January 2018

मी शिवलेली नऊवारी

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपण मोठा झाल्यावर काय होणार? म्हणजे जे ठरवलेलं असतं ते पूर्ण होतच किंवा मोठे होईपर्यंत ते मत ठाम राहतच असं नाही. आमच्या घरात आई शिवणकाम करायची आणि बाबा उत्तम टेलर होते. वेळ मिळेल तेव्हा आईला मदत करायचे. त्यांची एक शिलाई सुद्धा इकडची तिकडे होतं नसे. तर लहानपणापासूनच मी हे बघत आले. आणि बघता बघता शिकत आले. दहावी नंतर फॅशन डिझाईनिंग चा अभ्यास करावा असं वाटत होतं पण काही कारणांनी शक्य नाही झालं. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉमर्स मध्ये गेलो. पदवी नंतर एक वर्ष नोकरी करून शॉर्ट टर्म फॅशन डिझाईनिंग चा कोर्स केला.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

जात बोलते काहीबाही

जात बोलते काही बाही

जात बोलते काहीबाही
इतिहासाची फुटते लाही

आम्ही मोठे आम्ही जेते
दंड थोपटून तयार बाही

अमुचे पूर्वज गाऊ गाथा
कुणास वाटो त्राही त्राही

पेच भयंकर दुही दिसावी
नको घडाया ऐसे काही

पुन्हा एकदा उलटू पाने
समजुन घेऊ ती शिवशाही

~कामिनी फडणीस केंभावी

ममी सांगा कुणाची?

हॉलिवुडानं आपल्याला दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी माझ्यामते दोनच! (दोनच का? तर लहानपणापासून दूरदर्शन खूप पाहिल्याने 'एक किंवा दोन बस्स!' हे घोषवाक्य मनात ठसलं आहे.) तर दुसरी गोष्ट म्हणजे अर्नोल्ड श्वार्झनेगर.. माहेरचा टर्मिनेटर, थांब कमांडो कुंकू लावते या महासुपरहिट कौटुंबिक अ‍ॅक्शनपटांचा महानायक! आणि पहिली म्हणजे ममीचे सिनेमे. 'द ममी' आणि '(तीच) ममी रिटर्न्स'.. अर्नोल्डविषयी बोलण्यासारखं खूप आहे. माझा पत्रमित्रसुद्धा अर्नोल्ड नावाचा स्पॅनिश मुलगा आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेम्यातल्या 'ला टोमाटिना'च्या नाचात माझ्या ताईनेसुद्धा भाग घेतला होता.

लेख: 

कलर्ड पेन्सिल आर्ट - प्लेन टायगर (फुलपाखरु)

हाय मैत्रिणींनो,

२०१८ सालातले हे कलर्ड पेन्सिल माध्यमातले पहिले चित्र मी शेअर करतेय.
या वर्षी मी जास्तीत जास्त चित्रे काढण्याचा संकल्प केलाय, बघूया कसे जमतेय.

खालील चित्र 'प्लेन टायगर' (किंवा आफ्रिकन मोनार्क) जातीच्या फुलपाखराचे आहे. फुलपाखरांचा छंद मला अलिकडेच लागलाय. किंबहुना फोटोग्राफी करायला लागल्यापासून माझे फुलपाखरांकडे अंमळ जास्तच लक्ष जायला लागलेय. फोटोग्राफी करण्याचाही छंद अलिकडचाच, हेतू हा की चित्रासाठीचा रेफरन्स माझ्याकडेच हातासरशी असावा! असो.

Keywords: 

कलाकृती: 

कुंचला

कुंचल्यातून रेखाटलेस तू मला जेव्हा
रंगही सजीव झाले खरे तेव्हा

कुंचल्यातून झरता ते ओघळते रंग
आकारलेस प्रत्यही तू अंग-अंग

आनंदालास पाहून तू , रेखिलेली कलाकृती
अभिमानी तुझ्या मनाला , शिवलीच नाही माझी प्रकृती

चित्र जाहले अनुपम मात्र छटा एक राहिली
अंतरंगी भेदून माझ्या जी अभंग वाहिली

अज्ञातच राहिलास तू कोरडा चित्रकार
तुला कसले कळणार अंतरंग नि कसला आकार

चित्र जमले खरे तुला , वेदना अस्पर्श राहिली
अंतरंगी उमळती ज्वाला , दिठीपार ना तू पाहिली

कसला धरतोस अभिमान निर्जीव कलाकृतीचा
कुंचल्यात नाहीच सामावणार हा पदर शतवृत्तींचा

धजू दिलास कुंचला अन रेखिले अवचित मला जरी

कविता: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle