कथा

चिठ्ठी भाग 5

चिठ्ठी भाग 4 -
https://www.maitrin.com/node/3952

"अनु, बाळा, जा बरं पोलीसताई कडे हा गजरा नेऊन दे बरं. विसरली वाटतं नीलू. तसंच पेरू काढून ठेवलेत. ते त्या पलिकडच्या गल्लीत राहतात ना वकीलीणबाई, त्यांना दे. पाहुणे येणारेत त्यांच्या कडे. नेशील ना व्यवस्थित? ", सुमाने विचारलं.
"होssss"
असे ओरडून पिशवी सावरत रस्त्याला लागला अनु. नेहमी प्रमाणे घराबाहेर पडताच एखादा दगड हुडकून तो ठोकारत ठोकारत चालला होता तो.

Keywords: 

लेख: 

चिठ्ठी भाग 4

चिठ्ठी भाग 3 -
https://www.maitrin.com/node/3951

मुग्धा ओट्यावर हताश होऊन बसली होती. प्यायचं पाणी आलं होतं नळाला. सर्वांना पाणी मिळावं या उद्देशाने शोभाताईंनी नळाचं connection आतवर करून घेतले नव्हते. इतर वेळी सर्व बोअरचं पाणी वापरत. नळाला पाणी आलं की ते भरून झाल्यावर शोभाताईंना एक दोन हंडे-कळशी भरून देत.
शोभाताई बाहेर गेल्यामुळे मुग्धा पाणी भरायला बाहेर आली. ओट्याच्या पायर्यांजवळच खाली नळ होता. तिने कळशी भरायला ठेवली. पण ती काही भरेचना!
कळशी भरली की भिर्रकन अनुची स्वारी तिथं प्रकट व्हायची आणि 'दिदी तेरा देवर दिवाना' - या गजरात ती पालथी करायची! किती नको म्हटलं तरी अनु कुठे ऐकणार होता?

Keywords: 

लेख: 

चिठ्ठी भाग 3

चिठ्ठी भाग 2 - https://www.maitrin.com/node/3949

आतून अनुला आईबाबांचं बोलणे ऐकायला येत होते.
"कुठे उधळलेत चिरंजीव? आज तरी शाळेत जाणार का?"
"राहू द्या हो. चिंगी नाहीये ना इथे. म्हणून भिरभिरलाय जरा."
'कशी गोड माझी सुमाक्का!'

Keywords: 

लेख: 

चिठ्ठी भाग 2

चिठ्ठी भाग 1- https://www.maitrin.com/node/3948

"एखादं छानसं भजन म्हण ना मुग्धा", वाती तुपात बुडवत शोभाताई म्हणाल्या.
"कुठलं म्हणु?"
"कुठलंही म्हण अगं ", अनुला जवळ घेऊन कुरवाळत शोभाताई म्हणाल्या.
"किती वेळ लावशील? मी असतो तर आतापर्यंत म्हणून देखील झालं असतं आणि प्रसाद देखील खाऊन झाला असता..देवाचा", अनुची बडबडीकडे दुर्लक्ष करून मुग्धाने गायला सुरवात केली.

"तुझी पदकमले मज शतकोटी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी

तुझ्या पद-धुळीची आस देवा
नित्य नव्याने घडू दे सेवा
राहू दे तुझे आशिष पाठी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी
तुझी पदकमले मज शतकोटी||"

Keywords: 

लेख: 

चिठ्ठी भाग 1

"काक्कुआज्जी!"
ती चिरपरिचीत हाक हवेत विरते न विरते तोच फाटक सताड उघडे टाकून तो धापा टाकत आत पळत आला. फाटकाची कडी त्याचा हात जेमतेमच पुरत असे. तरी तो प्रयत्न करून फाटक उघडायचाच. ती हाक शोभाताईंनाच उद्देशून आहे हे ताडले तरी मुग्धा बैठकीत आली.
"कोण आहे? "
अंगावर जेमतेम कपडे घालून त्याच्यापेक्षा मोठ्या टाॅवेलला सावरत उभ्या त्या बटूला बघून तिला हसू आलं. तरी तिने वरकरणी सरळ चेहरा ठेवत पुन्हा विचारलं, "कोण बरं?"
"अण्ड्राग"
"काय? Android?!", नव्यानेच अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला course आठवला मुग्धाला.
"नै कै. अ..न..रा..ग"

Keywords: 

लेख: 

खोल

किती वर्षे उलटली असतील? दोन? तीन? पाच? सतत इथेच बसून काळाचं भान राहिलेलंच नाहीये. आणि हवंय तरी कशाला? ना मी मागे जाऊ शकत, ना पुढं. आताशा मला कळू लागलंय. इथेच , अशीच, याच परकर पोलक्यात , गुडघ्यावर हनुवटी ठेऊन बसायचंय मला कायम. नाही म्हणायला हा डोक्यावरचा वड सोबतीला असतो. तो मात्र आहे तसाच आहे. त्याच्या लांब, अस्ताव्यस्त, खालीवर लोम्बणाऱ्या पारंब्या मात्र मला आवडत नाहीत. रात्र झाली की चंदेरी प्रकाशात खालून एवढ्या उंचावर पाहताना भेसूर दिसतात. कधी कधी वाटतं माझ्या हातांची बोटंच पसरली आहेत अशी लांबच लांब, वाकडी तिकडी, फाटे फुटलेली! छे , मूर्खच आहे मी. मी का घाबरतेय?

Keywords: 

लेख: 

ला बेला विता - १६ - the end

"माझ्या प्रेमात.." ती स्वतःशीच पुटपुटली "आणि मी त्याला निघून जायला सांगितलं, कायमचं" पुढच्याच क्षणी रडक्या चेहऱ्याने नुपूराकडे बघत ती कसंबसं म्हणाली.

नुपुरा तिच्या तोंडाकडे बघतच राहिली. "अगं काय, काय चाललंय हे नक्की? हे कधी झालं? आत्ता इथे? " तिचे प्रश्न थांबतच नव्हते. "का केलंस तू असं?" तिचे हात घट्ट धरत नुपूराने विचारलं.

"मी आंधळी झाले होते, मला वाटलं-" पुढे तिला बोलायची गरजच नव्हती. तिला काय वाटलं ते नुपूरापर्यंत व्यवस्थित पोहोचलं होतं.

Keywords: 

लेख: 

ला बेला विता - १५

तिला पटापट सगळं आठवत गेलं. त्याने अवंतिका आणि त्या सगळ्या भूतकाळाबद्दल तर सांगितलं पण हल्ली त्याचं जे नुपूराबरोबर सुरू होतं त्याचं काय. ते तर त्याने तिला बरोब्बर गंडवून लपवून ठेवलं होतं. आंधळेपणाने ती नुपूराला कशी काय विसरली? 

त्याला नुपूराशी अफेअर करायचंय हे तिला माहीत आहे, हे त्याला तेव्हाच माहिती होतं. म्हणूनच त्याने मुद्दाम तिचा वापर करून नुपूराला रोखण्यापासून थांबवलं. आणि हा पूर्ण वेळ त्या दोघांचं अफेअर सुरू होतं! शिट!!

Keywords: 

लेख: 

ला बेला विता - १४

आज गर्दी, उत्साही आरडाओरड, हशा आणि चविष्ट खाण्यापिण्याने 'ला बेला विता' गजबजून गेले होते. प्रत्येक टेबल खचाखच भरलेले होते. सभोवतालचा उत्साह बघून बेलाच्या चेहऱ्यावरचे हसू कमीच होत नव्हते. नुपूराची 'ला बेला'मध्ये वेगवेगळ्या आर्टिस्ट्सचे गिग अरेंज करायची आयडिया खरंच कमाल होती. सगळी तिकिटं दोन दिवसातच सोल्ड आउट होती. आजची रात्र अजूनच खास होती कारण आज पहिला ऍक्ट असीमचा होता. आज आणि पुढचे सलग सहा दिवस! तो पूर्ण आठवडा इथे असणार होता. गेल्या चार महिन्यात चुटपूट लावत, घाईघाईत झालेल्या फक्त तीन भेटी तिला आठवत होत्या. त्यामानाने हा अख्खा आठवडा एकत्र म्हणजे तिच्यासाठी अगदी स्वर्गासमान होता.

Keywords: 

लेख: 

ला बेला विता - १३

"फायनली पाऊस थांबलेला दिसतोय." ती पडदा सरकवत म्हणाली. साडेपाचच्या अलार्मने जागी होऊन ती खिडकीत उभी होती. बाहेर अजूनही अंधार, थोडंसं धुकं आणि साठलेलं पाणी टपटपणारं रेन ट्री अंधुक दिसत होतं. काल त्याने बाबांना कॉल केल्यानंतरचे तास कसे गेले हे तिला पैज लावूनही सांगता आलं नसतं. अखंड बडबड, त्यांचं एकमेकांत गुंतून जाणं आणि रात्री कधीतरी एक दोन वाजता भुकेची जाणीव होऊन फ्रिजवर टाकलेली रेड. नक्की काय खाल्लं तेही तिला आठवत नव्हतं पण बहुतेक फ्रीजमध्ये चीज क्यूब्स, काकडी, टोमॅटो, उरलेला ब्लॅक फॉरेस्टचा तुकडा, फ्रीझरमध्ये अडीनडीला ठेवलेलं चॉकलेट चिप आईस्क्रीम एवढंच असावं.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to कथा
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle