात तिचे बाबा गेले. तोपर्यंत स्टॅटिस्टिक्स मध्ये पीजी ते कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड ह्या गोष्टी झटपट आणि स्वप्नवत झाल्या होत्या. पहिल्या पगारात आई बाबांसाठी काहीतरी करायचं यावर रोज रात्री गादीवर पडलं की ती विचार करत असे. त्यातली आईबाबांसाठी नॉर्थ ईस्ट इंडिया टूर च्या पॅकेज ची कल्पना तिला मनापासून आवडली. बाबा अजून रिटायर्ड नव्हते त्यामुळे त्यांच्या हातात थेट तिकीटं देऊन उपयोग नव्हता. तसेच 'कशाला यात पैसे घालवलेस ते तुम्हा दोघींना सोडून आम्हाला एकट्याने जावं वाटणार नाही' यासाठी एक दिवस द्यावा लागणार होता.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 4 - नवा शेजारी

सवयीप्रमाणे जिना चढत त्रिशा तिसऱ्या मजल्यावर आली. समोरच्या फ्लॅटचं दार उघडं होतं. शिफ्टिंग चालू असल्याच्या खुणा दिसत होत्या. दोन दिवस सुमंतांच्या बंद घराची तिने सवय करून घेतली होती, पण ते दार आज उघडं दिसलं आणि ती एकदम नॉस्टॅल्जिक झाली. त्यांनी आणि त्रिशा मीनाक्षीने एकत्र साजरे केलेले सण, वाढदिवस, सुटीच्या दिवशी पाहिलेले मुव्हीज, अंगतपंगत, न्यू इअर च्या रात्री उशिरापर्यंत पाहिलेले कार्यक्रम हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून गेलं. त्या घराकडे तोंड करून शून्यात बघत ती उभी राहीली. अखेर पुन्हा वर्तमानात येत एकेक पाय वर घेत तिने सँडल चे बंद काढले, चपलांच्या कपाटात सरकवले.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 5 - पीजे

त्रिशा जिना उतरत बिल्डिंग मधून बाहेर पडली. जून नुकताच लागलेला होता. उरल्यासुरल्या उन्हाळ्यातल्या रात्रीचा आणि अजून सुरू न झालेल्या मान्सूनची चाहूल असलेला असा मिश्र सुखद, गार, नॉस्टॅलजीक वारा होता. उगाचच आपल्या क्रशची, ब्रेकअप ची, किंवा शाळेत असताना या काळात सुरू असलेल्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा! खाली रोजच्यासारखे , रोजचे ठरलेले सोसायटीकर फिरताना दिसत होते. सोसायटी खूप मोठी होती. ए बी सी पुन्हा त्यात ए 1, 2,3 अशा बिल्डिंगस् च्या रांगा होत्या, त्यामुळे मधला आवार कडेकडेने गाड्या पार्क करूनही लांबी रुंदीला मोठा रहात होता.

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle