लेख

असं असं घडलं .... ४ अ. मध्ययुग, महाराष्ट्रातील संत ( ऑडियो )

मागे कधी तरी लिहिलेला हा लेख. पण टाईप न केलेला.आता टाईप करायला वेळ नव्हता म्हणून रेकोर्ड केला.

खरं तर ऑडियोच. पण त्याची सोय नाही म्हणून उगा आपला व्हिडियो Whew

लेख: 

चौकटीतली वहिनी/मुलगी/भाची/बहीण/बायको/मैत्रीण

काल एका मोठ्या ब्रँड च्या दुकानात गेले होते.लहान मुलांचे कपडे छान होते.जीन्स पाहिल्या, तर 3 ते 4, 5 ते 6, 7 ते 8, 9 ते 10 अश्या वयाच्या रेंज मध्ये मुलींच्या जीन्स, फक्त उंची वाढते.पायांची रुंदी सर्वांची अतिशय बारीक.9 ते 10 वाल्या जीन्स च्या पायांची रुंदी 2.5 इंच होती(म्हणजे टोटल 5, आणि स्ट्रेच ने अगदी कमाल स्ट्रेच करून 6 इंच.)जीन्स ला प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतोय.एकतर अगदी कुपोषित बारीक लेग्स असलेली मुलगी असा, नाहीतर होजियरी लेगिंग विकत घ्या.हे लेगिंग स्टॅयलिश अंकल लेंग्थ फार कमी ब्रँड चे मिळतात.बाकी सगळे 'पंजाबी ड्रेस सुरवार टाईप चुण्या'.टीशर्ट च्या खाली घातल्यास अत्यंत विचित्र दिसतात.म

Keywords: 

लेख: 

प्रवास पावसाचा

सुट्टीतला पाऊस खासच असायचा. कारण सुट्टीतल्या पावसाकडे सगळं लक्ष एकवटून शांतपणे बघता यायचं. त्यात गारांची भर असायचीच.

लेख: 

ऐक ना ...

हाय, कसा आहेस?
मनमौजी तू, त्यामुळे हा प्रश्न तुझ्याबाबतीत इन-व्हॅलीड ठरतो म्हणा... सरळ मुद्द्यावरच येते.

तुझे परतायचे दिवस जवळ येऊ लागलेत, म्हणून म्हटलं आधीच तुला सांगून टाकावं... एकदा आलास की तू कुठचा ऐकतो आहेस मला...
तुला आठवत का रे, कधी सुरू झालं आपलं हे सगळं?... सगळं म्हणजे... हो बाबा, बोलते स्पष्टच... अफेयर!
मला तर आठवतच नाही, किती मागे गेले तरी तू आहेसच सोबत.
तुझ्याशिवाय जगले तरी आहे का कधी, असं वाटू लागलं आहे आता... असं काय आहे आपल्यात जे अजून कायम आहे? तेच शोधून काढायचा प्रयत्न करतेय... म्हणजे समूळ नष्ट करता येईल सगळं.

Keywords: 

लेख: 

अस असं घडलं ... ८. सृजन

( स्थळ : लाखो वर्षापूर्वीची, एक अश्मयुगीन गुहा)

ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.

लेख: 

माझ्या आठवणीतील रिमा

सिनेमा पाहून तो समजायला लागल्यावर रिमांना पहिल्यांदा पाहिले ते सलमान खानची आई म्हणून. नवऱ्याच्या विरोधात जाऊन स्वत:चे कंगन काढून लेकाच्या हातात देणारी आई हिंदी चित्रपटात तेव्हा फारच वेगळी पण खूप छान वाटली होती. आईने कसे कायम दु:खी आणि सोशिकच असले पाहिजे ह्या परंपरागत प्रतिमेला छेद दिला तो रिमांनी. त्यांच्यामुळेच तर स्वतंत्र विचारांच्या, आधुनिक आणि आनंदी आया प्रेक्षकांनी स्वीकारल्या. एक वर्षानुवर्षांची परंपरा मोडून काढणे हे कर्तृत्व मोठेच पण तेवढीच त्यांची ओळख नाही. त्या एक अतिशय ताकदीची अभिनेत्री होत्या हे मला खूप नंतर त्यांचे इतर सिनेमे / मालिका पाहिल्यावर कळले.

लेख: 

ImageUpload: 

शांतता

आजुबाजूला कसलाही आवाज नसतानासुद्धा बोलते ही शांतता.
ऋतुनुसार भाषा बदलते ही शांतता.
हो! शांतता बोलते ! कधी तुम्ही ऐकले आहे का हे शांततेचे बोलणे?
मी ऐकले आहे. निदान पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुमध्ये तरी.
काही दिवसांपूर्वी मी ऑफिस मध्ये बसले होते. बाहेर किमान ४४ ते ४५ डिग्री तापमान असावे. रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती. अधूनमधून काही गाड्यांची ये जा चालू होती पण ती ही गाडीतील एअर कंडिशनर चालू ठेवूनच. मी काही कामासाठी ऑफिसच्या बाहेर पडले आणि माझ्या गाडीकडे चालत निघाले होते. त्यावेळी मला जाणवले की उन्हाळ्यातील शांतता ही पावसाळ्यातील शांततेपेक्षा खूप वेगळी असते.

Keywords: 

लेख: 

स्मृती संचय (मेमरी कलेक्शन)

सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीने(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांचं ती समुपदेशन करते.

Keywords: 

लेख: 

अस अस घडलं... ७. आणि मी मोठी झाले.

(अश्मयुगातल्या सीतेची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )

पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "

आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.

लेख: 

बक्लावा - खाऊगिरीचे अनुभव ३

न्यूकासलला जेसमंड मॉलमध्ये मिशेल्स नावाचं एक केक्स आणि पेस्ट्रीजचं दुकान होतं. मला तेव्हा केक्स आणि पेस्ट्रीजचं फारसं आकर्षण नव्हते. भारतीय गोड पदार्थ जास्त आवडत होते. परदेशी गोड पदार्थ फारच अगोड वाटायचे. एक दिवस नवरा म्हटला की "चल तुला मिशेल्समध्ये बक्लावा खाऊ घालतो". तेव्हा बक्लावा हे काय प्रकरण आहे ते मला अजिबातच माहित नव्हतं. मी त्याला विचारलं "हे काय असतं?" तर तो म्हटला "एक टर्कीश गोड पदार्थ असतो. आवडेल तुला" म्हटलं बघुयात तरी काय आहे हे. आम्ही एकेक बक्लावा घेऊन तिथे खायला बसलो. तेव्हा सुद्धा फोटो काढलेले नाहीत. खालचे फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.

लेख: 

ImageUpload: 

पाने

Subscribe to लेख
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle